मुंबई : महाराष्ट्रातील राज्यसभेच्या सात जागांसाठी बिनविरोध निवडणुकीची शक्यता वाढली आहे. भाजपने रामदास आठवले, विनोद तावडे, माया चिंतामण ईवनाते, रामराव वडकुते या चौघांना तर राष्ट्रवादी काँग्रेसने पार्थ पवारांना आणि शिवसेनेने डॉ. ज्योती वाघमारेंना उमेदवारी दिली आहे. मविआकडून शरद पवारांना उमेदवारी जाहीर झाली आहे. काँग्रेस आणि उबाठाने पवारांच्या उमेदवारीला पाठिंबा जाहीर केला आहे. तर महायुतीने आपापल्या आमदारांच्या संख्येचा विचार करून उमेदवार जाहीर केले आहेत.
महायुतीच्या उमेदवारांनी थोड्या वेळापूर्वीच उमेदवारी अर्ज भरले आहेत. शिवसेनेकडून उच्चशिक्षित असलेल्या डॉ. ज्योती वाघमारेंना राज्यसभेसाठी उमेदवारी मिळाली आहे. शिंदेंनी उच्चशिक्षित आणि तळागाळातील कार्यकर्त्याला राज्यसभेची उमेदवारी देऊन सर्वांनाच धक्का दिला आहे.
कोण आहेत ज्योती वाघमारे ?
मूळच्या सोलापूर जिल्ह्यातील महिला कार्यकर्त्या असलेल्या डॉ. ज्योती वाघमारे १५ वर्षांपासून सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात सक्रिय आहेत. एप्रिल २०२३ मध्ये त्यांनी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत प्रवेश केला होता. सध्या त्यांच्याकडे शिवसेनेच्या राज्य प्रवक्त्या आणि धाराशिव जिल्हा संपर्कप्रमुख पदाची जबाबदारी आहे. एकनाथ शिंदे यांची बाजू विविध माध्यमांमधून आणि चर्चासत्रांमधून अत्यंत आक्रमकपणे मांडण्याचे काम त्यांनी केले आहे. विशेषतः दसरा मेळाव्यातील त्यांच्या भाषणाने अनेकांचे लक्ष वेधून घेतले आहे.
डॉ. ज्योती वाघमारे यांचा प्रवास अत्यंत संघर्षातून झाला आहे. त्यांचे वडील नागनाथ वाघमारे हे दलित पँथरचे कार्यकर्ते होते. कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी त्यांनी हॉटेलमध्ये वेटर आणि बांधकाम मजूर म्हणूनही काम केले होते. त्यांच्या सामाजिक कार्याची दखल घेऊन सोलापूरच्या जनतेने त्यांना नगरसेवक म्हणून निवडून दिले होते. वडिलांचा हाच वारसा पुढे चालवत ज्योती वाघमारे यांनी मानवी हक्कांसाठी लढा उभारला. आंबेडकरी चळवळीतून आपल्या कामाला सुरुवात केली.
ज्योती वाघमारे यांनी इंग्रजी साहित्यात पीएचडी केली आहे. दहावीच्या परीक्षेत त्यांना ८४ टक्के मिळाले होते. बारावीत त्या पुणे विभागातून मागासवर्गीय विद्यार्थ्यांमध्ये प्रथम आल्या होत्या. त्यांचे मराठी, हिंदी, इंग्रजी, तेलगू आणि कन्नड या पाच भाषांवर प्रभूत्व आहे. शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर डॉ. ज्योती वाघमारे यांनी अल्पावधीतच आपली ओळख निर्माण केली. विरोधकांच्या टीकेला त्यांच्याच भाषेत सडेतोड उत्तर देणाऱ्या प्रवक्त्या म्हणून त्या ओळखल्या जातात. सलग तीन दसरा मेळाव्यांमध्ये त्यांनी आपल्या घणाघाती भाषणातून आदित्य ठाकरे, संजय राऊत आणि सुषमा अंधारे यांचा समाचार घेतला आहे. महाराष्ट्राचा इतिहास, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार आणि संविधानाचा त्यांचा सखोल अभ्यास ही त्यांची मोठी जमेची बाजू मानली जाते. त्यांनी काही काळ वृत्त निवेदिका म्हणून काम केले होते. तसेच वालचंद महाविद्यालयात प्राध्यापिका म्हणून दहा वर्ष त्यांनी काम केले होते.
एकनाथ शिंदे यांनी डॉ. ज्योती वाघमारे यांना उमेदवारी देऊन एकाच वेळी अनेक समीकरणं साधली आहेत. एक उच्चशिक्षित दलित महिला उमेदवार देऊन त्यांनी सर्वसमावेशक राजकारणाचा संदेश दिला आहे. तसेच सोलापूर आणि पश्चिम महाराष्ट्रात शिवसेनेचा विस्तार करण्यासाठी चतुराईने प्रयत्न सुरू केले आहेत.