- हिंदू नववर्षाच्या शुभ मुहूर्तावर धुरंधर होणार सर्वत्र प्रदर्शित
मुंबई : आदित्य धर दिग्दर्शित "धुरंधर: द रिव्हेंज" चा शनिवार ७ मार्च रोजी सकाळी ११ वाजता ट्रेलर रिलीज झाला आहे. you are still not ready for this म्हणत धुरंधर च्या निर्मात्यांनी हा ट्रेलर प्रदर्शित केला आहे. हा ट्रेलर प्रदर्शित होताच प्रेक्षकांच्या पसंतीस पडला आहे. रहमान डकैतच्या मृत्यूनंतरची परिस्थिती ट्रेलर मधून दाखवण्यात आली आहे.
३.२५ मिनिटांच्या ट्रेलरने प्रेक्षकांना वेड लावलं आहे. धुरंधर २ सूड घेण्यासाठी नाही तर आपलं वर्चस्व गाजवण्यासाठी येतोय, अशा प्रकारच्या प्रतिक्रिया प्रेक्षकांनी दिल्या आहेत.
Told you it was personal . . . Trailer Out Now Book Now for Paid Previews on 18th March only. 🔗- https://t.co/xjI12DMQCm#DhurandharTheRevenge releases worldwide on 19 March, on Gudi Padwa, Ugadi, and Eid. Hindi | Telugu | Tamil | Kannada | Malayalam @rampalarjun… pic.twitter.com/rvBfp0SKeZ
— Ranveer Singh (@RanveerOfficial) March 7, 2026
हा चित्रपट हिंदू नववर्षाच्या शुभ मुहूर्तावर म्हणजेच गुढीपाडव्याला १९ मार्च रोजी हिंदीसह तेलगू, तमिळ, कन्नड आणि मल्याळम अशा पाच भाषांमध्ये जगभरात प्रदर्शित होणार आहे. धुरंधरच्या पहिल्या भागाने जागतिक स्तरावर १,३०० कोटी रुपयांहून अधिक कमाई केली होती. तर भारतात ८०० कोटींहून अधिक कमाई करणारा हा आतापर्यंतचा सर्वात यशस्वी हिंदी चित्रपट ठरला.
अशातच आता 'जहाँ दर्द है वहा मर्द है ...' असं म्हणत धुरंदर २ चित्रपटाचा ट्रेलर सर्वत्र रिलीज झाला असून चाहत्यांमध्ये चित्रपट पाहण्याची प्रचंड उत्सुकता दिसून येत आहे.







