Thursday, March 5, 2026

जिष्णू देव वर्मा महाराष्ट्राचे नवे राज्यपाल

जिष्णू देव वर्मा महाराष्ट्राचे नवे राज्यपाल

नवी दिल्ली : राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू यांनी महाराष्ट्रासह नऊ राज्यांच्या राज्यपालांच्या बदल्या केल्या असून नवीन राज्यपालांच्या नियुक्त्या केल्या आहेत. त्यामध्ये जिष्णू देव वर्मा यांची महाराष्ट्राचे राज्यपाल पदी नियुक्ती करण्यात आली. तामिळनाडूचे राज्यपाल आर एन रवी यांची पश्चिम बंगालचे राज्यपाल म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. राष्ट्रपतींनी पश्चिम बंगालचे राज्यपाल डॉ. सी.व्ही. आनंद बोस यांचा राजीनामा स्वीकारला आहे.

राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू यांनी हिमाचल प्रदेशचे राज्यपाल श्री शिव प्रताप शुक्ला यांची तेलंगणाचे राज्यपाल म्हणून नियुक्ती केली. तेलंगणाचे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांची महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून नियुक्ती तर नंद किशोर यादव यांची नागालँडचे राज्यपाल म्हणून नियुक्ती करण्यात आली. लेफ्टनंट जनरल (निवृत्त) सय्यद अता हसनैन यांची बिहारचे राज्यपालदी, तामिळनाडूचे राज्यपाल आर.एन. रवी यांची पश्चिम बंगालचे राज्यपालपदी, केरळचे राज्यपाल राजेंद्र विश्वनाथ आर्लेकर यांची तामिळनाडूच्या राज्यपालपदी, लडाखचे लेफ्टनंट गव्हर्नर श्री कविंदर गुप्ता यांची हिमाचल प्रदेशचे राज्यपालपदी, दिल्लीचे लेफ्टनंट गव्हर्नर श्री विनय कुमार सक्सेना यांची लडाखचे लेफ्टनंट गव्हर्नर म्हणून नियुक्ती केली आहे, तसेच दिल्लीचे नायब राज्यपाल तरनजित सिंग संधू यांची लेफ्टनंट गव्हर्नर म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

नव्या राज्यपालांच्या नियुक्तीचे आदेश जारी

  1. दिल्लीचे नायब राज्यपाल विनय कुमार सक्सेना यांची लडाखचे नायब राज्यपाल म्हणून नियुक्ती.
  2. तरनजित सिंग संधू यांची दिल्लीचे नायब राज्यपाल म्हणून नियुक्ती.
  3. हिमाचल प्रदेशचे राज्यपाल शिव प्रताप शुक्ला यांची तेलंगणाचे राज्यपाल म्हणून नियुक्ती.
  4. तेलंगणाचे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांची महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून नियुक्ती.
  5. नंद किशोर यादव यांची नागालँडचे राज्यपाल म्हणून नियुक्ती.
  6. लेफ्टनंट जनरल (निवृत्त) सय्यद अता हसनैन यांची बिहारचे राज्यपाल म्हणून नियुक्ती.
  7. तामिळनाडूचे राज्यपाल आर.एन. रवी यांची पश्चिम बंगालचे राज्यपाल म्हणून नियुक्ती.
  8. केरळचे राज्यपाल राजेंद्र विश्वनाथ आर्लेकर यांची तामिळनाडूच्या राज्यपालपदी नियुक्ती.
  9. लडाखचे नायब राज्यपाल कविंदर गुप्ता यांची हिमाचल प्रदेशचे राज्यपाल म्हणून नियुक्ती.
Comments
Add Comment