अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यात सुरू असलेल्या संघर्षामुळे मध्यपूर्वेत तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली आहे. हल्ले-प्रतिहल्ल्यांमुळे अनेक देश सतर्क झाले असून या घडामोडींचा परिणाम दुबईवरही जाणवत आहे. काही प्रवासी दुबई विमानतळावर अडकले असल्याची माहिती समोर येत आहे.
अशातच दुबईत असलेल्या एका भारतीय अभिनेत्याने सोशल मीडियावर धक्कादायक व्हिडिओ शेअर केला आहे. आपल्या घराजवळून आकाशात क्षेपणास्त्र झेपावत असल्याचा दावा त्याने केला आहे. स्फोटांच्या तीव्र आवाजामुळे संपूर्ण घर हादरल्याचे देखील त्याने सांगितले.
हा अभिनेता म्हणजे तेलुगू चित्रपटसृष्टीतील स्टार Vishnu Manchu. कुटुंबाला भेटण्यासाठी तो सध्या दुबईत गेला आहे. त्याने पोस्टमध्ये नमूद केले की, आकाशात स्पष्टपणे मिसाईल्स दिसत होती आणि मोठ्या स्फोटांनी घर हलले. या घटनेमुळे त्याचे कुटुंब घाबरले असून लहान मुलगी आयराही भीतीने व्याकुळ झाल्याचे त्याने सांगितले.
In Dubai visiting family tonight. Missiles visible in the sky. The loud interceptions shook our home and frightened little Ayra. Praying for peace. No child anywhere should grow up hearing the sound of war above their roof. Grateful to the UAE defense forces for keeping… pic.twitter.com/tCbE78eoBY
— Vishnu Manchu (@iVishnuManchu) February 28, 2026
आपल्या पोस्टमध्ये त्याने शांततेची प्रार्थना करत म्हटले की, “कोणत्याही मुलाला अशा परिस्थितीत वाढावे लागू नये, जिथे त्याला स्वतःच्या घराच्या छतावरून युद्धाचे आवाज ऐकावे लागतात.”
दरम्यान, या व्हिडिओमुळे सोशल मीडियावर मोठी चर्चा सुरू झाली असून दुबईतील परिस्थितीबाबत विविध प्रतिक्रिया उमटत आहेत.







