'मी मोठ्या बापाची लेक नाही पण शिंदेंनी माझ्या कामाला न्याय दिला'

शिवसेनेच्या राज्यसभा उमेदवार डॉ. ज्योती वाघमारे यांनी व्यक्त केली भावना


आपली उमेदवारी ही राज्यातील अडीच कोटी लाडक्या बहिणींची उमेदवारी


जातीपातीच्या भिंती मोडून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून कार्यकर्त्याला संधी


पक्षाकडून सर्वसामान्य कार्यकर्त्याला बळ देण्याचे काम – एकनाथ शिंदे


मुंबई : राजकारण करण्यासाठी बाप मोठा असावा लागतो, नाव मोठं लागतं, आडनाव मोठं लागतं, मी मोठ्या बापाची मुलगी नाही पण पक्षासाठी केलेली प्रामाणिक धडपड आणि काम यापुढे तुम्ही गरिब जरी असलात तरी शिवसेना मुख्य नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे लक्ष असते आणि ते न्याय देतात याचं उदाहरण आज समोर आहे, अशी भावना शिवसेनेच्या राज्यसभेच्या उमेदवार डॉ. ज्योती वाघमारे यांनी व्यक्त केली. शिवसेनेच्या आक्रमक प्रवक्त्या डॉ. वाघमारे यांनी आज उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी शिवसेनेचे खासदार संसदरत्न डॉ. श्रीकांत शिंदे, मंत्री दादाजी भुसे, मंत्री संजय शिरसाट,आमदार डॉ. मनिषा कायंदे, ज्येष्ठ नेते गजानन किर्तीकर, आनंदराव अडसूळ, राष्ट्रीय प्रवक्त्या शायना एन.सी आणि प्रमुख नेते उपस्थित होते.


उपमुख्यमंत्री शिंदे यांनी दिलेली राज्यसभेची उमेदवारी ही राज्यातील अडीच कोटी लाडक्या बहिणींची उमेदवारी आहे, अशी भावना डॉ. ज्योती वाघमारे यांनी यावेळी माध्यमांशी बोलताना व्यक्त केली. उमेदवारी अर्ज भरल्यानंतर डॉ. ज्योती वाघमारे यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्या म्हणाल्या की, उपमुख्यमंत्री शिंदे यांनी आज माझ्यासारख्या गरिब कुटुंबातील मुलीला, डॉ. भीमरावांच्या मुलीला दिलेला हा न्याय आहे. त्या म्हणाल्या की, माझी उमेदवारी ही बाबासाहेबांच्या हातातील पेनाची, सावित्रीबाई फुलेंच्या हातातील पाटीची आणि संविधानाने आम्हाला माणूस म्हणून जगण्यासाठी दिलेल्या अधिकाराची उमेदवारी आहे, असे सांगत त्यांनी महापुरुषांबाबत कृतज्ञता व्यक्त केली. आपल्या आई वडिलांना राज्यसभा काय हे माहित नाही आणि त्यांना सांगून देखील खरं वाटणार नाही. जातीपातीच्या भिंती मोडून उपमुख्यमंत्री शिंदे यांनी सर्वसामान्य कार्यकर्त्याला संधी दिली, असे डॉ. वाघमारे म्हणाल्या. पक्षाने दाखवलेला विश्वास सार्थ करेन, असा विश्वास व्यक्त करत डॉ. वाघमारे यांनी उपमुख्यमंत्री शिंदे, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, शिवसेना मंत्री, खासदार, आमदार यांचे आभार मानले.


डॉ. ज्योती वाघमारे या मूळच्या सोलापूरच्या असून त्यांनी इंग्रजी साहित्यात पीएचडी केली आहे. त्यांनी वालचंद महाविद्यालयात १० वर्ष प्राध्यापिका म्हणून काम केले. डॉ. वाघमारे यांचे मराठी, हिंदी, इंग्रजी, तेलगू आणि कन्नड या पाच भाषांवर प्रभुत्व आहे. त्यांचे वडील नागनाथ वाघमारे हे दलित पँथरचे कार्यकर्ते होते. कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी नागनाथ वाघमारे यांनी हॉटेलमध्ये वेटर म्हणून तसेच काहीकाळ बांधकाम मजूर म्हणून काम केले. पत्र्याच्या शेडमध्ये राहणाऱ्या, शाळेत अनवाणी जाऊन अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत ज्योती यांनी दहावी तसेच बारावीत परीक्षेत चांगले गुण मिळवले. उच्चशिक्षणाचा उपयोग सामाजिक जनजागृतीसाठी व्हावा, या उद्देशाने डॉ. वाघमारे यांनी महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश या राज्यांत डॉ. बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा बसवेश्वर यांच्या जीवनावर आधारित व्याख्यानं दिली आहेत. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी महिलांना राजकारणात समान हक्क, निर्णयप्रक्रियेत सहभाग आणि नेतृत्वाची संधी मिळावी, अशी जी दूरदृष्टी मांडली होती. महात्मा ज्योतिबा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी शिक्षण व सामाजिक समतेसाठी उभारलेला लढा आज अशा सुशिक्षित आणि जिद्दी प्रतिनिधित्वातून पुढे जाताना दिसतो. उपमुख्यमंत्री शिंदे यांनी डॉ. वाघमारे यांना दिलेली उमेदवारी हे सशक्त प्रतिबिंब आहे.



शिवसेनेत सर्वसामान्य कार्यकर्त्याला बळ देण्याचे काम – एकनाथ शिंदे


शिवसेना हा सर्वसामान्य कार्यकर्त्यांचा पक्ष आहे. हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे, धर्मवीर आनंद दिघे यांनी सामान्य कार्यकर्त्यांना मोठं केलं आणि तोच विचार घेऊन आम्ही पुढे चाललोय. मुख्यमंत्री असताना राज्यात लाडकी बहिण योजना राबवली. अनेक लाडक्या बहिणींच्या संसाराला हातभार लागला. शिवसेनेत मागील साडेतीन वर्षांपासून सर्वसामान्य कार्यकर्त्याला बळ देण्याचे काम करतोय, त्याचा एक भाग म्हणून डॉ. ज्योती वाघमारे यांना राज्यसभेची संधी दिलेली आहे. डॉ. वाघमारे या शिवसेनेची भूमिका, ध्येयधोरणं आणि पक्षाचे काम लोकांपर्यंत पोहोचवली. राज्य आणि राष्ट्रीय पातळीवरील सर्वसामान्यांच्या हिताचे प्रश्न त्या राज्यसभेत उपस्थित करतील. त्यांनी पक्षाकडे कोणतीही अपेक्षा व्यक्त केली नव्हती. शिवसेनेची निवड सार्थक ठरेल, असा विश्वास शिवसेना मुख्य नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला.

प्रा. डॉ. ज्योती वाघमारे यांचा परिचय


- इंग्रजी साहित्यात पीएचडी


- दहावीच्या परिक्षेत ज्योती वाघमारे यांना ८४% गुण मिळवून उत्तीर्ण झाल्या.


- बारावीच्या परिक्षेत पुणे विभागातून मागासवर्गीय विद्यार्थ्यांमध्ये प्रथम


- अर्धमागधी विषयात राज्यात प्रथम


- महिलांच्या प्रश्नांवरील संशोधनाला राज्यस्तरीय प्रथम पुरस्कार


- १० वर्षांहून अधिककाळ प्राध्यापिका म्हणून कामाचा अनुभव


मराठी, हिंदी, इंग्रजी, तेलगू आणि कन्नड या पाच भाषांवर प्रभुत्व


- डॉ. ज्योती वाघमारे सुरुवातीच्या काळात मानवी हक्क अभियान, विद्रोही संस्कृतिक चळवळ, आंबेडकरी चळवळीतून आपल्या कामाला सुरुवात केली.


- मागील १५ वर्षांपासून सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात प्रा. डॉ. ज्योती वाघमारे सक्रियपण काम करत आहेत.


- शिवसेना पक्षात ऐतिहासिक उठाव झाल्यानंतर प्रा. डॉ. ज्योती वाघमारे यांनी शिवसेना मुख्य नेते श्री. एकनाथ शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाचा स्वीकार करत एप्रिल २०२३ मध्ये शिवसेनेत प्रवेश केला.


- प्रा. डॉ. ज्योती वाघमारे यांची शिवसेना पक्षाच्या राज्य प्रवक्त्या आणि धाराशिव जिल्हा संपर्कप्रमुख म्हणून जबाबदारी सोपवण्यात आली.


- मागील अडीच वर्षात विविध मंचांवर आणि चर्चासत्रात शिवसेना आणि माननीय श्री. एकनाथजी शिंदे साहेबांनी केलेल्या ऐतिहासिक उठावाबाबत सडेतोड आणि मुद्देसूद बाजू मांडत शिवसेना प्रवक्त्या म्हणून प्रा. डॉ. ज्योती वाघमारे यांनी उपयुक्तता सिद्ध केलेली आहे.


- प्रा. डॉ. ज्योती वाघमारे यांनी शिवसेनेच्या ऐतिहासिक दसरा मेळाव्यांमध्ये केलेली भाषणं त्यांच्या वक्तृत्व आणि अभ्यासू व्यक्तिमत्वाची साक्ष देतात.


- शिवसेना नेतृत्वावर टीका करणाऱ्या विरोधकांना त्यांच्याच भाषेत किंवा त्याहून विखारी भाषेत सडेतोड उत्तरं देणाऱ्या प्रवक्त्या म्हणून प्रा. डॉ. ज्योती वाघमारे यांनी राजकारणात आपलं वेगळं स्थान निर्माण केलं आहे.


- महाराष्ट्राचा इतिहास, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार, संविधान, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा बसवेश्वर यांच्या जीवनावर प्रा. डॉ. ज्योती वाघमारे यांचा सखोल अभ्यास आहे.

Comments
Add Comment

रविवारी मोदी स्टेडियमवर भारत - न्यूझीलंड फायनल रंगणार, सेमी फायनलमध्ये भारताचा विजय

मुंबई : मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर चौकार-षटकारांचा पाऊस पडला. भारताच्या २५३ धावांना इंग्लंडकडूनही सडेतोड

जिष्णू देव वर्मा महाराष्ट्राचे नवे राज्यपाल

नवी दिल्ली : राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू यांनी महाराष्ट्रासह नऊ राज्यांच्या राज्यपालांच्या बदल्या केल्या असून

नागपूरचे जिल्हाधिकारी आता नागपूर महापालिकेचे आयुक्त

मुंबई : नागपूरचे जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटणकर यांची नागपूर महापालिकेच्या आयुक्तपदी बदली झाली आहे. नागपूर

नवी मुंबईत घरगुती ट्युशन क्लासचा स्लॅब कोसळला, एका मुलाचा मृत्यू आणि १० मुले जखमी

कोपरखैरणे : नवी मुंबईतील कोपरखैरणे येथे सेक्टर दोनमधील प्लॉट क्रमांक १२ येथे विद्याभवन अपार्टमेंटमधील

भटक्या श्वानांच्या नसबंदीकरण केंद्रांची क्षमता वाढवा

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबईतील भटक्या श्वानांचे नियंत्रण, निर्बीजीकरण, रेबीज प्रतिबंधक लसीकरण यासाठी

मुंबईच्या एफ दक्षिण आणि एफ उत्तर प्रभाग समितीमध्ये शिवसेनेच्या मानसी सातमकर यांचा विजय

मुंबई : मुंबई महापालिकेच्या प्रभाग समिती अध्यक्षपदासाठी गुरुवारी १७ प्रभाग समित्यांपैंकी ६ प्रभाग