Wednesday, March 11, 2026

अक्षय कुमारच्या भूतबंगला चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित, टीझर गुरुवारी प्रदर्शित होणार

अक्षय कुमारच्या भूतबंगला चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित, टीझर गुरुवारी प्रदर्शित होणार

मुंबई : बालाजी मोशन पिक्चर्सने भूतबंगला चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित केले आहे. या चित्रपटात बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार याची प्रमुख भूमिका आहे. भूतबंगला या चित्रपटाचा टीझर गुरुवारी प्रदर्शित होणार आहे.

प्रदर्शित झालेल्या पोस्टरमध्ये क्षय कुमार झाडाच्या फांदीवर उलटा लटकल्याचे दिसत आहे. अक्षयच्या चेहऱ्यावर अनोखे भाव दिसत आहेत. अक्षयच्या मागे घनदाट जंगल दिसत आहे. अक्षयच्या भोवतालची वटवाघुळे वावरत असल्याचे स्पष्ट दिसत आहे. हे अनोखे पोस्टर चित्रपट कशा स्वरुपाचा असेल याची थोडक्यात पण प्रभावी झलक दाखवण्यात यशस्वी होते. भूतबंगला चित्रपटात सुपरनॅचरल ड्रामा आणि कॉमेडीचा जोरदार तडका अनुभवता येणार आहे.

भूतबंगला या चित्रपटातून अक्षय कुमार आणि प्रियदर्शन यांची बहुप्रतीक्षित जोडी पुन्हा एकदा एकत्र येत आहे. या जोडीने यापूर्वीही अनेक सुपरहिट कॉमेडी चित्रपट दिले आहेत, जे आजही प्रेक्षकांचे आवडते आहेत. त्यामुळे या चित्रपटाबद्दल प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे. आपल्या उत्कृष्ट कॉमिक टाइमिंग आणि मजेदार कथांसाठी प्रसिद्ध असलेली ही जोडी पुन्हा एकत्र येत असल्यामुळे आणखी एका लक्षात राहणाऱ्या चित्रपटाची अपेक्षा वाढली आहे.

बालाजी मोशन पिक्चर्स (बालाजी टेलिफिल्म्स लिमिटेडचा भाग) आणि केप ऑफ गुड फिल्म्स यांच्या बॅनरखाली बनलेल्या ‘भूत बंगला’मध्ये अक्षय कुमार, वामिका गब्बी, परेश रावल, तबू आणि राजपाल यादव महत्त्वाच्या भूमिकांमध्ये दिसणार आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन प्रियदर्शन यांनी केले असून अक्षय कुमार, शोभा कपूर आणि एकता आर कपूर हे याचे निर्माते आहेत. हा चित्रपट दहा एप्रिल २०२६ रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.

 
View this post on Instagram
 

A post shared by Akshay Kumar (@akshaykumar)

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा