Saturday, February 28, 2026

आता मुंबईत धावणार पत्रकार-कॅमेरामनसाठी स्वतंत्र अॅम्ब्युलन्स

आता मुंबईत धावणार पत्रकार-कॅमेरामनसाठी स्वतंत्र अॅम्ब्युलन्स

- मुख्यमंत्री फडणवीस, शिंदेंनी केले सेवेचे लोकार्पण....

- 'आरबीजी फाउंडेशन-टीव्हीजेए'चा उपक्रम; लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचीही साथ

मुंबईः राज्यभरातील विशेषतः मुंबई महानगराच्या कानाकोपऱ्यात दडलेल्या, घडलेल्या वेगवान घडामोडी अर्थात, 'ब्रेकिंग न्यूज' त्या-त्या क्षणाला लोकांपर्यंत पोचविणाऱ्या इलेक्ट्रॉनिक आणि प्रिंट मीडियातील पत्रकार-कॅमेरामन आणि संबंधित घटकांसाठी आता स्वतंत्र 'अॅम्ब्युलन्स' रस्त्यावर उतरल्या आहेत. मीडिया विश्वातील धावपळीत पत्रकारांच्या आरोग्याकरिता ही सेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे. नवी मुंबईतील 'आरबीजी फाउंडेशन' आणि' टीव्ही जर्नालिस्ट असोसिएशन’च्या पुढाराकाने सुरू केलेल्या या सेवेचे उदघाटन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते शनिवारी मुंबईत झाले.

विधान भवनाच्या आवारात झालेल्या या उदघाटन सोहळ्याला राज्याचे आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, रोजगार हमी योजनेचे मंत्री, भरत गोगावले, फाउंडेशनच्या अध्यक्ष मधुरा गेठे, टीव्ही जर्नालिसस्ट असोसिएशनचे अध्यक्ष उदय जाधव, सदस्य मनश्री पाठक यांच्यासह पंकज दळवी, कार्यकारिणी सदस्य मनाली गायकवाड, राजेश साफळे, अनिल सौंदडे असोसिएशनचे पदाधिकारी उपस्थित होते.

महाराष्ट्राचे राजकारण गेल्या काही काळात प्रचंड वेगवान झाले आहे. त्यामुळे राजकारण आणि संबंधित बाबींना मीडियात महत्त्व दिले जाते. अशातच 'ब्रेकिंग न्यूज'च्या दुनियेत आघाडी घेत असताना, पत्रकार मंडळींची धावपळ होते. परिणामी, या सततच्या धावपळीने पत्रकार अणि इतर घटकांच्या आरोग्यावर कळत-नकळतपणे परिणाम होतो. ही बाब हेरून पत्रकारांच्या आरोग्याकडे वेळोवेळी लक्ष देऊन, हा घटक अधिक सक्षम राहावा, याकरिता आरबीजी फाउंडेशन'ने आणि टीव्ही जर्नालिस्ट असोसिएशन’ने पत्रकारांच्या आरोग्यासाठी योजना आखण्याचे नियोजन केले आहे. त्यातून फाउंडेशनने आता स्वतंत्र 'अॅम्ब्युलन्स' उपलब्ध करून दिल्या आहेत. इलेक्ट्रॉनिक मीडियातील पत्रकार आणि कॅमेरामनचे नेतृत्व करणाऱ्या राज्यपातळीवरील 'टीव्ही जर्नालिस्ट असोएिशन'च्या माध्यमातून पत्रकार आणि कॅमेरामन यांच्यासाठी ही सेवा पुरविली जाईल.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, "पत्रकार हे अनेकदा अतिशय संवेदनशील ठिकाणी पोचून कव्हरेज करतात. त्यामुळे अपघात ओढण्याची भीती असते. अशा वेळी पत्रकारांना हक्काची सेवा देण्यासाठी आरबीजी फाउंडेशन आणि टीव्ही जर्नालिस्ट असोसिएशनचा ही योजना चांगली आहे.’’

‘’पत्रकारांच्या सुरक्षिततेसाठी उपायांची गरज आहे. पत्रकारांसाठी अॅम्ब्युलन्स सुरू केली, हे स्तुत्य असले, तरी त्याची गरज येऊ नये, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री शिंदे यांनी शुभेच्छा दिल्या.

फाउंडेशनच्या अध्यक्ष मधुरा गेठे म्हणाल्या, "पत्रकारांचे आरोग्यासाठी ही संकल्पना आहे. त्यातून आता दोन अॅम्ब्युलन्स उपलब्ध केल्या आहेत. अॅम्ब्युलन्स सेवेनंतर पत्रकारांचे ‘हेल्थ कार्ड' तयार करण्याचे नियोजन आहे. यापुढे 'टीव्हीजेए' च्या उपक्रमातत आरबीजी फाउंडेशनचे सहकार्य राहील." मनश्री पाठक यांनी प्रस्ताविक करू उपस्थितांचे स्वागत केले आणि आभार मानले.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >