Saturday, March 7, 2026

Pune Crime : महाविद्यालयाबाहेर तरुणाचे अश्लील कृत्य; २२ वर्षीय युवक ताब्यात

Pune Crime : महाविद्यालयाबाहेर तरुणाचे अश्लील कृत्य; २२ वर्षीय युवक ताब्यात

पुणे : शहरातील शिवाजीनगर भागात असलेल्या एका महाविद्यालयाच्या परिसरात विद्यार्थिनींकडे अश्लील हावभाव करत बसणाऱ्या तरुणाला पोलिसांनी अटक केली आहे. या घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून विद्यार्थिनींच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा चर्चेत आला आहे.

महाविद्यालय परिसरात संशयास्पद हालचाली 

माहितीनुसार, ४ मार्च रोजी दुपारच्या सुमारास महाविद्यालयासमोर उभी असलेल्या कारमध्ये बसून एक युवक विद्यार्थिनींकडे पाहत अशोभनीय वर्तन करत असल्याचे काही विद्यार्थिनींच्या निदर्शनास आले. तो वारंवार कारमध्ये बसून मोबाइल हातात घेऊन अश्लील कृत्य करत करत असल्याचे दिसले. या प्रकारामुळे महाविद्यालयाच्या परिसरात खळबळ उडाली.

तक्रारीनंतर पोलिसांची तत्काळ कारवाई

घटनेबाबत स्थानिक नागरिक आणि विद्यार्थिनींनी संताप व्यक्त केला. या प्रकरणाची माहिती एका महिला लोकप्रतिनिधींना मिळाल्यानंतर त्यांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात अधिकृत तक्रार दाखल केली. तक्रार मिळताच पोलिसांनी तपास सुरू करून संबंधित युवकाला ताब्यात घेतले. आरोपीचे नाव प्रणव केदार वझे (वय २२) असे असून तो महानगरपालिकेतील एका वरिष्ठ अधिकाऱ्याचा मुलगा असल्याची माहिती समोर आली आहे.

पोलिसांच्या प्राथमिक तपासात हा प्रकार एकदाच घडलेला नसून यापूर्वीही अशाच तक्रारी समोर आल्याची घटना घडली होती. या घटनेनंतर महाविद्यालयातील विद्यार्थी आणि पालकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. परिसरात पोलिसांची गस्त वाढवावी आणि आरोपीवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी पालकांकडून करण्यात येत आहे. शिवाजीनगर पोलिसांनी आरोपीविरुद्ध संबंधित कलमांनुसार गुन्हा नोंदवला असून या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.

Comments
Add Comment