मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त गेल्या वर्षी संपूर्ण भारत देशात ‘पीएम व्हिजन टू आर्ट’ स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेचा निकाल जाहीर झाला असून यात, ७५ विजेत्यांची निवड करण्यात आली आहे. बुधवारी (४ मार्च) राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार यांनी याबाबतची घोषणा केली.
देशाच्या प्रगतीचा आणि दूरदृष्टीचा कलात्मक पद्धतीने सादरीकरण करुन ‘विकसित भारत’ या संकल्पनेला प्रोत्साहन देण्यासाठी महाराष्ट्र शासन सांस्कृतिक कार्य विभागाच्या महाराष्ट्र चित्रपट,रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाने Vision to Art: The National Poster Design Contest” ही राष्ट्रीय पोस्टर डिझाइन स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. ही स्पर्धा २० सप्टेंबर ते १० नोव्हेंबर या कालावधीत पार पडली. यासाठी ॲडव्हरटाईसिंग एजन्सीज असोसिएशन ऑफ इंडिया (AAAI) आणि Manifest या संस्थेचे विशेष सहकार्य मिळाले.
राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांच्या नेतृत्त्वाखाली तसेच सांस्कृतिक कार्य सचिव डॉ. किरण कुलकर्णी आणि महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक स्वाती म्हसे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.
यास्पर्धेमध्ये स्वतंत्र डिझायनर, ब्रँडिंग व डिझाइन स्टुडिओ, जाहिरात व क्रिएटिव्ह एजन्सीज, तसेच डिझाइन व व्हिज्युअल कम्युनिकेशनचे विद्यार्थी अशा सर्वांना आपली कला सादर करण्याची संधी या स्पर्धेच्या माध्यमातून मिळाली. या स्पर्धेसाठी एकूण ९ विषय देण्यात आले होते. त्यात,आत्मनिर्भर भारत, डिजिटल इंडिया, बेटी बचाओ बेटी पढाओ, स्वच्छ भारत अभियान, योग, वेव्ह्ज समिट,मेक इन इंडिया, स्किल इंडिया आणि क्लायमेट चेंज (हवामान बदल) या विषयांचा समावेश होता.
या स्पर्धेसाठी संपूर्ण भारतभरातून आणि विविध वयोगटांमधून सुमारे ३ हजाराहून नोंदी प्राप्त झाल्या. पद्मश्री पुरस्कारप्राप्त व्यक्तींंसह भारतातील नामवंत क्रिएटिव्ह दिग्गजांनी काटेकोर मूल्यमापन व परीक्षक प्रक्रियेत सहभाग घेतला आणि अंतिम ७५ विजेत्यांची निवड या स्पर्धेत करण्यात आली.
या स्पर्धेचे परिक्षण पुढील परिक्षकांनी केले...
१.अच्युत पालव - पद्मश्री पुरस्कार विजेते - भारतीय सुलेखनकार आणि शिक्षक २. वासुदेव कामथ - पद्मश्री पुरस्कार विजेते - आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रशंसित भारतीय कलाकार ३. सुधारक ओलवे - पद्मश्री पुरस्कार विजेते - मुंबईस्थित माहितीपट छायाचित्रकार ४. प्रसून जोशी - पद्मश्री पुरस्कार विजेते - भारतीय कवी, लेखक, गीतकार आणि मॅककॅन वर्ल्ड ग्रुप इंडियाचे सीईओ ५. रवी जाधव - भारतीय चित्रपट दिग्दर्शक, अभिनेता, पटकथा लेखक आणि निर्माता ६. भरत दाभोलकर - भारतीय अभिनेता, दिग्दर्शक आणि लेखक ७. गौरव दालमिया - दालमिया ग्रुप होल्डिंग्जचे अध्यक्ष ८. श्रीनिवासन स्वामी - आर के स्वामी लिमिटेडचे कार्यकारी गट अध्यक्ष आणि जाहिरात एजन्सीज असोसिएशन ऑफ इंडिया (एएएआय) चे अध्यक्ष.
विजेत्यांची नावे पुढीलप्रमाणे...
SKILL INDIA :
आस्था गुप्ता अखिलेश आहुजा आर्या पनवार महेश बोलईकर राजेश गज्जर झिकोलन
आत्मनिर्भर इंडिया :
अभिषेक बिष्ट अनिकेत दुबे जॉय देबनाथ मिताली कापुरे सेजल.एच.शाह उमेश एस वृषिन यादव स्वच्छ भारत अभियान :
अमन झा कमलेश वैशाली अनंत मुरुडकर खुशी तोमर मल्हार भरत सरवदे ओम अनिल धाडगे सोहनी सिंग वैष्णवी दीक्षित
WAVES SUMMIT :
हातिम अबीझर कमलेश वैशाली अनंत मुरुडकर लीना डिसूझा शिविका पांडे सुहानी गुप्ता
योग :
अजितेश शर्मा नील नाडर रुजवी किरण संकपाल शाक्षी शारदा श्रुती गोलम विनय कुमार मौर्य
हवामान बदल :
अर्पिता बंडू मनवतकर अविशेक साहू दिशांत प्रशांत ढगे कुमार सत्यम सिन्हा रोहित राज शुभम बिष्ट सिया सत्यवान मालेकर उमेश दत्ताराम निगडे
बेटी बचाओ बेटी पढाओ :
अभ्रक भट्टाचार्य आकाश कुमार आनंद सोनाजी गायकवाड आर्या गहाणे आर्या नागवेकर भाग्यश्री जोशी चेतन महिंद्र पांचाल विनोद मोहन बंजारा श्याम पतंगे लक्ष्मण बाबू ससेमारी साईराज शिगवण संजीव मेंढे पार्थ गुप्ता यशप्रिया संजय कमिल्या ऋतुजा जंगम उमेश दत्ताराम निगडे
मेक इन इंडिया :
चॅटरबॉक्स कम्युनिकेशन वल्लभ येवलेकर शर्वरी शरद सावंत नमन दवे कृषा वखारिया इशिता पटनाईक ईश्वरी प्रवीण तारकर साची शुक्ला संदीप कुमार संयुक्ता शेखर पवार विराज विजय पटवेकर
डिजिटल इंडिया :
हर्ष जगताप कलीम अख्तर निलेश परमात्मा यादव उत्कर्ष भदाडे कस्तुरी पटेल गोरख जे. घोलप श्रीरंग अमृता देवेंद्र साळुंखे







