Wednesday, March 4, 2026

BMC News : प्रभाग समितीचे भाजपचे उमेदवार ठरले, नावे झाली जाहीर!

BMC News : प्रभाग समितीचे भाजपचे उमेदवार ठरले, नावे झाली जाहीर!

मुंबई (विशेष प्रतिनिधी)

मुंबई महापालिकेच्या १७ प्रभाग समितीपैकी ०९ प्रभाग प्रभाग समिती अध्यक्ष पदाचे उमेदवार भाजपने जाहीर केले. भाजपने आपले उमेदवार जाहीर केले असून या सर्व उमेदवारांनी आपले अर्ज प्रभाग समिती कार्यालयात सचिवांना सादर करणार आहेत.

मुंबई महापालिकेत महापौर आणि उपमहापौरांसह चार वैधानिक समित्यांच्या अध्यक्षपदाची निवड प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर आता महापालिकेच्या वैधानिक समित्या असलेल्या १७ प्रभाग समिती अध्यक्षपदासाठी बुधवारी ०४ मार्च रोजी उमेदवारी अर्ज सादर केले जाणार आहेत. तर या सर्व प्रभाग समित्यांच्या निवडणूका तीन टप्प्यात म्हणजे गुरुवारी, शुक्रवारी आणि येत्या सोमवारी होणार आहेत. या तिन्ही टप्प्यातील निवडणुकांमध्ये महापौर आणि उपमहापौर हे पिठासीन अधिकारी म्हणून कामकाज सांभाळणार आहे. एक ते दोन प्रभाग समिती वगळता उर्वरीत सर्व ठिकाणी बिनविरोधच निवडणूक प्रक्रिया पार पडली जाण्याची शक्यता आहे

भारतीय जनता पक्षाचे प्रभाग समितीचे खालील उमेदवार

  • सी आणि डी प्रभाग :आकाश पुरोहित
  • के/पश्चिम प्रभाग :रोहन राठोड
  • के/ पूर्व प्रभाग :प्रकाश मुसळे
  • पी/ दक्षिण प्रभाग :श्रीकला पिल्ले
  • आर/दक्षिण प्रभाग :लीना देहेरकर
  • आर / उत्तर आणि
  • आर / मध्य प्रभाग :प्रकाश दरेकर
  • एम / पश्चिम प्रभाग :आशा मराठे
  • एन प्रभाग :अश्विनी मते*
  • एस आणि टी प्रभाग :साक्षी दळवी
Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >