Sunday, March 1, 2026

Israel - Iran War : युद्धाचा हवाई वाहतुकीवर परिणाम; मुंबई विमानतळासह देशभरातील तब्बल ४४४ उड्डाणे रद्द

Israel - Iran War : युद्धाचा हवाई वाहतुकीवर परिणाम; मुंबई विमानतळासह देशभरातील तब्बल ४४४ उड्डाणे रद्द

पश्चिम आशियातील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर इराण – इस्रायल संघर्ष अधिक तीव्र झाल्याचे पाहायला मिळत आहे. अमेरिका आणि इस्रायलने शनिवारी सकाळी इराणवर एकाच वेळी ३० ठिकाणी हल्ले करून युद्धाला सुरुवात केली आहे. या हल्ल्यात इराणचे सर्वोच्च नेते आयातुल्ला अली खामेनी यांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.

या परिस्थितीचा परिणाम आता जगभरातील अनेक हवाई वाहतुकीवर होताना दिसत आहे. आज दिवसभरात ४४४ उड्डाणे रद्द होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. नागरी विमान वाहतूक मंत्रालयाने याबद्दल आज माहिती दिली आहे. प्रवाशांच्या सुरक्षेला प्राधान्य देण्याच्या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आला आहे असे त्यांनी सांगितले. 'ऑपरेशनल नियमांचे पालन सुनिश्चित करण्यासाठी नागरी विमान वाहतूक महासंचालनालय (DGCA) विमान कंपन्यांशी जवळून समन्वय साधत आहे', अशी माहिती त्यांनी आपल्या पोस्टद्वारे दिली.

शनिवारी मध्य-पूर्वेत पेटलेल्या संघर्षामुळे एकूण ९०० विमान उड्डाणे रद्द करण्यात आली. अनेक भारतीय कर्मचारीही येथे अडकले होते. एअर इंडियाने त्यांना यावेळी सुखरूपपणे बाहेर काढण्याचं काम केलं. शनिवारी सायंकाळी ५:४५ वाजेपर्यंत मुंबई विमानतळावर ठप्प झालेल्या सेवांमध्ये इंडोगोच्या मुंबई-लंडन सेवेचाही समावेश आहे. यामुळे विमानसेवेचं भाडं वाढलं असून, आज, १ मार्चला, लंडनला जाणाऱ्या थेट तिकिटांची किंमत १.४ लाख रुपयांवर पोहचली आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा