मुंबई : गुढीपाडव्याच्या शुभ प्रसंगी इंडिया यामाहा मोटरला महाराष्ट्रातील ग्राहकांसाठी आपल्या लोकप्रिय स्कूटर व मोटरसायकल लाइनअपवर अनेक विशेष उत्सवी ऑफर्सची घोषणा करताना आनंद होत आहे, ज्यामुळे त्यांना सहजपणे त्यांची आवडती यामाहा खरेदी करता येईल आणि स्टाइल, कार्यक्षमता व नाविन्यतेसह नववर्षाची सुरूवात करता येईल.
महाराष्ट्रात यामाहा मोटरसायकल्स व स्कूटर्सवर गुढीपाडवा विशेष ऑफर्स:
• यामाहा R15 सिरीजवर सूट ऑफर: ७०व्या अॅनिव्हर्सरी स्पेशल प्राइससह गुढीपाडवा सण साजरा करा, जेथे ऑन-रोड किमतीवर Rs. 6,000 रूपयांची बचत आहे, ज्यामुळे ही आयकॉनिक सुपरस्पोर्ट खरेदी करण्यासाठी अधिक परवडणारी आहे. • यामाहा RayZR 125 Fi Hybrid वर स्पेशल ऑफर: ७०व्या अॅनिव्हर्सरी स्पेशल प्राइससह नववर्षाची सुरूवात करा, जेथे जवळपास Rs. 7000 रूपयांची बचत आहे. या स्कूटरमध्ये स्पोर्टी डिझाइनसह सर्वोत्तम मूल्याचे संयोजन आहे. • यामाहा Fascino 125 Fi Hybrid वर गुढीपाडवा ऑफर: डाऊन पेमेंट (सुरूवातीचा भरणा) फक्त Rs. 4,999* रूपयांसह सुरू होण्यासह आकर्षक उत्सवी फायद्यांचा आनंद घ्या, ज्यामुळे यामाहाची स्टायलिश व इंधन-कार्यक्षम स्कूटर यंदा सणासुदीच्या काळात अधिक परवडणारी झाली आहे. • यामाहा FZ-S Fi Hybrid कमी ईएमआय योजना: डाऊन पेमेंट Rs. 7,999* रूपयांसह सुरू होण्यासह यामाहाची प्रगत हायब्रिड मोटरसायकल खरेदी करा, जी परफॉर्मन्स, कार्यक्षमता आणि उत्सवी किफायतशीरपणा देते.
या विशेष गुढीपाडवा उत्सवी ऑफर्स मर्यादित कालावधीसाठी उपलब्ध आहेत, ज्यामुळे महाराष्ट्रातील ग्राहकांना यामाहाच्या तंत्रज्ञान-संचालित, स्टायलिश व कार्यक्षमता-केंद्रित दुचाकी खरेदी करत नववर्ष साजरीकरण करण्याची परिपूर्ण संधी आहे.
यामाहाच्या विविध उत्पादन पोर्टफोलिओमध्ये प्रीमियम मोटरसायकलींचा समावेश आहे जसे की YZF-R15M (155cc), YZF-R15 V4 (155cc), YZF-R15S V3 (155cc), MT-15 V2 (155cc), Yamaha XSR155 (155cc) आणि FZ series, ज्यामध्ये FZ-S Fi Hybrid (149cc), FZ-S Fi (149cc), आणि FZ-X (149cc) यांचा समावेश आहे. याशिवाय, यामाहा विविध स्कूटर्सची श्रेणी देखील ऑफर करते, ज्यामध्ये Aerox 155 version S (155cc), Aerox 155 (155cc), Fascino S 125 Fi Hybrid (125cc), Fascino 125 Fi Hybrid (125cc), RayZR 125 Fi Hybrid (125cc), आणि RayZR Street Rally 125 Fi Hybrid (125cc) यांचा समावेश आहे.







