अमेरिका - इस्रायलच्या संयुक्त लष्करी कारवाईनंतर मध्यपूर्वेतील तणावपूर्ण परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर, परराष्ट्र मंत्री एस.जयशंकर यांनी कतारचे पंतप्रधान आणि परराष्ट्र मंत्री शेख मोहम्मद बिन अब्दुलरहमान बिन जसीम अल थानी यांच्याशी फोनवरून चर्चा केली. तर दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी इराण - इस्रायलच्या प्रमुखांशी फोनवरून चर्चा केली.
Had a telephone call with PM Benjamin Netanyahu to discuss the current regional situation. Conveyed India's concerns over recent developments and emphasised the safety of civilians as a priority. India reiterates the need for an early cessation of hostilities.@netanyahu
— Narendra Modi (@narendramodi) March 1, 2026
सुरक्षा मंत्रिमंडळासोबत बैठक :
इस्रायल, अमेरिका आणि इराण यांच्यात सुरु असलेल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळाच्या सुरक्षा समितीची (सीसीएस) महत्त्वाची बैठक पार पडली. पंतप्रधानांच्या दिल्लीस्थित निवासस्थानी ही बैठक पार पडली. या बैठकीला संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर आणि अर्थमंत्री निर्मला सीतारामन उपस्थित होत्या.
सूत्रांच्या माहितीनुसार, पश्चिम आशियातील वाढत्या संघर्षामुळे उद्भवलेल्या जागतिक परिस्थितीचा सविस्तर आढावा या बैठकीत घेण्यात आला. विशेषतः या घडामोडींचा भारताच्या सुरक्षेवर, ऊर्जा पुरवठ्यावर, अर्थव्यवस्थेवर आणि परराष्ट्र संबंधांवर होणाऱ्या संभाव्य परिणामांवर चर्चा करण्यात आली. तसेच, परदेशात अडकलेल्या भारतीय नागरिकांना सुरक्षित परत आणण्याच्या उपाययोजनांवरही विचारविनिमय झाल्याचे समजते.







