Saturday, March 7, 2026

दुबई विमानतळ बंद, विमानवाहतूक ठप्प

दुबई विमानतळ बंद, विमानवाहतूक ठप्प

दुबई : अमेरिका - इस्रायल विरुद्ध इराण असे युद्ध पश्चिम आशियात सुरू आहे. इराणने अमेरिकेच्या सैन्याचे तळ ज्या देशांमध्ये आहेत त्या अरब देशांतील महत्त्वाच्या ठिकाणांनाही लक्ष्य केले आहे. या युद्धाचे परिणाम दिसू लागले आहे. पश्चिम आशियात २८ फेब्रुवारी २०२६ पासून सुरू झालेल्या या युद्धाने आता आठव्या दिवसांत प्रवेश केला आहे. दोन्ही बाजू आक्रमक असून एकमेकांविरोधात हल्ले करत आहेत. युद्ध सुरू असतानाच शत्रूचे मानसिकदृष्ट्या खच्चीकरण करण्यासाठी अपप्रचाराची मोहीम दोन्ही बाजूने जोरात चालवली जात आहे. या अशांत आणि अस्थिर वातावरणामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असतानाच दुबईतून एक चिंता वाढवणारी बातमी आली आहे.

दुबईचे आंतरराष्ट्रीय विमानतळ पुढील आदेशापर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय झाला आहे. दुबईच्या विमानतळावर सकाळीच इराणच्या क्षेपणास्त्राचे तुकडे पडले. यानंतर खबरदारीचा उपाय म्हणून दुबईचे आंतरराष्ट्रीय विमानतळ पुढील आदेशापर्यंत बंद ठेवत असल्याचे जाहीर करण्यात आले.

इराणने दुबईवर सकाळी क्षेपणास्त्राद्वारे हवाई हल्ला केला, त्यावेळी क्षेपणास्त्रविरोधी क्षेपणास्त्राने इराणचे क्षेपणास्त्र हवेतच नष्ट केले. या नष्ट झालेल्या क्षेपणास्त्राचे तुकडे दुबईच्या विमानतळावर पडले. क्षेपणास्त्राचे तुकडे पडताच विमानतळाव भीतीचे वातावरण निर्माण झाले. खबरदारीचा उपाय म्हणून विमानतळ प्रशासनाने पुढील आदेशापर्यंत दुबईचे आंतरराष्ट्रीय विमानतळ ठेवत असल्याचे जाहीर केले. विमानतळ बंद असल्यामुळे या विमानतळावरून होणारी विमानवाहतूक ठप्प आहे. अखेरच्या वृत्तानुसार विमानतळ अंशतः सुरू करण्यात आले आहे. प्रवाशांना आपल्या विमान कंपनीशी संपर्कात राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. जोपर्यंत तुमची एअरलाईन स्वतः संपर्क करून फ्लाईट कन्फर्म असल्याचे सांगत नाही, तोपर्यंत विमानतळाच्या दिशेने येऊ नका, असे प्रवाशांना सांगण्यात आले आहे. युद्धाच्या परिस्थितीमुळे उड्डाणांच्या वेळा सतत बदलत आहेत. ठराविक उड्डाणे दुबई आंतरराष्ट्रीय आणि अल मकतूम विमानतळावरून ऑपरेट केली जात आहेत.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >