Maha Budget 2026 : मंत्री नितेश राणे यांच्या खात्याला अर्थबळ

मुख्यमंत्री मत्स्यसंपदा योजना जाहीर; दरवर्षी १ हजार २४० कोटींची तरतूद करणार


जलवाहतुकीचे जाळे ३४० किमीपर्यंत विस्तारणार, नवीन टर्मिनल्ससाठी ६ हजार ६०० कोटींची तरतूद


मुंबई : मत्स्यव्यवसाय आणि बंदरे विकास विभागाच्या माध्यमातून अव्वल कामगिरी करणाऱ्या मंत्री नितेश राणे यांच्या खात्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्पातून नवे अर्थबळ दिले. प्रधानमंत्री मत्स्यसंपदा योजनेच्या धर्तीवर राज्याची 'मुख्यमंत्री मत्स्यसंपदा योजना' जाहीर करीत दरवर्षी १ हजार २४० कोटींची तरतूद करणार असल्याचे स्पष्ट केले. अशी योजना जाहीर करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य ठरले आहे.


देवेंद्र फडणवीस म्हणाले, मुख्यमंत्री मत्स्यसंपदा योजनेंतर्गत प्रतिवर्षी १ हजार २४० कोटी रुपये देण्यात येतील. राज्यातील २० हजार ५९४ मासेमारांना याचा लाभ होणार आहे. त्याशिवाय सध्याचे १२५ किमी जलमार्गांचे जाळे ३४० किमीपर्यंत विस्तारण्याची घोषणाही मुख्यमंत्र्यांनी केली. त्यासाठी विद्यमान २१ जलमार्गांवरील २० टर्मिनल्सचे अद्ययावतीकरण केले जाणार आहे. ११ नवीन जलमार्गांवर २४ नवीन टर्मिनल्स उभारले जातील. त्यासाठी ६ हजार ६०० कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे. त्याशिवाय मुंबईतील रेडिओ क्लब येथील नवीन जेट्टी डिसेंबर २०२७ पर्यंत पूर्ण करण्याची ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली.


..................


मरीन शिपयार्ड क्लस्टर विकसित करणार


राज्यात मरीन शिपयार्ड क्लस्टर विकसित करण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी अर्थसंकल्पात केली. मासेमारांसाठी सातपाटी येथे अत्याधुनिक मत्स्यबंदर उभारण्यासह आसपासच्या ४४ गावांत कौशल्य विकासाचे उपक्रम राबविणार असल्याचे त्यांनी सांगितले. त्याशिवाय वाढवण बंदराजवळ चौथी मुंबई विकसित केली जाईल. लॉजिस्टीक्स आणि वेअर हाऊसिंगसाठी विकास केंद्रे निर्माण करणार आहोत. वाढवण बंदरामुळे १२ लाखांहून अधिक रोजगार निर्माण होणार असल्याची माहिती फडणवीस यांनी दिली.

Comments
Add Comment

Sunetra Pawar Emotional Remine Ajit Pawar : दादा, काळ पुढे सरकला पण मन तुमच्यातच गुंतलंय...सुनेत्रा पवारांनी जागवल्या अजितदादांच्या आठवणी

मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणातील एक धडाडीचे नेतृत्व, माजी उपमुख्यमंत्री तथा दिवंगत नेते अजित पवार यांच्या

नेपाळमध्ये सत्तांतरानंतर नवा संदेश; बालेन शाह- मोदी संवादातून संबंध दृढ होण्याचे संकेत

काठमांडू : नेपाळच्या राजकारणात मोठ्या उलथापालथीनंतर नव्या नेतृत्वाचा उदय झाला आहे. बालेन शाह यांनी

Jyoti waghmare : ज्यांना पक्ष सांभाळता येत नाही, ते राज्य काय सांभाळणार? एकनाथ शिंदेंनी 'साहेब' म्हटले, पण उद्धव ठाकरेंनी...; ज्योती वाघमारेंचा घणाघात

नांदेड : राज्यसभेच्या खासदार ज्योती वाघमारे सध्या नांदेड जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून, यावेळी त्यांनी शिवसेना

निवासी व व्यावसायिक आस्थापनांना एलपीजी व पीएनजी गॅसचा अधिक चांगला व सुलभ पुरवठा उपलब्ध करून देणे, तसेच निश्चित कालावधीत पीएनजी सेवांचा विस्तार करणेबाबत दिल्लीत बैठक संपन्

राज्यात पीएनजी नेटवर्क वाढीसाठी केंद्र शासनाकडून तांत्रिक सहाय्य तसेच पायाभूत सुविधा उभारणीसाठी आर्थिक पाठबळ

Deccan Queen : ९६ वर्षांची 'दख्खनची राणी' नटली, सोफा सेट, वार्ली आर्ट अन्...डायनिंग डब्याचं नूतनीकरण; मुंबई-पुणेदरम्यानचा रॉयल प्रवास

मुंबई : मुंबई आणि पुणे दरम्यान धावणारी रेल्वेची शान, म्हणजेच 'डेक्कन क्वीन' (दख्खनची राणी), आता ९६ वर्षांची झाली

Middle East War Beer Price Hike : आता 'चीअर्स' करणं पडणार महाग! मध्य-पूर्वेतील युद्धामुळे बियर महागणार ? वाचा सविस्तर

मध्य-पूर्वेतील वाढत्या लष्करी संघर्षामुळे जागतिक स्तरावर चिंतेचे ढग दाटले असून, त्याचे गंभीर परिणाम आता सर्वच