‘वन नेशन-वन रेशन’मध्ये महाराष्ट्र अव्वल

- १८.९७ लाख परप्रांतीयांनी घेतले धान्य; शिवभोजन थाळीचाही ४ कोटींचा टप्पा पार


मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या ‘वन नेशन, वन रेशन कार्ड’ या महत्त्वाकांक्षी योजनेचा लाभ घेण्यात महाराष्ट्र राज्य देशात आघाडीवर असल्याचे स्पष्ट झाले आहे. राज्याच्या आर्थिक पाहणी (२०२५-२६) अहवालानुसार, आतापर्यंत तब्बल १८.९७ लाख परराज्यांतील शिधापत्रिकाधारकांनी महाराष्ट्रातील सार्वजनिक वितरण व्यवस्थेतून धान्य उचलले असून, केंद्र सरकारच्या या अंत्योदय योजनेचा मोठा आधार स्थलांतरित श्रमिकांना मिळाला आहे.


रोजगाराच्या निमित्ताने महाराष्ट्रात येणाऱ्या परप्रांतीय मजुरांना अन्नासाठी वणवण करावी लागू नये, यासाठी 'आंतरराज्यीय पोर्टेबिलिटी' योजना सुरू करण्यात आली. अहवालानुसार, उत्तर प्रदेश, बिहार व इतर राज्यांतील १८.९७ लाख कार्डधारकांनी महाराष्ट्रातून धान्य घेतले. याउलट, महाराष्ट्रातील १.४० लाख कार्डधारकांनी राज्याबाहेर असताना या सुविधेचा लाभ घेतला आहे. रेशन दुकानांवरील पारदर्शक ऑनलाईन यंत्रणेमुळे हे शक्य झाले आहे.


राज्यातील गरीब आणि गरजू नागरिकांना सवलतीच्या दरात सकस आहार देणाऱ्या ‘शिवभोजन’ योजनेनेही उल्लेखनीय टप्पा गाठला आहे. अहवालातील आकडेवारीनुसार, राज्यात सध्या १ हजार ८७४ शिवभोजन केंद्रे कार्यरत आहेत. नोव्हेंबर २०२५ पर्यंत तब्बल ४.०९ कोटी शिवभोजन थाळ्यांचे वाटप पूर्ण झाले आहे.



अहवालातील ठळक निष्कर्ष :


महाराष्ट्रात रेशन घेणारे परप्रांतीय - १८.९७ लाख
इतर राज्यांत रेशन घेणारे महाराष्ट्रीयन - १.४० लाख
एकूण शिवभोजन केंद्रे - १,८७४
वाटप झालेल्या एकूण थाळ्या - ४.०९ कोटी

Comments
Add Comment

आस्थापन खर्च कमी करण्यासाठी पदे रिक्त ठेवू नका

स्थायी समिती अध्यक्षांनी दिले पालिका प्रशासनाला निर्देश मुंबई : मुंबई महापालिकेत मागील चार वर्षांमध्ये

महाराष्ट्राचा हरित निर्देशांक सुधारला

मुंबई : औद्योगिक आणि आर्थिक प्रगतीचा वेग कायम राखतानाच महाराष्ट्र राज्याने पर्यावरण संवर्धनाच्या क्षेत्रातही

उत्तर-पश्चिम मुंबईत महिला दिनानिमित्त ‘साडी वॉकाथॉन’

मुंबई : आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या निमित्ताने उत्तर-पश्चिम मुंबईतील भारतीय जनता पक्षाच्या (भाजप) महिला

आनंदाची बातमी, मुंबईचे ससून बंदर होणार 'ग्लोबल'

जगातील सर्वोत्तम बंदर बनविण्याचा मंत्री नितेश राणे यांचा संकल्प; फिनलंडच्या मदतीने कायापालट करणार मुंबई :

Mumbai Metro : महिला दिनी मेट्रोची ‘कमान’ महिलांच्या हाती

मुंबई : आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन (MMRC) कडून एक विशेष उपक्रम राबविण्यात येत आहे.

Women's Day : जागतिक महिला दिनानिमित्त राज्यात ‘एचपीव्ही’ लसीकरण मोहीमेचा शुभारंभ

- आरोग्य क्षेत्रातील कर्तृत्ववान महिलांचा सन्मान मुंबई : जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून सार्वजनिक आरोग्य