साप्ताहिक राशिभविष्य, १ ते ७ मार्च २०२६
![]() | नवीन मित्र आणि नाती जोडली जातीलमेष : नवीन व्यवसाय सुरु करण्यासाठी हा कालावधी चांगला आहे. या कालावधीमध्ये आपणास नवीन मित्र आणि नाती जोडली जातील.या कालावधीमध्ये आपला उत्साह चांगला असणार आहे. आपणाला आपले मित्र आणि सहकारी यांचे सहाय्य मिळणार आहे.तुमच्या विचारा बाबत स्वतःला आत्मविश्वास असणार आहे. अचानक प्रवासही संभवतो प्रवास फलदायी होतील. जागा किंवा व्यवसाय बदलण्याचा विचार करू नका. परीक्षेत यश. कामाच्या ठिकाणी प्रतिष्ठा उंचावणे या काळात घडणार आहे. कुटुंबा कडून मिळणाऱ्या सहकार्या मध्ये वाढ होणार आहे. नवीन मिळणारी कामे अत्यंत फायदेशीर ठरतील .तुमच्या पासून लांब राहणाऱ्या आणि परदेशी सहकाऱ्यांकडून मदत मिळू शकते. कोणत्याही विपरीत परिस्थितीत तुम्ही आत्मविश्वासाने काम करणार आहात |
![]() | अनपेक्षित चांगल्या घटना घडून येतीलवृषभ : या कालावधीमध्ये आपल्या चांगल्या कामाची सुरुवात होऊ शकते .तुमच्या हातून काही चांगले कार्य घडण्याची शक्यता आहे तुम्ही अत्यंत आनंदी असणार अहात.कौटुंबिक सौख्य लाभणार आहे .तुमच्या स्वतःच्या प्रयत्नां मुळे उत्पन्नात वाढ होणार आहे.तुमच्या छंदासाठी तुमचे मित्र व सहकारी मदत करतील.आर्थिक लाभ मिळण्यासाठी हा चांगला कालावधी आहे काही अनपेक्षित चांगल्या घटना घडून येतील.महिला आणि वरिष्ठ व्यक्तींकडून लाभ होण्याची शक्यता.तुमची कष्ट करायची तयारी असल्यामुळे तुम्हाला कार्यामध्ये निश्चित यश मिळणार आहे. तुम्हालानवीन संधी मिळतील.उत्पन्न वाढले तरी खर्च वाढणार आहे. वायफळ खर्च होणार नाही याच्याकडे लक्ष देणे आवश्यक आहे.विरुद्धलिंगी व्यक्तींसोबत मैत्री करताना सावध रहाणे.आर्थिक परिस्थिती मजबूत राहील सहकुटुंब सहपरिवार प्रवास घडेल. व्यवसायिक परिस्थिती समाधान कारक राहील. |
![]() | नवीन नवीन संधी मिळतीलमिथुन : इतर कोणाच्याही आश्वासनांवर विसंबून राहणे म्हणजे नुकसानीस आमंत्रण दिल्यासारखे होईल स्वतःचे कार्य स्वतः पूर्ण करा. चालढकल नको आपले कर्तृत्व सिद्ध करण्याच्या संधी उपलब्ध होतील नोकरी व्यवसाय धंद्यात अनुकूल परिस्थिती लाभेल मात्र नोकरीच्या ठिकाणी राजकारण आणि गटबाजी पासून अलिप्त राहणे हिताचे ठरेल आपल्या कामाविषयी विज्ञान अद्यावत ठेवा कार्यमग्न रहा इतरांच्या बोलण्याला बळी पडू नका नंतर मनस्ताप होण्याची शक्यता नाकारता येत नाही व्यवसाय धंद्यातील परिस्थिती समाधानकारक राहिली तरी आर्थिक गरज भासू शकते आर्थिक विवंचनेने वर लगेचच कर्ज काढणे हा मार्ग शक्य तो अवलंबून नका मित्रमंडळी कुटुंबाकडून सहकार्य लाभेल या कालावधीत आधार देणे घेणे भविष्यात हानीकारक ठरू शकते शेअर मार्केट तेजी मंदी संबंधित व्यवसाय इत्यादी मध्ये आर्थिक फायदा आर्थिक परिस्थितीत सुधारणा होईल. |
![]() | कामाचा विस्तार होऊ शकतोकर्क : तुमच्या कामाच्या ठिकाणी स्पर्धा निर्माण झाल्या मुळे आणि कामाच्या दबावामुळे कारकिर्दी मध्ये काही अडथळे निर्माण होण्याची शक्यता आहे. ही परिस्थिती चांगल्या प्रकारे हाताळण्या साठी तुम्ही थोडे लवचिक धोरण अवलंबण्याची गरज आहे. नवीन प्रकल्प आणि करिअर मध्ये जास्त धोके पत्करू नका.तुम्ही तुमच्या नशिबावर फार विसंबून राहू नका..कठीण परिस्थिती शांतपणे आणि चातुर्याने हाताळणे फार गरजेचे आहे जास्ती घाई करून उपयोग होणार नाही. आपल्या कल्पक आणि बौद्धिक ऊर्जेच्या दृष्टीने हा काळ आपण अनुकुल करू शकता. तुम्ही तुमच्या कामाला कला समजून कार्य केल्यास आपण नवीन कल्पना राबवू शकता.चांगले संबंध आणि संवाद यातून तुम्हाला नव्या संधी मिळू शकतात .तुमच्या कामाचा विस्तार होऊ शकतो तुमचे धाडस आणि बुद्धिमत्ता यामुळे तुम्हाला आर्थिक लाभ होतील अध्यात्मिक दृष्ट्या ही तुम्हाला हा कालावधी अनुकूल ठरणार आहे. |
![]() | समृद्धीचा कालावधीसिंह : धार्मिक कार्याकडे तुमचा ओढा असणार आहे. तुम्हाला धार्मिक प्रवास करावे लागण्याची शक्यता आहे.घरातील ज्येष्ठ व्यक्तींच्या आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे. कामामध्ये सातत्य ठेवल्याने आणि उत्साहाने काम केल्यामुळे आपल्याला समृद्धीचा कालावधी अनुभवयास मिळणार आहे. याचा पूर्णपणे आपण फायदा घ्या. चांगले प्रयत्न आपल्या हातून होणार आहेत. तुम्हाला तुमच्या तणावापासून आणि अडचणींपासून दिलासा मिळू शकतो. कुटुंबातील व्यक्तीं आणि सहकाऱ्यांकडून चांगले संबंध ठेवल्यास सहकार्य मिळणार आहे. तुम्ही धाडसाने सर्व कामे पूर्ण कराल आणि व्यावसायिक स्तरावर तुमची प्रगती होणार आहे. आपल्या कारकीर्दीत चांगली मोठी झेप घ्याल .तुम्हाला चांगला लाभ होईल आणि नैतिक मार्गा सोडू नका. संयम राखणे आवश्यक आहे तुमची शिस्त आणि स्वयम् निरीक्षण आणि स्वनियंत्रण या मुळेच फायदे मिळणार आहे |
![]() | सतर्क रहाकन्या : या कालावधीमध्ये आपण सतर्क राहणे आवश्यक आहे कोणत्याही प्रकारच्या मोहात अडकून नका संयम बाळगणे अतिशय महत्त्वाचे ठरेल कुटुंबा मधून जीवन साथी साथ चांगली राहील काहींना प्रवासाचा योग येईल. नोकरी मधील वातावरण स्थिर राहिले तरी काही महत्त्वाच्या प्रसंगी आपण सावध राहणे गरजेचे आहे. विशेषतः सरकारी स्वरूपाच्या नोकरीमध्ये शिस्त पाळा. कायद्याचे बंधन पाळणे हितकारक ठरेल लहान मोठ्या प्रलोभनांपासून दूर राहा तसेच आपल्या अधिकाराची व्याप्ती लक्षात घ्या. काहींना प्रवास योग आहेत प्रवासात वाहनाच्या वेगावर नियंत्रण ठेवावे. तसेच इतरांशी स्पर्धा नको. वाहतुकीचे नियम पाळणे बंधनकारक ठरेल. व्यवसाय धंद्यात कामगारांचे प्रश्न उपस्थित होऊ शकतात पण त्यातून मार्ग निघेल सकारात्मक विचार ठेवा. आर्थिक परिस्थिती ठीक-ठाक राहील योग्य जाणकार आणि हितचिंतक यांच्याशी आवर्जून चर्चा करा. |
![]() | भाग्याची साथ मिळेलतूळ : या आठवड्यात आपल्याला भाग्याची साथ मिळेल अनुकूल घटना घडतील बरेच दिवस एखादी रेंगाळलेले काम पूर्ण झाल्यामुळे आनंद आणि उत्साह वाढेल दगदग कमी होईल केलेल्या कष्टाचे चीज होईल काहींना प्रवास योग आहे प्रवास कार्य सिद्ध ठरतील परंतु खर्चात वाढ होईल नोकरीत प्रगती होईल बदलीची शक्यता आहे. काही प्रश्नांची उत्तरे मिळतील आर्थिक लाभ होतील. विशेष कामासाठी आपली निवड होऊ शकते. आपल्या कार्यशैलीमुळे इतरांवर प्रभाव पडेल गृहसौख्य चांगले राहील कुटुंबा मधून आपल्याला सर्वांचे अपेक्षित असलेले सहकार्य मिळू शकते मात्र आपण वाद-विवाद करू नका. धार्मिक ते मध्ये मन रमेल मित्रमंडळींच्या वर्तुळामध्ये प्रिय व्हाल. इतरांना मदत करण्याची इच्छा होईल परंतु आपल्याला अडचणीच्या वेळी ते मदत करतात अशा लोकांची अथवा हितचिंतकांची साथ सोडू नका महत्त्वाची कामे मार्गी लावण्यात यश मिळेल |
![]() | समज-गैरसमज टाळावृश्चिक : आठवड्याच्या सुरुवातीला नियोजित कामांमध्ये अडथळे उद्भवण्याची शक्यता आहे तसेच कामे अर्धवट राहतील प्रयत्न जास्त करावे लागल्यामुळे आपल्या स्वभावात चिडखोरपणा येण्याची शक्यता परंतु आपल्या रागावर नियंत्रण आवश्यक राहील. कोणतेही लहान-मोठे निर्णय घेताना शांत राहणे आवश्यक आहे पूर्ण विचारांती निर्णय घ्या. उत्तरार्धात कामे मार्गी लागतील रुक्षपणा दूर होईल समस्यांवर मात करू शकाल अनेक अडचणी दूर होऊन भाग्याची साथ राहील नोकरीत कामाचे स्वरूप बदलू शकते तसेच स्थान बदलाची शक्यता बाबदार्या वाढू शकतात. कुटुंबामध्ये जीवनसाथीशी सूर जुळतील घरातील इतर सदस्यांचे अपेक्षित सहकार्य मिळत नसल्याचे जाणवेल. समज गैरसमज टाळा. विविध प्रकारचे लाभ इतरत्र होतील जमिनीच्या व्यवहारांमध्ये संयम ठेवल्यास यश मिळेल पण जागरुकता ठेवा. एखाद्या कारणावरून पैसे खर्च होऊ शकतात. धावपळ होऊ शकते. स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देणे आवश्यक आहे |
![]() | प्रवासाचे योग आहेतधनु : या सप्ताहात प्रवासाचे योग आहेत पर्यटनाच्या निमित्ताने अथवा धार्मिक स्थळे देवदर्शनासाठी प्रवास घडू शकतात सहकुटुंब सहपरिवार प्रवास करू शकाल जीवनसाथी आपल्याला मनापासून सहकार्य करेल महत्त्वाच्या कामांमध्ये थोड्या अडचणी येऊ शकतात संयम ठेवा प्रयत्न योग्य दिशेने केल्या मुळे कामे पूर्ण होतील आरोग्याला जपणे आवश्यक आहे काही वार्ता अस्वस्थ करण्याची शक्यता आहे आर्थिक आघाडी ठीक राहील जवळचे आप्तेष्ट नातेवाईक मित्र सहकारी यांना आपल्या कडून मदतीची अपेक्षा असू शकते त्यात वेळ आणि पैसा दोन्ही खर्च करावा लागू शकतो. विद्यार्थ्यांनी आपल्या अभ्यासावर लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे वेळेचे नियोजन उपयोगी पडेल तसेच कुसंगती टाळा मुर्खांच्या नंदनवनात रमू नका. नोकरीमध्ये वरिष्ठांशी मतभेद होऊ शकतात स्वतःची मते बाजूला ठेवा. व्यवसाय धंद्यात सर्वसामान्य परिस्थिती राहील. |
![]() | कामाची व्याप्ती वाढेलमकर : या काळात जरी आपल्याला मिश्र फळे मिळणार असतील तरी आपल्या आत्मविश्वासात वृद्धी होईल आपल्या समोरील मोठी क्लिष्ट स्वरूपाची कार्य आपण आपल्या आत्मविश्वासाच्या जोरावर पूर्ण करू शकाल. भूमि भवन प्रॉपर्टी यांच्यापासून मोठ्या आर्थिक लाभाची शक्यता. वैद्यकीय आणि बांधकाम क्षेत्राशी संबंधित जातकांना मोठ्या स्वरूपातील फायद्याचे सौदे हाती येण्याच्या शक्यते सह नवीन नवीन संधी उपलब्ध होतील. विद्यार्थी स्पर्धात्मक यश मिळवू शकतात नोकरीत अनुकूल कालावधी पदोन्नती वेतन वृद्धि चे योग सामाजिक कार्यात रस घ्याल मान सन्मान वाढेल कुटुंब परिवारात भावंडं विषयी प्रेम जिव्हाळा वाटेल आपल्या भावंडांच्या मुळे आपल्या कारकिर्दीमध्ये महत्त्वपूर्ण बदल घडू शकतात आर्थिक दृष्ट्या पित्याकडून सहयोग प्राप्त होऊन आर्थिक परिस्थिती सुधारेल. |
![]() | ताण-तणाव संपुष्टात येईलकुंभ : आपल्या कार्यक्षेत्रात पूर्वी आलेला ताण तणाव नाहीसा झाल्यामुळे स्वतः निवांत राहाल. नोकरीमध्ये राजकारण व गटबाजी पासून झालेला त्रास संपुष्टात येईल. आपली प्रतिक्रिया आपण एकदम देण्याचे टाळा. कुटुंबातील मुला-मुलींना चांगले शैक्षणिक यश मिळाल्यामुळे कुटुंबातील वातावरण आनंदी आणि समाधानकारक राहील आरोग्य चांगले राहील आत्मविश्वासात वाढ झाल्यामुळे आपल्या समोरील कामे आपण वेगाने करू शकाल जीवनसाथी बरोबर गैरसमज करून घेऊ नका तरुण-तरुणींना प्रेमामध्ये यश लाभेल मात्र संशयाचे वातावरण राहू शकते धार्मिक कार्यामध्ये मन रमेल तसेच सामाजिक कार्यक्रमाचे निमंत्रण मिळू शकते प्रवास शक्यतो टाळलेला उत्तम.जमीन जुमला स्थायी संपत्ती याविषयीचे व्यवहार गतीमान होतील ओळखी मध्यस्थी उपयोगी पडतील महत्त्वाच्या कामात अडथळा शर्यत पार करू शकाल |
![]() | केलेले प्रयत्न सफल होतीलमीन : सदरील आठवडा अनेक गोष्टीत अविस्मरणीय ठरू शकतो अनुकूल घटना घडतील बरेच दिवस आपल्या मनात राहिलेली एखादी इच्छा पूर्ण होऊ शकते नोकरदारांना नोकरीमध्ये दिलासा देणाऱ्या घटना घडू शकतात पदोन्नती वेतन वृद्धि सारख्या घटना घडतील मात्र नवीन जबाबदाऱ्या घ्यावे लागतील. कामाच्या स्वरूपात बदल संभवतो बरेच दिवस मनात राहिलेले स्वतःच्या घराचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रयत्नांची आवश्यकता आहे केलेले प्रयत्न सफल होतील तसेच आपले जुने वाहन बदलून नवीन वाहन खरेदी करू शकाल. आर्थिक परिस्थिती चांगली राहील हितशत्रू काबूत ठेवण्याचा प्रयत्न करावा लागेल. समाजातील सन्माननीय लोकांच्या ओळखी होतील वेळप्रसंगी त्यांच्या मदती सह मार्गदर्शन लाभू शकते कुटुंबीयांसमवेत बाहेर जाण्याचे बेत आखाल. कुटुंबात एखादा धार्मिक कार्यक्रम होईल आप्तेष्टांच्या गाठीभेटी होतील व्यवसायात सरकारी नियमांचे पालन अवश्य करा. कौटुंबिक गोष्टींना प्राधान्य दिले जाईल |











