फजलची धमकी... एक दिवस तू फ्रिज मध्ये सापडशील अन् मुंबईत मराठी डॉक्टर तरुणीची आत्महत्या

मुंबई : महाराष्ट्रात लव्ह जिहादच्या घटना वाढू लागल्या आहेत. हिंदू मुलीला प्रेमात पाडायचे निकाह करायचा नंतर तिच्यावर धर्मांतरासाठी दबाव टाकायचा. सतत त्या मुलीवर अत्याचार करायचे. पुढे कोणत्याही कारणाने संसारात वाद वाढले तर संबंधित मुलीची हत्या करायची अथवा तिला प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या आत्महत्या करायला भाग पाडायचे असे प्रकार वाढू लागले आहेत. ताजी लव्ह जिहादची घटना राज्याची राजधानी मुंबई येथे घडली आहे.



नेमकं घडलं काय ?


डॉक्टर स्तुती बजरंग सोनावणे ही उच्च शिक्षित तरुणी मुंबईतील अँटॉप हिल या परिसरात वास्तव्यास होती.डेटिंग अॅपद्वारे ती लोअर परेल येथे राहणाऱ्या फजल मोहम्मद खान या इसमाला भेटली. वर्षभर ते रिलेशनशिप मध्ये होते. एक वर्षानंतर त्यांच्यात सतत वाद होऊ लागले. फजल तिला वारंवार मारून टाकण्याच्या आणि तू फ्रिज यामध्ये सापडशील या अश्या आशयाच्या धमक्या देऊ लागला होता.



घटना केव्हा घडली?


फजलच्या त्रासाला कंटाळून डॉ. स्तुती सोनावणे हिने आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज आहे. स्तुतीचे आई वडील जेवण्यासाठी ८ मार्चला बाहेर गेले होते. हे दोघे घरी परतले तेव्हा स्तुती तिच्या खोलीचे दार उघडत नव्हती. दरवाजा तोडला असता स्तुतीने गळफास घेतल्याचे दिसले.


आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी फजल मोहम्मद खान ( ३१ ) याला लोअर परळ येथून अटक करण्यात आली आहे. न्यायालयाने फजल मोहम्मद खान याला एका दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे, चौकशीतून काय समोर येणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Comments
Add Comment

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत कोयना महोत्सवाची यशस्वी सांगता

सातारा: राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पर्यटन नकाशावर अग्रस्थानी नेण्याचा निर्धार व्यक्त करत पर्यटन, शेती आणि रोजगार

मुख्यमंत्र्यांच्या पाठबळामुळे ताडोबा व्याघ्र प्रकल्पातील पर्यावरणीय पुनरुज्जीवन प्रकल्पाला मिळाली चालना

मुंबई: जैवविविधतेने समृद्ध अशा ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प परिसरातील जागेचे पर्यावरणीय पुनरुज्जीवन

‘पीएनजी’ क्षेत्रातील नागरिकांना ३० जूननंतर ‘एलपीजी’ गॅस पुरवठा बंद; पर्यायी इंधन म्हणून केरोसीनचे वाटप होणार

मुंबई: राज्यातील ज्या शहरी भागांमध्ये पाइपद्वारे गॅस (पीएनजी) जोडणीची सुविधा उपलब्ध आहे, तिथे नागरिकांनी पीएनजी

Ramdas Athawale: केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी राज्यसभा खासदार पदाची केली हॅट्ट्रिक

मुंबई: रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांची तिस-यांदा

Delhi: हातात पुष्पगुच्छ घेऊन थेट शिरला विधानसभेत, अध्यक्षांच्या गाडीजवळ फुलांचा गुच्छ ठेवला अन्...

नवी दिल्ली: दिल्ली विधानसभेत सुरक्षेचा मोठा भंग झाल्याचे वृत्त आहे. एका वाहनाने बॅरियर तोडून गेट क्रमांक २ मधून

Umpire Killed Over Run-Out Argument : विशाखापट्टणम हादरलं! रनआऊट दिलं म्हणून थेट अंपायरचीच केली हत्या

विशाखापट्टणम येथे घडलेल्या एका धक्कादायक घटनेने क्रीडा क्षेत्र हादरले आहे. स्थानिक स्तरावर सुरू असलेल्या