Maha Budget 2026 : २५ लाख बहिणी होणार लखपती दिदी; महिला वर्गासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मोठ्या घोषणा

मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत महाराष्ट्र राज्याचा वर्ष २०२६-२७ साठीचा अर्थसंकल्प सादर केला. यावेळी मुख्यमत्री फडणवीस यांनी महिलांच्या कल्याणासाठीही मोठ्या घोषणा केली. लाडकी बहिण योजना पुढे सुरू ठेवण्यासोबतच, त्यांनी लखपती दिदी करण्यासंदर्भात, महिला स्वयंसहाय्यता समूहांसाठी आणि एकल महिलांसाठीही मोठ्या घोषणा केल्या आहेत.



२५ लाख बहिणींना लखपती दिदी करण्याचे उद्दिष्ट :


अर्थसंकल्पावेळी महिला वर्गाशी संबंधित योजनांसंदर्भात भाष्य करताना, "महाराष्ट्र ग्रामिण जीवनोन्नती अभियानांतर्गत आतापर्यंत सुमारे ३७ लाख 'लखपती दिदी' झाल्या आहेत. आता २०२६-२०२७ मध्ये आणखी २५ लाख बहिणींना 'लखपती दिदी' करण्याचे उद्दिष्ट आहे," अशी घोषणा फडणवीस यांनी केली. याशिवाय, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 'लाडकी बहिण' योजनाही पुढे चालू ठेवण्यासंदर्भात भाष्य केले.


एकल महिलांच्या कल्याणासाठीही घोषणा :

दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एकल महिलांच्या कल्याणासाठीही मोठी घोषणा केली आहे. "सध्या राज्यांतील सर्व जिल्ह्यांमध्ये एकल महिलांचे सर्वेक्षण सुरू असून, ते पूर्ण झाल्यानंतर, त्याचे योग्य विश्लेषण करून, एकल महिलांच्या कल्याणासाठी सुयोग्य धोरण आणले जाईल", असे फडणवीस यांनी यावेळी जाहीर केले.



"उमेद मॉल जिल्हा विक्री केंद्र उभारणीस मान्यता" :


महिला स्वयंसहाय्यता समूहांच्या वस्तूंसंदर्भात आणि त्यांच्या विक्रीसंदर्भात बोलताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, "महाराष्ट्र राज्य ग्रामिण जीवनोन्नती अभियानांतर्गत स्थापन करण्यात आलेल्या, महिला स्वयंसहाय्यता समूहांच्या वस्तू आणि विक्रीसाठी हक्काची बाजारपेठ मिळवून देण्यासाठी पहिल्या टप्प्यांत १३ जिल्ह्यांमध्ये 'उमेद मॉल जिल्हा विक्री केंद्र उभारणीस मान्यता देण्यात आली आहे.

Comments
Add Comment

Sunetra Pawar Emotional Remine Ajit Pawar : दादा, काळ पुढे सरकला पण मन तुमच्यातच गुंतलंय...सुनेत्रा पवारांनी जागवल्या अजितदादांच्या आठवणी

मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणातील एक धडाडीचे नेतृत्व, माजी उपमुख्यमंत्री तथा दिवंगत नेते अजित पवार यांच्या

नेपाळमध्ये सत्तांतरानंतर नवा संदेश; बालेन शाह- मोदी संवादातून संबंध दृढ होण्याचे संकेत

काठमांडू : नेपाळच्या राजकारणात मोठ्या उलथापालथीनंतर नव्या नेतृत्वाचा उदय झाला आहे. बालेन शाह यांनी

Jyoti waghmare : ज्यांना पक्ष सांभाळता येत नाही, ते राज्य काय सांभाळणार? एकनाथ शिंदेंनी 'साहेब' म्हटले, पण उद्धव ठाकरेंनी...; ज्योती वाघमारेंचा घणाघात

नांदेड : राज्यसभेच्या खासदार ज्योती वाघमारे सध्या नांदेड जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून, यावेळी त्यांनी शिवसेना

निवासी व व्यावसायिक आस्थापनांना एलपीजी व पीएनजी गॅसचा अधिक चांगला व सुलभ पुरवठा उपलब्ध करून देणे, तसेच निश्चित कालावधीत पीएनजी सेवांचा विस्तार करणेबाबत दिल्लीत बैठक संपन्

राज्यात पीएनजी नेटवर्क वाढीसाठी केंद्र शासनाकडून तांत्रिक सहाय्य तसेच पायाभूत सुविधा उभारणीसाठी आर्थिक पाठबळ

Deccan Queen : ९६ वर्षांची 'दख्खनची राणी' नटली, सोफा सेट, वार्ली आर्ट अन्...डायनिंग डब्याचं नूतनीकरण; मुंबई-पुणेदरम्यानचा रॉयल प्रवास

मुंबई : मुंबई आणि पुणे दरम्यान धावणारी रेल्वेची शान, म्हणजेच 'डेक्कन क्वीन' (दख्खनची राणी), आता ९६ वर्षांची झाली

Middle East War Beer Price Hike : आता 'चीअर्स' करणं पडणार महाग! मध्य-पूर्वेतील युद्धामुळे बियर महागणार ? वाचा सविस्तर

मध्य-पूर्वेतील वाढत्या लष्करी संघर्षामुळे जागतिक स्तरावर चिंतेचे ढग दाटले असून, त्याचे गंभीर परिणाम आता सर्वच