शीख पंथाच्या दहा गुरूंनी अशी परंपरा निर्माण केली आहे, जी केवळ भारतासाठीच नव्हे तर संपूर्ण जगासाठी अनुकरणीय आहे. त्यामुळे शीखांच्या गुरूंच्या जीवनातून प्रेरणा घेऊन धर्मांतराच्या विरोधात सर्व देशवासीयांनी एकजूट व्हायला हवे असे गृहमंत्री अमित शाह यांनी सांगितले.
नवी मुंबई येथे गुरु श्री तेगबहादूर जी यांच्या ३५० व्या शहीदी दिवस समागम समारंभात गुरु साहेबांच्या स्मृतीस अभिवादन करून उपस्थितांशी अमित शाह यांनी संवाद साधला. यावेळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
काय म्हणाले अमित शाह ?
आपल्या संबोधनात केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रीय स्तरावर श्री गुरु तेगबहादूर साहिब जी यांचा ३५० वा शहीदी दिवस साजरा करण्याचा निर्णय घेतला, जो संपूर्ण भारतासाठी भाग्याचा विषय आहे. ते म्हणाले की, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संपूर्ण महाराष्ट्रात गुरु तेगबहादूर यांचे जीवनकार्य तरुणांपर्यंत पोहोचवण्यासाठी विशेष कार्यक्रम आयोजित केले. जर नववे गुरु तेगबहादूर यांनी हिंदू धर्म आणि हिंदूंच्या रक्षणासाठी बलिदान दिले नसते, तर संपूर्ण जगात एकही हिंदू उरला नसता. संपूर्ण भारत आणि जगभरातील सनातन धर्माचे अनुयायी गुरु तेगबहादूर यांनी हिंदू धर्म वाचवण्यासाठी यातना सहन करत आपले बलिदान दिले.
आज महाराष्ट्र ने नवी मुंबई में श्री गुरु तेग बहादुर जी के 350वें शहीदी समागम में गुरु साहिब के जीवन और उनके अद्वितीय पराक्रम को स्मरण कर नमन किया। जाति, वर्ग, पंथ और समाज की सभी संकीर्णताओं से ऊपर उठकर, प्रत्येक भारतवासी को अपनी संस्कृति के लिए एकजुट होकर संघर्ष करने की प्रेरणा… pic.twitter.com/GvjRFN3LZ2
— Amit Shah (@AmitShah) March 1, 2026
अमित शाह पुढे म्हणाले की, शीख परंपरेचा मूळ आधार एकता, बंधुत्व, सर्वसमावेशकता आणि वीरता हा राहिला आहे आणि गुरु ग्रंथ साहिबमध्ये याच तत्वांचा समावेश करण्यात आला आहे. संत नामदेव, नरसी मेहता, कबीर, संत रविदास यांसारख्या अनेक प्रसिद्ध संतांच्या पदांना गुरु ग्रंथ साहिबमध्ये स्थान देण्याचे काम दशम पित्याने केले आहे. त्यांनी असेही नमूद केले की, महाराष्ट्र सरकारने अनेक समाजांना गुरु तेगबहादूर जी यांच्या विचारांशी जोडण्याचे काम केले आहे.







