 |
दूरचे प्रवास संभवतात
मेष :हा कालावधी आपणास अत्यंत चांगला आहे उद्योगातून आणि इतर धंद्यातून मिळणाऱ्या उत्पन्नामध्ये वाढ होणार आहे. नवीन संधी चालून येणार आहे. पालकांच्या आरोग्याच्या समस्या उद्भवू शकतात. दूरचे प्रवास संभवतात. परीक्षेत यश मिळेल. कामाच्या ठिकाणी प्रतिष्ठा उंचावणे या काळात घडणार आहे. कुटुंबाकडून आपणास सहकार्य मिळेल. कोणतीही विपरीत परिस्थिती समोर आली तरी आपण आत्मविश्वासाने सामोरे जाणार आहात.कुटुंबामध्ये शुभवार्ता मिळतील. प्रगती होईल. कुटुंब मधील तरुण-तरुणींचे प्रश्न संपुष्टात येऊन त्यांना दिलासा मिळेल.सहकुटुंब सहपरिवार धार्मिक ठिकाणी प्रवास कराल आरोग्य उत्तम राहील कोर्ट कायदे विषयक कार्य पुढे ढकलावीत
|
 |
उत्साहात व आनंदात वृद्धि होईल
वृषभ : आपल्या अपेक्षेनुसार आपली कामे पार पाडण्यात यश मिळेल अपेक्षापूर्ती होईल बरेच दिवस एखादे महत्त्वाचे काम होण्याची आपण वाट पाहत होता असे कार्य पूर्ण झाल्यामुळे उत्साहात व आनंदात वृद्धि होईल. मात्र कोणत्याही बाबतीत अतिरेक टाळा थोड्या संयमाने शत्रूवर विजय प्राप्त करता येईल मानपानाची प्रसंग येऊ शकतात त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करा नैराश्य जाईल कुटुंब परिवारात सुवार्ता मिळून वैयक्तिक भाग्योदय होईल अचानक धनलाभाचे योग व्यवसायिक पर्यायातून विशेष लाभ काही फायद्याचे सौदी हाती येतील त्यानुसार नियोजन बदलावे लागेल. आयात-निर्यात व्यवसायापासून रिटेल व्यवसायिकांच्या उडाली वृद्धी होऊन नफ्याचे प्रमाण वाढेल. तांत्रिक ऑटोमोबाइल क्षेत्र विशेष लाभान्वित होईल. काही सरकारी कामे प्रलंबित राहिली होती अशा स्वरूपाची कामे प्रभावशाली व्यक्तींच्या हस्तक्षेपामुळे पूर्ण होतील कुटुंब परिवारातील विवाहयोग्य तरुण-तरुणींना आपला आवडता जीवनसाथी निवडता येईल मंगल कार्य ठरू शकते.
|
 |
कार्यमग्न रहा
मिथुन : इतर कोणाच्याही आश्वासनांवर विसंबून राहणे म्हणजे नुकसानीस आमंत्रण दिल्यासारखे होईल स्वतःचे कार्य स्वतः पूर्ण करा. चालढकल नको आपले कर्तृत्व सिद्ध करण्याच्या संधी उपलब्ध होतील नोकरी व्यवसाय धंद्यात अनुकूल परिस्थिती लाभेल मात्र नोकरीच्या ठिकाणी राजकारण आणि गटबाजी पासून अलिप्त राहणे हिताचे ठरेल आपल्या कामाविषयी विज्ञान अद्यावत ठेवा कार्यमग्न रहा इतरांच्या बोलण्याला बळी पडू नका नंतर मनस्ताप होण्याची शक्यता नाकारता येत नाही व्यवसाय धंद्यातील परिस्थिती समाधानकारक राहिली तरी आर्थिक गरज भासू शकते आर्थिक विवंचनेने वर लगेचच कर्ज काढणे हा मार्ग शक्य तो अवलंबून नका मित्रमंडळी कुटुंबाकडून सहकार्य लाभेल या कालावधीत आधार देणे घेणे भविष्यात हानीकारक ठरू शकते शेअर मार्केट तेजी मंदी संबंधित व्यवसाय इत्यादी मध्ये आर्थिक फायदा आर्थिक परिस्थितीत सुधारणा होईल.
|
 |
कष्टाचे फळ मिळेल
कर्क : नोकरी व्यवसाय धंद्यात अनुकूलता लाभेल नोकरीमध्ये वेतन वृद्धि पदोन्नती यासारख्या घटना घटक होऊ शकतात केलेल्या कामाचे घेतलेल्या कष्टाचे फळ मिळेल उत्पन्नात वृद्धी होऊन नोकरीतील अधिकार कक्षा रुंदावतील पण त्याचबरोबर जबाबदाऱ्याही वाढतील सरकारी स्वरूपाच्या नोकरीत मानसन्मान मिळून अतिरिक्त कार्यभार सोपविला जाऊ शकतो आपल्या अधिकार मर्यादेचे उल्लंघन करू नका व्यवसाय धंद्यात तेजी व वाढून नफ्याचे प्रमाणात वृद्धि होईल व्यवसाय विस्ताराच्या योजना हाती घेता येतील नवे नियोजन करू शकाल का भागीदारीच्या व्यवसायात भागीदारा बरोबर मतभेद टाळणे इष्ट ठरेल.स्पर्धकांवर मात करू शकाल कुटुंब परिवारातील विवाहयोग्य तरुण-तरुणींचा विवाह करण्यातील अडचणी दूर होऊन कुटुंबात शुभकार्य घडेल त्याचप्रमाणे तरुण-तरुणींचा अर्थार्जनाचा शुभारंभ होईल स्वतःच्या मालकीच्या घरात गृहप्रवेश करू शकाल.
|
 |
यशाच्या प्रमाणात वृद्धी होईल
सिंह : काहीवेळा विरोधकांचे मुद्दे पटणारे नसले तरी वाद-विवाद वाढवू नका ते हिताचे ठरेल थोडे सबुरीने व संयमाने घ्या. तसेच कुटुंब परिवारात आपली मते इतरांवर लादण्याचा प्रयत्न करू नका समोरील व्यक्तीच्या मतास उचित प्राधान्य देणे श्रेयस्कर ठरेल सर्वच क्षेत्रातील समस्या जाणून घेतल्यास त्यावर मार्ग काढू शकाल जीवन साथी चे सहकार्य लाभेल हाती घेतलेल्या कोणत्याही स्वरूपाच्या लहान मोठ्या कार्यात यश मिळण्यासाठी ग्रहमान तसेच वातावरण अनुकूल आहे . समोरील व्यक्तीचा कोणत्याही स्वरुपात अपमान करू नका आपल्या कार्यक्षेत्रात उन्नती आणि प्रगती होईल वैयक्तिक सुवार्ता मिळून यशाच्या प्रमाणात वृद्धी होईल नोकरीत , व्यवसाय-धंद्यात परिस्थिती समाधानकारक राहून नवे तंत्रज्ञान नव्या संकल्पना राबवू शकाल.
|
 |
कामे गतिशील होतील
कन्या : अनुकूल कालावधी. हातात घेतलेल्या कार्यात यश. दीर्घकाळ रखडलेली जमीन-जुमला स्थायी संपत्ती याविषयीची कामे गतिशील होतील आर्थिक फायदा होऊ शकतो आर्थिक बाजू चांगली राहिल्याने नवीन गुंतवणुकीचा विचार असेल परंतु नवीन लहान मोठी कोणतीही गुंतवणूक करताना सतर्क राहणे जरुरीचे गरज पडल्यास त्या त्या क्षेत्रातील तज्ज्ञ मंडळींचा सल्ला घ्यायला विसरू नका पूर्वी केलेल्या गुंतवणुका भरघोस फायदा मिळवून देतील सभा समारंभाची निमंत्रणे मिळतील एखाद्या समारंभात मानाचे स्थान भूषवू शकाल. नोकरी-व्यवसाय धंद्यातील परिस्थिती सामान्य राहिली तरी काही वेळेस अनपेक्षित प्रश्नांना सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे परंतु अडचणींवर आपण मात करू शकाल काहीवेळेस स्पर्धेत बलवान होण्याची शक्यता तसेच भागीदारी व्यवसायात वादविवाद टाळा व्यावसायिक हित लक्षात ठेवून पुढील गोष्टींना प्राधान्य देणे हिताचे ठरेल.
|
 |
समाधान मिळेल
तूळ : आपण आनंदी आणि उत्साही वातावरणाचा लाभ घेऊ शकाल. आर्थिक ओघ मोठा राहून आर्थिक परिस्थिती मजबूत राहील त्यामुळे मनसोक्त खर्चही करू शकाल कुटुंब परिवारातील सदस्यांच्या वाढत्या मागण्या पूर्ण केल्याचे समाधान मिळेल काही कार्य निमित्त जवळचे तसेच दूरचे प्रवास करावे लागतील प्रवास कार्य सिद्ध राहतील जे जातक नोकरीच्या शोधात आहेत अशा जातकांचा नोकरी विषयक शोध संपुष्टात येईल बेरोजगारांना रोजगार मिळेल कुटुंब परिवारातील तरुण-तरुणींच्या समस्या सुटतील शिक्षणासाठी परदेशगमन होऊ शकते चालू नोकरीत अनुकूल वातावरण लाभेल .व्यवसाय-धंद्यात काही नवनवीन आव्हाने स्वीकारण्याची तयारी ठेवा एखादे आव्हान स्वीकारले त्यातील अडचणी समस्यांनाही सामोरे जावे लागते हे गृहीत धरून मार्गक्रमण केल्यास निश्चित यश मिळेल.
|
 |
संयम आवश्यक आहे
वृश्चिक : हितशत्रू शत्रू यांच्यावरती या कालावधीमध्ये मात करू शकाल मात्र थोडा संयम आवश्यक आहे सबुरीने घ्या घाईगर्दीत कोणताही लहान-मोठा निर्णय घेण्याचे टाळा तसेच स्वतःच्या क्रोधावर वागण्यावर व बोलण्यावर नियंत्रण आवश्यक राहील कोणालाही अपमानास्पद वागणूक देऊ नका समोरील व्यक्तीचे म्हणणे पूर्णपणे समजावून घेऊन नंतर त्यावर प्रतिक्रिया व्यक्त करणे हिताचे ठरेल नेमकी संधी ओळखून आपली पुढील पावले उचला कुटुंब परिवारातील परिस्थिती मतभेदांमुळे अस्थिर होण्याची शक्यता आहे त्यामुळे कुटुंबातील सदस्यांच्या मतास उचित प्राधान्य द्या कुटुंबातील ज्येष्ठांचे मार्गदर्शन लाभेल नोकरी मध्ये आपण केलेल्या कार्याचा गौरव होऊन कौतुकास पात्र ठराल एखाद्या महत्त्वाच्या कार्यासाठी नवीन जबाबदारी घ्यावी लागेल व्यवसाय-धंद्यात स्पर्धकांवर मात करू शकाल नवीन केलेले बदल व्यवसायासाठी सकारात्मक ठरून पोषक ठरतील.
|
 |
सुख सुविधांमध्ये वृद्धि होईल
धनु : सदरील कालावधीमध्ये आपल्या भौतिक सुख सुविधांमध्ये वृद्धि होईल त्याचबरोबर सामाजिक प्रतिष्ठा आणि यश कीर्ती वाढेल राहत्या घरासाठी च्या सुशोभीकरणासाठी खर्च होईल व्यवसाय-धंद्यात मोठे करारमदार होऊन काही फायद्याचे सौदे हाती येण्याची शक्यता व्यवसायिक उलाढाल वाढेल जमीन-जुमला स्थायी संपत्ती इत्यादींच्या खरेदी विक्रीतून लाभ मात्र वादविवाद टाळा. वडिलोपार्जित संपत्तीतून फायदा मिळू शकतो दीर्घ काळ रखडलेले व्यवहार गतिमान होऊन पूर्णत्वाच्या मार्गावर येतील ओळखीमध्यस्थी फलद्रूप होऊ शकतात स्वतःचे घर होण्यासाठी जे जातक प्रयत्न करत असतील अशा जातकांच्या प्रयत्नांना यश मिळून स्वतःच्या मालकीच्या घरात राहण्यास जाता येईल कुटुंब परिवारात लग्नकार्य ठरतील परिवारातील सदस्यांचे अपेक्षित सहकार्य मिळेल.
|
 |
मोठ्या आर्थिक लाभाची शक्यता
मकर : या काळात जरी आपल्याला मिश्र फळे मिळणार असतील तरी आपल्या आत्मविश्वासात वृद्धी होईल आपल्या समोरील मोठी क्लिष्ट स्वरूपाची कार्य आपण आपल्या आत्मविश्वासाच्या जोरावर पूर्ण करू शकाल. भूमि भवन प्रॉपर्टी यांच्यापासून मोठ्या आर्थिक लाभाची शक्यता. वैद्यकीय आणि बांधकाम क्षेत्राशी संबंधित जातकांना मोठ्या स्वरूपातील फायद्याचे सौदे हाती येण्याच्या शक्यते सह नवीन नवीन संधी उपलब्ध होतील. विद्यार्थी स्पर्धात्मक यश मिळवू शकतात नोकरीत अनुकूल कालावधी पदोन्नती वेतन वृद्धि चे योग सामाजिक कार्यात रस घ्याल मान सन्मान वाढेल कुटुंब परिवारात भावंडं विषयी प्रेम जिव्हाळा वाटेल आपल्या भावंडांच्या मुळे आपल्या कारकिर्दीमध्ये महत्त्वपूर्ण बदल घडू शकतात आर्थिक दृष्ट्या पित्याकडून सहयोग प्राप्त होऊन आर्थिक परिस्थिती सुधारेल.
|
 |
अधिक परिश्रमाची आवश्यकता
कुंभ : आपल्या स्वतःच्या आरोग्याची काळजी घेणे क्रमप्राप्त ठरणार आहे खाण्यापिण्यावर नियंत्रण आवश्यक पथ्यपाणी सांभाळा त्याचप्रमाणे वैवाहिक जीवनात प्रेमसंबंध दृष्टीकोन बदलाची शक्यता मतभेद वादविवाद या पासून अलिप्त राहा आपल्या समोरील कार्य पूर्ण करण्यासाठी अधिक परिश्रमाची आवश्यकता. आपल्या क्रोधावर वेळीच नियंत्रण ठेवा मनस्वास्थ बिघडवणारा घटना घटित होऊ शकतात बौद्धिक क्षेत्रातील जातकांना अनुकूल कालावधी घेतलेल्या कष्टाचे अपेक्षित फळ मिळू शकते नोकरीत केलेल्या कामाचे चीज होईल उत्पन्नात वृद्धी होण्याची शक्यता एखाद्या प्रशिक्षणासाठी परदेशगमनाची संधी उपलब्ध होईल विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळून परदेशी जाऊन उच्च शिक्षण घेण्याची संधी मिळू शकते नोकरीसाठी दिलेल्या मुलाखतीमध्ये यश संपादित करता येईल पूर्वी दिलेल्या मुलाखतींमधून नोकरीसाठी बोलावणे येऊ शकते .
|
 |
शुभ घटना घटित होतील
मीन : सुरुवातीला रोजच्या जीवनात अनपेक्षित घटना घटित झाल्यामुळे आपल्या जीवन क्रमामध्ये बदल घडू शकतो मनात गोंधळाची परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता पूर्ण विचाराअंती व शांत चित्ताने आपल्या समोरील परिस्थितीचा विचार करून निर्णय घेणे योग्य ठरेल यशप्राप्ती होईल व्यवसाय-धंद्यात जुनी येणी वसूल होतील व सभेच्या वेळी वाद-विवाद नको व्यवसायिक उलाढाल वाढेल तिचा अनुभव घेता येईल उत्सव प्रदर्शन यशस्वी होऊन व्यवसायिक जुनी संबंध नव्याने प्रस्थापित होतील नवे अनुबंध जुळून येतील नव्या संधींची उपलब्धता शेअर मार्केट तसेच तेजी-मंदी संबंधित व्यवसायातून आर्थिक फायदा होऊ शकतो वैवाहिक जीवनातून शुभ घटना घटित झाल्यामुळे कुटुंबातील वातावरण आनंदी राहील. |