Trimbakeshwar Temple Video: त्र्यंबकेश्वर मंदिरात भाविकाला मारहाण, भाविकांमध्ये संतापाचे वातावरण

नाशिक: होळी, धुलिवंदनाच सण, सलग सुट्ट्यांमुळे नाशिकच्या त्र्यंबकेश्वर येथील ज्योतिर्लिंग मंदिरात भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. या गर्दीला नियंत्रित करत सर्व भाविकांना दर्शन देताना देवस्थान ट्रस्टच्या सुरक्षा रक्षकांची आणि प्रशासनाची चांगलीच दमछाक होत आहे. अशातच त्र्यंबकेश्वर येथील ज्योतिर्लिंग मंदिरात एका भाविकाला सुरक्षा रक्षकांनी बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.



देवाच्या दारात भाविकाला मारहाण


याबाबत माहिती अशी की, नाशिकच्या त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग मंदिरात सुरक्षारक्षकाकडून एका भाविकाला बेदम मारहाण करण्यात आल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. सुरक्षारक्षकाने या भाविकाचे कपडे फाडत लाथा बुक्क्यांनी बेदम मारहाण केली. मंदिरातील एका भाविकाने या मारहाणीचा प्रकार मोबाईलमध्ये कैद केला आहे. या घटनेवरुन सर्वत्र संताप व्यक्त होत आहे.



भाविकांचा संताप


हा भाविक दर्शन रांगेत बसून जप करत होता, पुढे जाण्यास तयार नव्हता त्यामुळे सुरक्षारक्षक आणि त्याच्यामध्ये वाद झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. त्र्यंबकेश्वर पोलिसांनी या घटनेची दखल घेतली असून या घटनेबाबत अधिक तपास सुरू आहे. दरम्यान, त्र्यंबकेश्वर मंदिरात सुरक्षारक्षकांचा वाद आणि मारहाणीच्या घटना नेहमीच्याच झाल्या असून मंदिर संस्थानवर नियंत्रण कोणाचे ? हा प्रश्न पुन्हा उपस्थित होत आहे.

Comments
Add Comment

‘वंदे मातरम्’ सार्ध शताब्दी वर्षानिमित्त राजगुरुनगर येथे भव्य सांस्कृतिक कार्यक्रम उत्साहात संपन्न

पुणे : सांस्कृतिक कार्य विभाग, सांस्कृतिक कार्य संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई, जिल्हाधिकारी कार्यालय, पुणे

Ashok Kharat Case : भोंदूबाबा अशोक खरातला २९ मार्चपर्यंत पोलीस कोठडी

नाशिकमध्ये गाजत असलेल्या महिला लैंगिक अत्याचार प्रकरणात आरोपी अशोक खरात याला न्यायालयाने २९ मार्चपर्यंत पोलीस

अमरावती होणार उद्योगांचे नवे केंद्र! ५९० रुपयांत मिळणार जमीन

मुंबई : अमरावतीत अधिकाधिक उद्योग आणण्यासाठी शासन कटिबद्ध असून, त्यासाठी अमरावतीत संबंधित अधिकाऱ्यांच्या समवेत

पुणे - पंचवीस जणांना मिळणार युरोपियन स्पेस सेंटरला भेट देण्याची संधी

पुणे : इस्रो आणि नासा भेटीचा उपक्रम यशस्वी ठरल्यानंतर जिल्हा परिषदेचे विद्यार्थी आता आणखी मोठी झेप घेणार आहेत.

श्री विठ्ठल-रुक्मिणीच्या पूजांची २५ मार्चपासून ऑनलाईन नोंदणी

सोलापूर : श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीकडून भाविकांना श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेच्या नित्यपूजा, पाद्यपूजा व

Ashok Kharat case : पीडितांच्या आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल केल्यास होणार गुन्हा दाखल

मुंबई : अशोक खरात प्रकरणानंतर सोशल मीडियावर पीडित महिलांबाबत आक्षेपार्ह मजकूर, फोटो आणि व्हिडिओ व्हायरल