Sunday, March 15, 2026

२०२६ या खेळाडूसाठी ठरलं लकी; वर्ल्डकप जिंकला आणि आता होणार बाबा; व्हिडिओ झाला व्हायरल

२०२६ या खेळाडूसाठी ठरलं लकी; वर्ल्डकप जिंकला आणि आता होणार बाबा; व्हिडिओ झाला व्हायरल

मुंबई : सूर्यकुमार यादव याच्या नेतृत्वात भारताने तिसऱ्यांदा टी २० विश्वचषकावर आपले नाव कोरले. आणि भारतीयांचा आनंद गगनाला भिडला, अशातच आता सूर्यकुमार आणि त्याची पत्नी देविशा यांनी चाहत्यांना आणखी एक आनंदाची बातमी दिली आहे. टीम इंडियाचा कॅप्टन आता लवकरच बाबा होणार आहे.

सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल

सूर्यकुमार सध्या क्रिकेटमधून मोकळा झाला असला तरी सत्कार, जाहिराती आणि इतर कामांमध्ये व्यस्तच आहे, परंतु याचदरम्यान त्याच्या पत्नीचा डोहाळेजेवणाचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

मागच्या अनेक दिवसांपासून देविशा आई होणार असल्याच्या चर्चा रंगू लागल्या होत्या , परंतु आता व्हायरल होणाऱ्या या व्हिडिओने या चर्चाना आता चांगलेच उधाण आले आहे.

काय आहे त्या व्हिडीओमध्ये

व्हिडिओच्या सुरुवातीला बेबी शॉवर ऑफ देविशा शेट्टी अस लिहिलेला एक बोर्ड दिसत असून सूर्यकुमार आणि देविशाची स्पेशल एंट्री दाखवली आहे, यामुळे चाहत्यांची आता खात्रीच पटली आहे.

परंतु देविशा आणि सूर्यकुमारने याबाबत कोणतीही माहिती अधिकृतरित्या जाहीर केलेली नाही. पण चाहत्यांमध्ये सध्या त्या व्हिडीओवरूनच आनंदाचे वातावरण पसरले आहे. सूर्यकुमार यादव आणि देविशा ही अधिकृत आनंदाची बातमी केव्हा देणार? याकडेही चाहत्यांचे लक्ष लागले आहे.

Comments
Add Comment