Thursday, March 12, 2026

Yashwantrao Chavan Birth Anniversary : यशवंतराव चव्हाण यांच्या जयंतीनिमित्त उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे अभिवादन

Yashwantrao Chavan Birth Anniversary : यशवंतराव चव्हाण यांच्या जयंतीनिमित्त उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे अभिवादन

- स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांचे समाधी स्थळ शक्ती देणारे- उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार

आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार आणि राज्याचे पहिले मुख्यमंत्री स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या ११३ व्या जयंतीनिमित्त आज उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजितदादा पवार यांनी कराड येथील प्रीती संगमावर जाऊन त्यांच्या समाधीचे दर्शन घेतले. यावेळी त्यांनी समाधी स्थळावर पुष्पांजली अर्पण करून अभिवादन केले.

यावेळी जिल्हाधिकारी संतोष पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, पोलीस अधीक्षक तुषार दोशी, माजी आमदार बाळासाहेब पाटील यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी, पक्षाचे पदाधिकारी, नागरिक तसेच विविध शाळांचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांचे समाधी स्थळ शक्ती देणारे- उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार :  स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांचे समाधी स्थळ हे नेहमी शक्ती स्थळ राहिले आहे. स्वर्गीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार नेहमीच या स्थळाला भेट देत होते. त्यांचे नेहमी हे श्रद्धास्थान व शक्तिस्थान राहिले आहे. त्यांच्याच विचारांवर स्वर्गीय अजितदादा पवार यांनी काम केले आहे. मी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यावर दोन फेब्रुवारी रोजी समाधी स्थळावर अभिवादन केले होते. त्यानंतर स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या जयंतीनिमित्त आज अभिवादन करण्यासाठी आले आहे. पुढील काळात त्यांच्याच विचारांवर काम करणार असल्याचेही उपमुख्यमंत्री सुनित्रा अजितदादा पवार यांनी सांगितले. स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या जयंतीचे औचित्य साधून आयोजित करण्यात आलेल्या 'शब्द सुरांची भावपूर्ण आदरांजली' या विशेष कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी प्रमुख उपस्थिती लावली. शब्द सुरांची भावपूर्ण आदरांजली' या कार्यक्रमाद्वारे स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या विचारांना आणि कार्याला संगीतातून उजाळा देण्यात आला.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा