Wednesday, March 11, 2026

पुणेकरांसाठी मनपाचा उपक्रम; 'क्यूआर' स्कॅन करा अन विकासकामे सुचवा

पुणेकरांसाठी मनपाचा उपक्रम; 'क्यूआर' स्कॅन करा अन विकासकामे सुचवा

पुणे :  पुणे महापालिकेच्या २०२६-२७ च्या वार्षिक अर्थसंकल्पात पुणेकरांना थेट सहभाग घेता येणार आहे. शहराच्या विकासात नागरिकांचा सहभाग वाढविण्यासाठी महापालिकेने 'माझे पुणे, माझा अर्थसंकल्प’, हा उपक्रम राबविण्यात येत आहे.आपल्या भागात कोणती आवश्यक विकासकामे झाली पाहिजे याची सूचना नागरिकांना नोंदविता येणार आहेत, त्यासाठी क्युआर कोडची सुविधा उपलब्ध करून दिली आहे, अशी माहिती स्थायी समितीचे अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांनी दिली. 'नागरिकांच्या सहभागातून शहराची प्रगती' या संकल्पनेवर आधारित या उपक्रमात रस्ते, पाणीपुरवठा, वाहतूक, उद्याने आणि सार्वजनिक सुविधांबाबतच्या सूचना मागविण्यात आल्या आहेत.नागरिकांच्या गरजा आणि प्राधान्यक्रमाचे प्रतिबिंब महापालिकेच्या अर्थसंकल्पात उमटावे, हा यामागचा मुख्य उद्देश आहे. महापालिकेच्या संकेतस्थळासह समाजमाध्यमांवर क्यूआर कोड उपलब्ध आहे. हा क्युरआर कोड स्कॅन करून नागरिकांना सूचना नोंदविता येतील. नागरिकांनी या उपक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन भिमाले यांनी केले आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >