सौदी अरेबियातील क्षेपणास्त्र हल्ल्यानंतर भारतीयाच्या मृत्यूची अफवा; दूतावासाचे स्पष्टीकरण

रियाध : मध्यपूर्वेत सुरू असलेल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर सौदी अरेबियात झालेल्या क्षेपणास्त्र हल्ल्याबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे. अल-खर्ज परिसरातील एका निवासी इमारतीवर क्षेपणास्त्र पडल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. या घटनेत एका भारतीय नागरिकाचा मृत्यू झाल्याची चर्चा होती; मात्र भारतीय दूतावासाने ही माहिती चुकीची असल्याचे स्पष्ट केले आहे.


इस्रायल आणि अमेरिकेने इराणविरोधात कारवाई सुरू केल्यानंतर गेल्या काही दिवसांत संघर्ष अधिक तीव्र झाला आहे. या पार्श्वभूमीवर इराणकडून कतार, बहरीन, सौदी अरेबिया आणि संयुक्त अरब अमिरातीतील अमेरिकन लष्करी तळांवर हल्ले करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.



भारतीय नागरिकाच्या मृत्यूची बातमी चुकीची


अल-खर्ज येथे झालेल्या हल्ल्यानंतर सुरुवातीला काही स्थानिक सूत्रांनी एका भारतीय नागरिकाचा मृत्यू झाल्याचे म्हटले होते. मात्र भारतीय दूतावासाने अधिकृत निवेदन देत ही माहिती फेटाळून लावली. दूतावासाने दिलेल्या माहितीनुसार, या घटनेत कोणत्याही भारतीयाचा मृत्यू झालेला नाही, तर एक भारतीय नागरिक जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत.



नेमकी घटना कशी घडली?


गेल्या आठवड्यात इराणकडून केलेल्या हल्ल्यांच्या मालिकेत सौदी अरेबियातील अल-खर्ज परिसरालाही लक्ष्य करण्यात आले. हा भाग लष्करीदृष्ट्या संवेदनशील मानला जातो. प्राथमिक अहवालात एक भारतीय आणि एक बांगलादेशी नागरिक मृत झाल्याचे सांगण्यात आले होते. मात्र नंतर अधिकृत दुरुस्तीत स्पष्ट करण्यात आले की, दोन बांगलादेशी नागरिकांचा मृत्यू झाला असून एका भारतीयासह एकूण १२ जण जखमी झाले आहेत.



जखमी भारतीयावर उपचार सुरू


भारतीय दूतावासाने सोशल मीडियावरील निवेदनात सांगितले की, जखमी भारतीय नागरिकाला अल-खर्जमधील सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दूतावासातील समुदाय कल्याण विभागाचे प्रतिनिधी वाय साबीर यांनी रुग्णालयात भेट देऊन जखमीची प्रकृती जाणून घेतली. दूतावास स्थानिक प्रशासनाशी सतत संपर्कात असल्याचेही सांगण्यात आले.



भारतीय नागरिकांसाठी सूचना


सौदी अरेबियातील तणावपूर्ण परिस्थिती लक्षात घेऊन रियाध आणि जेद्दाह येथील भारतीय मिशनने नागरिकांसाठी काही मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. स्थानिक प्रशासनाने जारी केलेल्या सुरक्षा नियमांचे पालन करावे अनावश्यक प्रवास टाळावा आणि सतर्क राहावे. रियाध, जेद्दाह आणि दम्मम येथून भारतासाठी विमान सेवा सध्या सुरू आहे. आपत्कालीन परिस्थितीत दूतावासाच्या हेल्पलाईन क्रमांकांवर संपर्क साधावा



सौदी अरेबियाचा इराणला इशारा


दरम्यान, या हल्ल्यांनंतर आखाती प्रदेशातील तणाव अधिक वाढला आहे. सौदी अरेबियाने इराणच्या कारवायांवर तीव्र प्रतिक्रिया देत, अरब देशांवरील हल्ले थांबवले नाहीत तर त्याचे गंभीर परिणाम होतील, असा इशारा दिला आहे. सौदी परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे की, या कारवायांमुळे प्रादेशिक स्थैर्यावर परिणाम होत असून भविष्यातील संबंधांवरही त्याचा परिणाम होऊ शकतो.

Comments
Add Comment

Iran-US-Israel War : इराणला मोठा धक्का! माजी परराष्ट्र मंत्री कमाल खर्राजी यांचे निधन

- अमेरिकेच्या हवाई हल्ल्यानंतर प्राणज्योत मालवली इराण अमेरिका युद्धाबाबत एक मोठी माहिती समोर आली आहे. इराणचे

Iran-US-Israel War Ceasefire : अप्रत्यक्ष इराणला मदत करणारा पाकिस्तान शांतिदूत कसा ठरू शकतो ?

- पाकिस्तानच्या मध्यस्थीच्या भूमिकेवर अमेरिकेचा प्रश्न पाकिस्तानने अमेरिका-इराण संघर्षात मध्यस्थी केली होती.

US Drone : अमेरिकेचा २०० दशलक्ष डॉलरचा ड्रोन इराणने पाडला ?

होर्मुझ सामुद्रधुनी : अमेरिकेचा २०० दशलक्ष डॉलरचा ड्रोन इराणने पाडला की तांत्रिक बिघाडामुळे हा ड्रोन समुद्रात

Israel - Pakistan Verbal Clash : आंतरराष्ट्रीय पातळीवर खळबळ! पाकिस्तान - इस्रायलमध्ये शाब्दिक चकमक

- ख्वाजा आसिफ यांच्या वक्तव्यावर इस्रायल संतप्त इस्रायलच्या पंतप्रधान कार्यालयाने पाकिस्तानच्या (Israel - Pakistan Verbal Clash)

Middle East War : होर्मुजमधील इराणच्या कर वसुलीवरून ट्रम्प यांनी व्यक्त केली नाराजी

वॉशिंग्टन : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणकडून होर्मुज जलडमरूमध्य मार्गे होणाऱ्या तेल

China AI Robot Wolf Army : भविष्यात AI कुत्रे करणार ड्रोनचा सामना; भविष्यातील युद्धासाठी चीनची ‘रोबोट वुल्फ आर्मी’ सज्ज!

चीन वेगाने आधुनिक आणि मानवविरहित युद्धाच्या दिशेने पुढे जात आहे. नुकत्याच समोर आलेल्या एका अहवालात उघड झाले आहे