Tuesday, March 10, 2026

शेअर बाजार सोमवारी आपटला आणि मंगळवारी वधारला

शेअर बाजार सोमवारी आपटला आणि मंगळवारी वधारला
मुंबई : पश्चिम आशियातील संघर्ष लवकरच संपेल असा विश्वास व्यक्त करणारे वक्तव्य अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केले. ट्रम्प यांच्या या वक्तव्यामुळे जगभरातील शेअर बाजारांमध्ये आशादायक चित्र निर्माण झाले. याचा सकारात्मक परिणाम भारतीय शेअर बाजारातही दिसून आला. बीएसई सेन्सेक्स ४८० अंकांपेक्षा जास्त वधारला आणि ७८,०४९ वर पोहोचला तर निफ्टी १३९ अंकांनी वाढून २४,१६८ वर पोहोचला. सोमवारी कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ झाल्यामुळे शेअर बाजारात घसरण झाली. पण मंगळवारी परिस्थिती एकदम बदलली. ट्रम्प यांनी संघर्ष लवकरच संपेल असा विश्वास व्यक्त केल्यामुळे जागतिक ऊर्जा पुरवठ्यात दीर्घकाळ व्यत्यय येण्याची भीती कमी होण्यास मदत झाली. कच्च्या तेलाच्या किमती प्रति बॅरल ९१ डॉलरपेक्षा कमी झाल्या. यामुळे शेअर बाजाराला सावरण्याची संधी मिळाली. मुंबईत २४ कॅरेट शुद्ध १० ग्रॅम अर्थात एक तोळा सोन्याचा दर सोमवारी १,६१,६८० रुपये होता. हा दर ७०० रुपयांनी वाढला आणि मंगळवारी १० मार्च २०२६ रोजी १,६२,३८० वर पोहोचला. तसेच मुंबईत २२ कॅरेट शुद्ध १० ग्रॅम अर्थात एक तोळा सोन्याचा दर सोमवारी १,४८,२०० रुपये होता. हा दर ६५० रुपयांनी वाढला आणि मंगळवारी १० मार्च २०२६ रोजी १,४८,८५० वर पोहोचला. मुंबईत एक किलो चांदीचा दर सोमवारी २,८०,००० होता. हा दर १० हजार रुपयांनी वाढला आणि मंगळवारी १० मार्च २०२६ रोजी २,९०,००० वर पोहोचला.
Comments
Add Comment