Monday, March 9, 2026

संजू सॅमसन, अभिषेक शर्मा, इशान किशनचे फिफ्टी; न्यूझीलंडपुढे ठेवले हे लक्ष्य

संजू सॅमसन, अभिषेक शर्मा, इशान किशनचे फिफ्टी; न्यूझीलंडपुढे ठेवले हे लक्ष्य

अहमदाबाद: भारतीय फलंदाजांनी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियच्या खेळपट्टीचा पुरेपूर वापर केला आणि न्यूझिलंडसमोर आव्हानात्मक लक्ष्य उभे केले. अभिषेक शर्माने  फायनलसाठी राखून ठेवलेला खेळ केला. संजू सॅमसनला पुन्हा एकदा शतकाने हुलकावणी दिल्याची खंत चाहत्यांना वाटली. इशान किशननेही अर्धशतक झळकावताना भारताला १५ षटकांत दोनशेपार पोहोचवले. जिमी निशॅमनचे एका षटकात तीन विकेट्स घेऊन भारताला बॅकफूटवर फेकले होते, परंतु शिवम दुबेने शेवटच्या षटकात निशॅमच्या गोलंदाजीवर तुफान फटकेबाजी खेचून संघाला मोठे लक्ष्य उभे करून दिले.

पूर्वीचा अभिषेक शर्मा आज दिसला आणि त्याने सर्व दडपण झुगारून २१ चेंडूंत ६ चौकार व ३ षटकारांसह ५२ धावांची खेळी केली. त्याने संजूसह ९८ धावांची सलामी दिली आणि ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या इतिहासातील ही सर्वोत्तम सलामीची भागीदारी ठरली. संजू व इशान किशनने नंतर चौकार-षटकारांचा पाऊस पाडला. इशान किशननेही २३ चेंडूंत अर्धशतक पूर्ण करताना भारताला १५ षटकांत दोनशेपार पोहोचवले. ट्वेंटी-२० वर्ल्ड कपच्या एका डावात तीन फलंदाजांनी ५०+ धावा करण्याची ही भारताकडून तिसरी वेळ आहे. २००७ मध्ये इंग्लंडविरुद्ध आणि २०२२ मध्ये नेदरलँड्सविरुद्ध असा पराक्रम झाला होता. मागील दोन सामन्यांत नाबाद ९७ व ८९ धावा करणारा संजू आजतरी शतक पूर्ण करेल असे वाटत होते. त्याच्याकडे पुरेशी षटकंही होती. पण, तो निस्वार्थी आहे. त्याने संघासाठी मोठे फटके खेचले. इशानसह त्याने दुसऱ्या विकेटसाठी १०५ धावांची भागीदारी केली.

संजू १६व्या षटकात जिमी निशॅमच्या गोलंदाजीवर झेलबाद झाला. त्याने ४६ चेंडूंत ५ चौकार व ८ षटकारांसह ८९ धावा केल्या. त्याच षटकाच्या शेवटच्या दोन चेंडूंवर भारताने दोन विकेट्स गमावल्या. इशान २५ चेंडूंत ४ चौकार व ४ षटकारांसह ५४ धावांवर झेलबाद झाला. कर्णधार सूर्यकुमार यादव गोल्डन डकवर झेलबाद झाला. भारताने एका षटकात ३ विकेट्स गमवल्याने न्यूझीलंडने चांगले पुनरागमन केले. भारताला १७ चेंडूंनंतर चौकार खेचता आला. निशॅमच्या एका षटकाने भारतावर दडपण बनवले होते आणि हार्दिक पांड्याही १३ चेंडूंत १८ धावांवर झेलबाद झाला. शिवम दुबेने २०व्या षटकात जोरदार षटकार खेचून संघाला २५० च्या पार पोहोचवले. शिवमने त्या षटकात ४,६,६,४,०,४ अशा २४ धावा चोपल्या आणि संघाला ५ बाद २५५ धावांपर्यंत पोहोचवले. शिवमने ८ चेंडूंत नाबाद २६ धावा केल्या.

अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर रंगलेल्या फायनलमध्ये संजू सॅमसन आणि अभिषेक शर्माने भारतीय संघाला धमाकेदार सुरुवात करुन दिली. या जोडीने पॉवर प्लेमध्येच विक्रमी भागीदारी रचत न्यूझीलंडच्या गोलंदाजांचे खांदे पाडल्याचे पाहायला मिळाले. अभिषेक शर्माने अवघ्या १८ चेंडूत अर्धशतक झळकावले. दुसऱ्या बाजूला संजूनंही धमाकेदार फटकेबाजीचा नजराणा पेश केला. या दोघांनी पॉवर प्लेमध्ये ९२ धावा कुटल्या. वर्ल्ड कप स्पर्धेतील पॉवर प्लेमधील ही सर्वोच्च धावंसख्या ठरली. त्याआधी त्यांनी टीमकडून सर्वात जलद अर्धशतकाचा रेकॉर्डही नोंदवला.

संजू सॅमसनला सलग तिसऱ्या सामन्यात शतकाची हुलकावणी!

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील ट्वेंटी-२० वर्ल्ड कप अंतिम सामन्यात संजू सॅमसनला सलग तिसऱ्या सामन्यात शतक झळकावण्याची मोठी संधी होती. मात्र अवघ्या ११ धावांनी त्याचे शतक हुकले. सॅमसनने ४६ चेंडूंत ८९ धावांची धडाकेबाज खेळी केली. त्याच्या या डावात ५ चौकार आणि तब्बल ८ खणखणीत षटकारांचा समावेश होता. संजूने मागील दोन सामन्यांत नाबाद ९७ व ८९ धावांची खेळी केली होती आणि फायनलमध्येही त्याने अर्धशतक पूर्ण केले. शाहिद आफ्रिदी ( २००९) आणि विराट कोहली ( २०१४) यांच्यानंतर ट्वेंटी-२० वर्ल्ड कपच्या उपांत्य व फायनलमध्ये अर्धशतक झळकावणारा तो तिसरा खेळाडू ठरला.

ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या इतिहासातील सर्वोत्तम सलामीची भागीदारी

अभिषेक शर्माला अखेर सूर गवसला. सलग तीन भोपळ्यानंतर त्याने झिम्बाब्वेविरुद्ध अर्धशतक झळकावले होते, परंतु त्यानंतर पुन्हा तो वारंवार अपयशी ठरला... पण, संघ व्यवस्थापनाने त्याच्यावरील विश्वास कायम राखताना फायनलमध्ये त्याला कायम राखले. त्याने हा विश्वास सार्थ ठरवला अन् सर्व दडपण झुगारून २१ चेंडूंत ६ चौकार व ३ षटकारांसह ५२ धावांची खेळी केली. त्याने संजू सॅमसनसह ९८ धावांची सलामी दिली आणि ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या इतिहासातील ही सर्वोत्तम सलामीची भागीदारी ठरली.

Comments
Add Comment