सेमी फायनलच्या दिवशी अर्जुनचं लग्न, फायनलच्या दिवशी पृथ्वीचा साखरपुडा

मुंबई : गोव्याकडून डोमेस्टिक आणि लखनऊ सुपर जायंट्सकडून आयपीएल खेळणाऱ्या क्रिकेटपटू अर्जुन तेंडुलकरचे लग्न बिझनेसवुमन सानिया चंडोकशी झाले. हे लग्न गुरुवार ५ मार्च २०२६ म्हणजेच भारताच्या टी ट्वेंटी वर्ल्डकपच्या सेमी फायनलच्या दिवशी झाले. पाठोपाठ महाराष्ट्राकडून डोमेस्टिक आणि दिल्ली कॅपिटल्सकडून आयपीएल खेळणाऱ्या क्रिकेटपटू पृथ्वी शॉचा साखरपुडा झाला. हा साखरपुडा रविवार ८ मार्च २०२६ म्हणजेच भारताच्या टी ट्वेंटी वर्ल्डकपच्या फायनलच्या दिवशी झाला. आंतरराष्ट्रीय महिला दिनाचा योग साधून पृथ्वीने त्याची गर्लफ्रेंड आकृती अग्रवालशी साखरपुडा केला.





'मैदानावर षटकार मारण्यापासून ते आयुष्यभरापर्यंत. ही माझी परिपूर्ण खेळी आहे' असे टाइप करून पृथ्वीने साखरपुड्याचे फोटो पोस्ट केले आहेत. पृथ्वीने स्वतःच्या इन्स्टावर साखरपुड्याचे फोटो पोस्ट केले. हे फोटो आता व्हायरल होत आहेत. चाहते आणि सहकारी क्रिकेटपटू यांच्याकडून पृथ्वीवर अभिनंदनाचा वर्षाव सुरू आहे.


पृथ्वी शॉची होणारी वधू, आकृती अग्रवाल ही सोशल मीडिया इन्फ्लुएंसर आहे. आकृतीचे इन्स्टावर ३२ लाखांपेक्षा जास्त फॉलोअर आणि यूट्युबवर ९० हजारांपेक्षा जास्त सबस्क्रायबर आहेत. ती फॅशन, लाईफस्टाईल आणि डान्सशी संबंधित अनेक रील करत असते. लवकरच ती त्रिमुखा या तेलुगु चित्रपटातून अभिनेत्री म्हणून मोठ्या पडद्यावर येणार आहे.


पृथ्वी भारताकडून टेस्ट, वन डे आणि टी ट्वेंटी या तिन्ही प्रकारात काही काळ खेळला आहे. मागील चार वर्षांपासून तो टीम इंडियात पुन्हा येण्यासाठी प्रयत्न करत आहे. डोमेस्टिक क्रिकेटमध्ये तो धावांचा पाऊस पाडत आहे. सुरुवातील मुंबईकडून खेळणारा पृथ्वी आता महाराष्ट्र क्रिकेट संघाकडून डोमेस्टिक क्रिकेट खेळत आहे. पृथ्वीने भारतीय संघासाठी पाच कसोटी, सहा एकदिवसीय आणि एक टी-२० आंतरराष्ट्रीय सामना खेळला आहे. या काळात त्याने कसोटी सामन्यांमध्ये ४२.३७ च्या सरासरीने ३३९ धावा केल्या आहेत. यात एक शतक आणि दोन अर्धशतकांचा समावेश आहे. एकदिवसीय सामन्यांमध्ये त्याने ३१.५० च्या सरासरीने १८९ धावा केल्या आहेत. तो जेमतेम २६ वर्षांचा आहे. त्याने भारताकडून शेवटचा सामना जुलै २०२१ मध्ये कोलंबोच्या आर. प्रेमदासा स्टेडियमवर श्रीलंकेविरुद्ध खेळला होता.

Comments
Add Comment

Kagiso Rabada : कागिसो रबाडा ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या कसोटी मालिकेला मुकण्याची शक्यता

नवी दिल्ली : ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या कसोटी मालिकेच्या सुरुवातीपूर्वी दक्षिण आफ्रिकेला मोठा धक्का बसला आहे.

Roger Federer : रॉजर फेडररचा 'टेनिस हॉल ऑफ फेम'मध्ये समावेश

नवी दिल्ली : ऱ्होड आयलंडमधील न्यूपोर्ट येथे 'इंटरनॅशनल टेनिस हॉल ऑफ फेम'मध्ये समावेश होताना २० वेळा ग्रँडस्लॅम

Dwayne Bravo No. 47 retired : ट्रिनबागो नाइट रायडर्सकडून ड्वेन ब्राव्होची ४७ क्रमांकाची जर्सी निवृत्त

नवी दिल्ली : ट्रिनबागो नाइट रायडर्स (टीकेआर) संघाने ड्वेन ब्राव्होची प्रतिष्ठित ४७ क्रमांकाची जर्सी निवृत्त

Namibia T20I Tri-Series : दक्षिण आफ्रिकेचा झिम्बाब्वेवर सात गडी राखून दणदणीत विजय

नवी दिल्ली : झिम्बाब्वेला सात गडी राखून पराभूत करून दक्षिण आफ्रिकेने तिरंगी मालिकेत आपले आव्हान कायम ठेवले आहे.

Asian Games 2026 : दुखापतीमुळे नीरजची माघार; यश वीरला मिळणार संधी ?

नवी दिल्ली : आगामी आशियाई क्रीडा स्पर्धेत पुरुषांच्या भालाफेक प्रकारात भारताच्या सुवर्णपदकाच्या आशांना मोठा

FIH Hockey World Cup : अर्जेंटिनाला महिला हॉकी विश्वचषकाचे विजेतेपद; नेदरलँड्सवर पेनल्टी शूटआऊटमध्ये मात

ॲमस्टेलवीन : अर्जेंटिनाने महिला हॉकी विश्वचषक जिंकला. एका रोमांचक अंतिम सामन्यात त्यांनी सह-यजमान नेदरलँड्सला