मुंबई: लोकनेते स्वर्गीय बाळासाहेब देसाई यांच्या ११६व्या जयंतीनिमित्त अभिवादन कार्यक्रम मुंबई येथील मेघदूत निवासस्थानी पार पडला. या कार्यक्रमात स्व. बाळासाहेब यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करीत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसयांच्यासह विधानपरिषदेचे सभापती राम शिंदे, विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर, विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आदी विविध मान्यवरांनी अभिवादन केले. तसेच त्यांच्या गत आठवणींना उजाळा दिला.
तसेच यावेळी ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे, आमदार डॉ. अतुलबाबा सुरेश भोसले, आमदार बाबुराव कोळीकर, आमदार धनंजय गाडगीळ, आमदार मुरजी पटेल, आमदार मनीषा कायंदे, आमदार किरण सरनाईक, आमदार नारायण कुचे, आमदार अमोल खताळ, आमदार विठ्ठलराव लंघे, आमदार सुहास बाबर, आमदार प्रा. चंद्रकांत सोनावणे, आमदार अर्जुन खोतकर, आमदार अशोकराव माने, आमदार चंद्रकांत रघुवंशी, आमदार जयंत पाटील, आमदार शशिकांत शिंदे, आमदार संजय बनसोडे, आमदार तुकाराम काते, आमदार अनंत तिडके, आमदार शरद सोनवणे, आमदार मनोज घोरपडे, आमदार भीमराव तापकीर, आमदार किशोर पाटील यांच्यासह पर्यटन विभागाचे प्रधान सचिव संजय खंदारे, कोकण विभागीय आयुक्त विजय सूर्यवंशी, पर्यटन विभागाचे संचालक डॉ. बी. एन पाटील पर्यटन महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक निलेश गटणे, मराठा मोर्चा मुंबई समन्वयक विरेंद्र पवार यांचीही उपस्थिती होती. यावेळी सांगितिक आदरांजली देखील वाहण्यात आली.
यावेळी मंत्री शंभूराज देसाई यांनी भावनिक शब्दांत सांगितले की,"मेघदूत हे देसाई कुटुंबासाठी केवळ शासकीय निवासस्थान नसून, लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्या कार्याच्या असंख्य आठवणी जपणारे एक भावनिक वारसास्थान आहे, मंत्री काळात याच निवासस्थानी १८ वर्षे देसाई यांनी वास्तव्य केले. राज्याच्या हिताचे अनेक महत्त्वपूर्ण निर्णय, योजना, जनतेच्या प्रश्नांवर झालेल्या चर्चा आणि लोकाभिमुख विचारांची परंपरा या जगविणाऱ्या आठवणी येथे आहेत. बाळासाहेबांनी उभा केलेला लोकाभिमुख विचारांचा वारसा जपत आम्ही त्यांचे कार्य पुढे नेऊ, हीच या जयंतीनिमित्ताने खरी आदरांजली ठरेल.”







