Friday, March 13, 2026

शेअर बाजाराची सुरुवात मोठ्या घसरणीने

शेअर बाजाराची सुरुवात मोठ्या घसरणीने

मुंबई : पश्चिम आशियातील युद्धाचे प्रतिकूल पडसाद शुक्रवारी जगभरातील शेअर बाजारांवर मोठ्या प्रमाणात दिसले. डाऊ जोन्स ८०० अंकांनी आपटला आणि गुरुवारी बंद झाला. याचा परिणाम जगभरातील शेअर बाजारांवर दिसून आला. मुंबईत बीएसई सेन्सेक्समध्ये शुक्रवारी सकाळी मोठी घसरण झाली. सकाळी साडेनऊ वाजता सेन्सेक्स ४९२.३१ अंकांनी घसरून ७५,५४२.११ वर पोहोचला. याआधी गुरुवारी सेन्सेक्स ७६,०३४.४२ वर बंद झाला होता. निफ्टी फिफ्टी १७१.६५ अंकांनी घसरून २३,४७३.२५ वर पोहोचला. याआधी गुरुवारी निफ्टी फिफ्टी २३,६३९.१५ वर बंद झाला होता.

इराणने बदला घेणार असे जाहीर केल्यामुळे अमेरिकेने जगावर लादलेले युद्ध आता लवकर संपणार नसल्याची जाणीव होऊ लागली आहे. याचे परिणाम बाजारावर दिसू लागले आहेत. एका अमेरिकन डॉलरचे विनिमय मूल्य ९२.३४ रुपये झाले आहे. मुंबईत २४ कॅरेट शुद्ध १० ग्रॅम (एक तोळा) सोन्याचा दर १,६२,२१० रुपये आहे जो गुरुवारी १,६२,२२० रुपये होता. मुंबईत २४ कॅरेट शुद्ध सोन्याच्या दरात १० रुपयांची किरकोळ घसरण दिसत आहे. तसेच मुंबई २२ कॅरेट शुद्ध १० ग्रॅम (एक तोळा) सोन्याचा दर १,४८,६९० रुपये आहे जो गुरुवारी १,४८,७०० रुपये होता. मुंबईत २२ कॅरेट शुद्ध सोन्याच्या दरात १० रुपयांची किरकोळ घसरण दिसत आहे. मुंबईत एक किलो चांदी २,७९,९०० रुपयांत उपलब्ध आहे, जी गुरुवारी २,८०,००० रुपयांत उपलब्ध होती. मुंबईत चांदीच्या दरात १०० रुपयांची घसरण दिसत आहे.

मुंबईतले शुक्रवार १३ मार्च २०२६ रोजीचे इंधनाचे दर

  1. पेट्रोल - १०३.५४ रुपये प्रति लिटर (गुरुवारच्या तुलनेत ०.०४ पैशांची वाढ)
  2. डिझेल - ९०.०३ रुपये प्रति लिटर (२ मार्चपासून दरात स्थैर्य)
  3. घरगुती स्वयंपाकाचा गॅस सिलेंडर (LPG १४.२ किलो) - ९१२.५० रुपये (फेब्रुवारीच्या तुलनेत ६० रुपयांची वाढ)
  4. व्यावसायिक गॅस सिलेंडर (LPG १९ किलो) - १८३६ रुपये (फेब्रुवारीच्या तुलनेत १४४ रुपयांची वाढ)
  5. सीएनजी - ७७ रुपये किलो (मे २०२५ पासून दरात स्थैर्य)
  6. एलएनजी (पाइपद्वारे पुरवठा होणार गॅस) - ८१ रुपये किलो (१ फेब्रुवारी २०२६ पासून असलेला दर)
Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >