Sunday, March 15, 2026

भूमी पेडणेकरचा मराठमोळा लुक व्हायरल, पैठणी आणि चंद्रकोरनं चाहते घायाळ

भूमी पेडणेकरचा मराठमोळा लुक व्हायरल, पैठणी आणि चंद्रकोरनं चाहते घायाळ

बॉलिवूडची लोकप्रिय अभिनेत्री भूमी पेडणेकरने नुकताच सोशल मिडियावर तिच्या मराठमोकळ्या लुकचे काही फोटो शेअर केले आहेत. भूमीच्या या लुकची सोशल मिडियावर जोरदार चर्चा सुरु असून सध्या भूमीचे हे फोटोज सोशल मिडियावर चांगलेच व्हायरल होत असल्याचे पाहायला मिळत आहे.

या मराठमोळ्या लुकमध्ये भूमीनं अबोली रंगाची फुलांची नक्षीकामं असलेली सुंदर अशी पैठणी परिधान केली असून तिने या साडीवर सुंदर असा गुलाबी ब्लाउज घातला आहे. अतिशय आकर्षक नक्षीकाम असलेल्या या ब्लाउजने सर्वाचं लक्ष वेधून घेतलं आहे.

भूमिने घातलेला हा ब्लाउज पंकज एस हेरिटेजच्या कलेक्शनमधील असून या ब्लाउजवर सोन्याच्या जरीचं नक्षीकाम केलेलं आहे. तर, या सुंदर ब्लाउजवर मौल्यवान खड्यांचे वर्कदेखील करण्यात आलेलं आहे.

या मराठमोळ्या लुकमध्ये भूमिने साडीबरोबरच आकर्षक असे दागिनेही घातले आहेत. भूमिने या लुकमध्ये सोन्याच्या मण्यांची माळ घातली असून यासोबतच तिने नथ, झुमके, बुगडी, बांगड्या आणि केसांमध्येही सुंदर असे दागिने घातलेले आहेत. तसेच तिने २२ कॅरेट सोन्याची 'हसली' या नावाचा दागिना गळ्यात घातला आहे. भूमिने घातलेले हे दागिने पूजा निगमने डिझाइन केले असून भूमिच्या कपाळावरील धातूच्या टिकलीने सर्वांच लक्ष वेधून घेतलं आहे. भूमिने कपाळावर लावलेली ही टिकली सुरमयी ब्रँडची असून तिच्या नॅचरल लुक मेकअप आणि सिम्पल अशा हेअरस्टाईलमुळे भूमी पेडकणेरचं सौंदर्य अधिकच खूलून दिसत आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा