Sunday, March 8, 2026

Droupadi Murmu:राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंची जाहीर नाराजी; ममता बॅनर्जींबाबत काय म्हणाल्या?

Droupadi Murmu:राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंची जाहीर नाराजी;  ममता बॅनर्जींबाबत काय म्हणाल्या?

नवी दिल्ली : देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू (Draupadi murmu) या त्यांच्या नियोजित आंतरराष्ट्रीय संथाल सम्मेलनात सहभागी झाल्या होत्या. मात्र, राज्य सरकारने या कार्यक्रमाचे ठिकाण बदलले आणि कोणताही मंत्री किंवा वरिष्ठ अधिकारी त्यांच्या स्वागतासाठी उपस्थित नव्हते, ज्यामुळे प्रोटोकॉलचे उल्लंघन झाले आहे. पश्चिम बंगालच्या दार्जिलिंग येथ आयोजित कार्यक्रमासाठी राष्ट्रपती राज्यात आल्यानंतरही त्यांच्या स्वागतासाठी मुख्यमंत्री ममता बनर्जी (Mamata Banerjee) किंवा त्यांच्या सरकारकडून कोणीही मंत्री आला नसल्याने हि वागणूक खटकणारी आणि देशाच्या राष्ट्रपतींच अवमान असल्याची भावना आता सर्वस्थरातून व्यक्त केली जात आहे. याबाबत आता स्वत: द्रौपदी मुर्मू यांनी खंत बोलून दाखवली आहे.

राष्ट्रपतींनी याबाबत निराशा व्यक्त केली आणि म्हटले की, "कदाचित त्या (ममता बॅनर्जी) माझ्यावर नाराज आहेत," वादाची पार्श्वभूमी आणि घटनाकार्यक्रमाचे ठिकाण बदलणे: मूलतः हे सम्मेलन गोसाईनपूर येथे आयोजित करण्यात आले होते, पण राज्य सरकारने ते बिधाननगर येथे हलवले. राष्ट्रपतींना अतिरिक्त ३० किलोमीटर प्रवास करावा लागला, अव्यवस्था झाली. यामुळे कमी लोक उपस्थित राहिले आणि राष्ट्रपतींनी याबाबत दुःख व्यक्त केले. राष्ट्रपतींच्या पदाला अपेक्षित सन्मान आणि प्रोटोकॉल दिला गेला नाही. याबाबत राष्ट्रपतींनी स्वतः भाषणात उल्लेख केला आणि राज्य सरकारच्या अनुपस्थितीवर प्रश्न उपस्थित केला.

यावेळी बोलताना राष्ट्रपती मुर्मू म्हणाल्या, "मी ममता बॅनर्जींना माझ्या छोट्या बहिणीप्रमाणे मानते, पण कदाचित त्या माझ्यावर रागावल्या आहेत." हे वक्तव्य उत्तर बंगालमधील आदिवासी समाजासाठी आयोजित कार्यक्रमात केले गेले. दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या घटनेवर सडकून टीका केली आणि तृणमूल काँग्रेस (टीएमसी) सरकारने "सर्व मर्यादा ओलांडल्या" असा आरोप केला. तर गृहमंत्री अमित शाह यांनी टीएमसीने "पातळी सोडली" असे म्हटले आहे. उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन यांनीही या प्रोटोकॉल उल्लंघनाची टीका केली आणि म्हणाले की, राष्ट्रपतींच्या पदाला अपेक्षित सन्मान दिला गेला नाही. तर दुसरीकडे मुख्यमंत्री ममता बॅनर्जींनी, "भाजपने राष्ट्रपतीपदाचे राजकारण करू नये", असा पलटवार केला आहे.

राष्ट्रपतींच्या संदर्भात ममता बॅनर्जी सरकारची भूमिका निषेधार्ह

दुसरीकडे याच मुद्द्यावर बोट ठेवत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही टीका करत नाराजी व्यक्त केली आहे. ममता बॅनर्जी सरकारचे वर्तन म्हणजे लोकशाही आणि प्रत्येक भारतीयाचा अपमान करणारे आहे. राष्ट्रपतींच्या संदर्भात ममता बॅनर्जी सरकारची भूमिका निषेधार्ह. अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ममता बॅनर्जी यांच्यावर कठोर टीका केली आहे. राष्ट्रपती द्रौपदी मूर्मुंसोबत झालेल्या व्यवहारावरून बॅनर्जींवर चौफेर टीका होत आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >