Ahilyanagar: भरवस्तीत दुचाकीस्वाराचा गोळीबार; कुख्यात गुंड सागर मोहळकर रक्ताच्या थारोळ्यात

अहिल्यानगर: अहिल्यानगर जिल्ह्यातले जामखेड पुन्हा एकदा गोळीबाराच्या घटनेने हादरून गेले आहे. जामखेडमध्ये कुख्यात गुंड सागर मोहळकरवर जीवघेणा हल्ला करण्यात आला आहे. शहरातील न्युरानी कॉलनी परिसरात बुधवारी संध्याकाळी 7 ते 7:30 च्या सुमारास ही घटना घडली. दुचाकीवरून आलेल्या हल्लेखोराने सागरवर अंदाधुंद गोळीबार केला, ज्यामध्ये तो गंभीर जखमी झाला आहे. या घटनेमुळे संपूर्ण जामखेड परिसरात मोठी खळबळ उडाली असून भीतीचे वातावरण पसरले आहे.



नेमकं काय झालं?



मिळालेल्या माहितीनुसार, सागर मोहळकर हा न्युरानी कॉलनी भागात असताना मोटारसायकलवरून आलेल्या व्यक्तीने त्याच्यावर गोळ्या झाडल्या. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार हल्लेखोराने एकूण ७ राउंड फायर केले. यातील ४ गोळ्या सागरच्या अंगात घुसल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे.


गोळीबाराचा आवाज होताच परिसरात पळापळ सुरू झाली आणि हल्लेखोर घटनास्थळावरून पसार झाला. घटनेची माहिती मिळताच जामखेड पोलिसांनी तातडीने धाव घेत जखमी सागरला ग्रामीण रुग्णालयात दाखल केले.




मोहळकरची गुन्हेगारी पार्श्वभूमी



सागर मोहळकर हा कुख्यात गुंड असून त्याच्यावर अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत. कलम 307 नुसार त्याच्यावर झालेल्या कारवाईनंतर त्याला नाशिक मध्यवर्ती कारागृहात ठेवण्यात आले होते. तो नुकताच जामिनावर बाहेर आला होता. जामखेड परिसरात त्याची मोठी दहशत होती आणि तो नशेच्या आहारी गेला असल्याची माहितीही समोर आली आहे.


विशेष म्हणजे, अवघ्या २ दिवसांपूर्वीच सागरच्या वडिलांनी त्याच्या त्रासाला कंटाळून त्याच्या विरोधात जामखेड पोलीस ठाण्यात एनसी दाखल केली होती. सागरची प्रकृती अत्यंत चिंताजनक असल्याने प्राथमिक उपचारानंतर त्याला शहरातील एका खाजगी रुग्णालयात नेण्यात आले होते. मात्र, प्रकृतीत सुधारणा होत नसल्याने त्याला तातडीने पुढील उपचारासाठी अहमदनगर येथे हलवण्यात आले आहे. या घटनेनंतर रुग्णालयाबाहेर स्थानिक नागरिकांची मोठी गर्दी जमली होती. परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी पोलिसांनी चोख बंदोबस्त तैनात केला आहे. या गोळीबारामागे जुना वाद होता की गँगवॉरचा प्रकार आहे, याचा तपास आता जामखेड पोलीस करत आहेत. भरवस्तीत झालेल्या या गोळीबारामुळे नागरिकांमध्ये सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. पोलीस सध्या सीसीटीव्ही फुटेज आणि इतर पुराव्यांच्या आधारे हल्लेखोराचा शोध घेत आहेत.

Comments
Add Comment

China AI Robot Wolf Army : भविष्यात AI कुत्रे करणार ड्रोनचा सामना; भविष्यातील युद्धासाठी चीनची ‘रोबोट वुल्फ आर्मी’ सज्ज!

चीन वेगाने आधुनिक आणि मानवविरहित युद्धाच्या दिशेने पुढे जात आहे. नुकत्याच समोर आलेल्या एका अहवालात उघड झाले आहे

Iran-US-Israel War : युद्ध संपलेले नाही,गरज पडल्यास युद्धात परतण्यास इस्त्रायल सज्ज - बेंजामिन नेतन्याहू

अमेरिका आणि इराण (Iran-US-Israel War) यांच्यात दोन आठवड्यांच्या युद्धविरामानंतर इस्त्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू

Saudi and Iran : शस्त्रसंधीनंतर सौदी आणि इराणच्या परराष्ट्र मंत्र्यांमध्ये महत्त्वाची चर्चा

इराण, इस्रायल आणि अमेरिका (Iran-US-Israel War) यांच्यात पाकिस्तानमध्ये होणाऱ्या निर्णायक शांतता चर्चेपूर्वीच सौदी अरेबिया

Iran-US-Israel War : होर्मुज सामुद्रधुनीवर इराणचा मोठा निर्णय; इराणकडून पर्यायी समुद्री मार्ग जाहीर

पश्चिम आशियात सुरू असलेल्या तणावाच्या (Iran-US-Israel War) पार्श्वभूमीवर आता होर्मुज सामुद्रधुनी (Strait of Hormuz) संदर्भात एक मोठी

Iran-US-Israel War : बेरूतमध्ये झालेल्या हवाई हल्ल्यात हिजबुल्लाहच्या प्रमुख नेत्याच्या मृत्यूचा इस्त्रायलने केला दावा

फेब्रुवारी २०२६ पासून सुरू झालेल्या अमेरिका - इस्त्रायल आणि इराण (Iran-US-Israel War) या युद्धात अमेरिका आणि इस्रायलने

Israel Attacks Lebanon : होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद; ट्रम्प अडचणीत? इस्रायलच्या कारवाईमुळे इराण आक्रमक

तेहरान : अमेरिका आणि इराण यांच्यातील शस्त्रसंधीनंतर मध्यपूर्वेतील तणाव कमी होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात