मुंबई : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी भारताचे माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर यांच्या कुटुंबाला विशेष शुभेच्छापत्र पाठवले आहे. सचिन तेंडुलकर यांचा मुलगा अर्जुन तेंडुलकर याच्या विवाहानिमित्त हे पत्र पाठवण्यात आले आहे.
६ मार्च २०२६ रोजी पाठवलेल्या या पत्रात अमित शाह यांनी अर्जुन तेंडुलकर आणि त्याची पत्नी सानिया यांना वैवाहिक जीवनासाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या आहेत. प्रेम, विश्वास आणि आनंदाने परिपूर्ण असलेल्या या नव्या आयुष्याच्या प्रवासासाठी त्यांनी या दोघांना शुभाशिर्वाद दिले आहेत.
या पत्रात भारतीय संस्कृतीत विवाह हा केवळ दोन व्यक्तींचा नव्हे तर दोन कुटुंबांचा पवित्र बंध असल्याचेही नमूद करण्यात आले आहे. भगवान श्री गणेशाच्या कृपेने या दोघांना आयुष्यात आनंद, समृद्धी आणि यश मिळो, हीच प्रार्थना.
तसेच तेंडुलकर कुटुंबाच्या संस्कारांचे कौतुक करत अमित शाह यांनी संपूर्ण कुटुंबाला शुभेच्छा दिल्या आहेत. अमित शाह यांचे हे पत्र सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे. Sh. Sachin Tendulkar Ji (1)







