Sunday, March 1, 2026

Israel - Iran War : भारताच्या परराष्ट्र मंत्र्यांची इराण-इस्रायली समकक्षांशी फोनवरून चर्चा

Israel - Iran War : भारताच्या परराष्ट्र मंत्र्यांची इराण-इस्रायली समकक्षांशी फोनवरून चर्चा

-परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांचा कतारच्या पंतप्रधानांशीही फोनवरुन संवाद

- पश्चिम आशिया प्रदेशातील परिस्थितीवर चर्चा

अमेरिका - इस्रायलच्या संयुक्त लष्करी कारवाईनंतर मध्यपूर्वेतील तणावपूर्ण परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर, परराष्ट्र मंत्री एस.जयशंकर यांनी कतारचे पंतप्रधान आणि परराष्ट्र मंत्री शेख मोहम्मद बिन अब्दुलरहमान बिन जसीम अल थानी यांच्याशी फोनवरून चर्चा केली. जयशंकर म्हणाले की, संभाषणादरम्यान त्यांना कतारमधील परिस्थितीची माहिती देण्यात आली आणि कतारच्या बाजूने भारतीय समुदायाच्या कल्याणाबाबत आश्वासन देण्यात आले.

इराणमध्ये अमेरिका-इस्रायलच्या संयुक्त लष्करी हल्ल्यांनंतर, या प्रदेशात तणाव वाढला आहे. परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी शनिवारी त्यांचे इराणी समकक्ष सय्यद अब्बास अरघची आणि त्यांचे इस्रायली समकक्ष गिदोन सार यांच्याशी स्वतंत्रपणे फोनवरून चर्चा केली.

जयशंकर यांनी अराघची यांच्याशी झालेल्या संभाषणात इराण आणि प्रदेशातील अलीकडील घडामोडींबद्दल भारताची तीव्र चिंता व्यक्त केली. "इराणचे परराष्ट्र मंत्री सय्यद अब्बास अराघची यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा झाली. इराण आणि प्रदेशातील अलीकडील घडामोडींबद्दल भारताची तीव्र चिंता व्यक्त केली," असे परराष्ट्रमंत्र्यांनी सोशल मीडियावर म्हटले आहे. इस्रायलचे परराष्ट्र मंत्री सार यांच्याशी झालेल्या चर्चेबद्दल जयशंकर म्हणाले की, तणाव कमी करण्यासाठी संवाद आणि राजनैतिक कूटनीति आवश्यक आहे या भारताच्या भूमिकेचा त्यांनी पुनरुच्चार केला.

परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे की, इराण आणि आखाती प्रदेशातील अलिकडच्या घडामोडींबद्दल भारताला खूप चिंता आहे. "आम्ही सर्व पक्षांना संयम बाळगण्याचे, तणाव वाढू नये आणि नागरिकांच्या सुरक्षेला प्राधान्य देण्याचे आवाहन करतो," असे मंत्रालयाने म्हटले आहे. "तणाव कमी करण्यासाठी आणि मुख्य समस्या सोडवण्यासाठी संवाद आणि राजनैतिक प्रयत्न केले पाहिजेत. सर्व देशांच्या सार्वभौमत्वाचा आणि प्रादेशिक अखंडतेचा आदर केला पाहिजे," असे निवेदनात म्हटले आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा