Friday, March 13, 2026

मांजरानं पोपटाचा पिंजरा पाडला, दोन शेजाऱ्यांतला वाद हाणामारीपर्यंत गेला

मांजरानं पोपटाचा पिंजरा पाडला, दोन शेजाऱ्यांतला वाद हाणामारीपर्यंत गेला

पुणे : पुणे तिथे काय उणे असं म्हणतात , हे अगदी बरोबर कारण आता तिथे गुन्हेगारीच्याही काही कमतरता उरलेल्या नाही आहेत. पुण्यात अगदी क्षुल्लक कारणावरून मारामारी, जीवघेणे हल्ले , खून केल्याच्या अनेक घटना या वारंवार घडत असतात. अश्याच एका क्षुल्लक घटनेचे रूपांतर हाणामारीत झाले

नेमकं घडलं काय ?

फिर्यादी अभिषेख सिंग यांचे पुण्यातील ताडीवाला रस्त्यावर घर असून त्याच्याकडे पोपट हा पक्षी आहे, तर शेजारीच राहणाऱ्या आरोपी दिनेश रंगराव पोताबत्तोनी यांच्याकडे मांजर पाळीव प्राणी आहे. आरोपी दिनेश पोताबत्तोनी याची मांजर नेहमीच अभिषेक सिंग यांच्या पोपटाचा पिंजरा पडत होती, त्यामुळे त्यांच्यात नेहमीच खटके उडत होते.

पुण्यातील ताडीवाला रस्त्यावरील भारत तरुण मंडळासमोर हा धक्कादायक प्रकार घडला, घटनेवेळी आरोपीच्या मांजराने फिर्यादीच्या पोपटाचा पिंजरा पाडला. त्यानंतर त्यांच्याकडे चांगलाच वाद रंगला. पिंजरा पाडल्यानंतर अभिषेक सिंग याने दिनेशला मांजरीवर लक्ष ठेवण्यास सांगितले. याचाच दिनेशला राग आला, आणि याच वादातून अभिषेक यांच्यासह कुटुंबियांनी मारहाण केली. याप्रकरणी बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >