मुंबईत कबड्डी स्पर्धांसाठी मैदाने होणार अल्प दरात उपलब्ध

महापालिका सभागृहात ठराव मंजूर


मुंबई (विशेष प्रतिनिधी) : कबड्डी हा भारतीय सांघिक खेळ असून कबड्डीची पंढरी म्हणून ओळख असलेल्या महाराष्ट्रात या खेळाला विशेष प्राधान्य देण्यात आले आहे. मात्र, मुंबईत मैदाने कमी होत चालल्याने कबड्डी स्पर्धांवर गंभीर परिणाम होत असल्याने महापालिकेच्यावतीने कबड्डी स्पर्धेसाठी अल्प दरात मैदाने उपलब्ध करून देण्याचा ठराव महापालिका सभागृहात करण्यात आला आहे.


मुंबईतील मध्यमवर्गीय व गिरणगाव परिसरातील अनेक खेळाडूंनी देशाचे प्रतिनिधित्व केले आहे. तरीही, सध्या योग्य मैदाने उपलब्ध नसल्यामुळे खेळाडूंच्या सरावात अडथळे निर्माण होत आहेत. सरावाचा अभाव, दुखापतींचे वाढते प्रमाण आणि पारंपरिक मातीत खेळल्या जाणाऱ्या कबड्डीऐवजी कृत्रिम मॅटवरील स्पर्धांचे वाढते प्रमाण, यामुळे खेळाडूंच्या नैसर्गिक कौशल्यावर परिणाम होत असल्याचे त्यांनी नमूद केले.


मुंबई शहर व उपनगरांतील कबड्डी संघटनांना स्पर्धा आयोजित करण्यासाठी खासगी जागांवर अवलंबून राहावे लागत आहे. त्यामुळे स्पर्धांचे आयोजन कमी प्रमाणात होत असून नवोदित खेळाडू तयार होण्यास अडचणी निर्माण होत आहेत. या पार्श्वभूमीवर बृहन्मुंबई महानगरपालिकेने आपल्या अखत्यारितील क्रीडांगणे कबड्डी स्पर्धांसाठी अल्प दरात उपलब्ध करून द्यावी अशी मागणी नगरसेविक सचिन पडवळ यांनी महापालिका सभागृहात केली होती. या ठरावाच्या सुचनेला मंजुरी महापौर रितू तावडे यांनी मंजुरी दिली आहे. त्यामुळे याबाबत ठरावच महापालिका सभागृहात पारित करण्यात आला असून प्रशासन आता यासाठी धोरणात्मक निर्णय कशाप्रकारे घेतो याकडे सर्वांचे लक्ष आहे. याबाबत बोलतांना सचिन पडवळ यांनी, महानगरपालिकेने सकारात्मक निर्णय घेतल्याने मराठमोळ्या मातीतला हा पारंपरिक खेळ अधिक जोमाने फुलेल, नव्या पिढीला प्रोत्साहन मिळेल. तसेच मुंबईतून पुन्हा राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू घडतील, असा विश्वासही व्यक्त केला आहे.

Comments
Add Comment

IPL 2026: लखनौचा कमबॅक, KKR अजूनही पहिल्या विजयाच्या प्रतीक्षेत

मुंबई : आयपीएल २०२६ मधील रंगतदार सामन्यात लखनौ सुपर जायंट्सने कोलकाता नाईट रायडर्सवर 3 विकेटने या सामन्याला रंग

IPL 2026 : सामना न खेळणाऱ्या खेळाडूंसाठी बीसीसीआयने जाहीर केली नवीन नियमावली; नियमांचे पालन न केल्यास होणार कारवाई

मुंबई : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने म्हणजेच बीसीसीआयने आयपीएलसाठी अनेक कठोर नियम लागू केले आहेत. या नवीन

Bangladesh Cricket Board : अखेर बांगलादेश नरमला; बांग्लादेश क्रिकेट बोर्डाकडून भारताला आमंत्रण

बांग्लादेश क्रिकेट बोर्डाने (बीसीबी) (Bangladesh Cricket Board) भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला (बीसीसी) पत्र लिहून कळवले आहे की,

IPL 2026 Sunil Gavaskar : सुनील गावस्करांची अनफिट क्रिकेटपटूंवर टीका

मुंबई : भारताचे महान फलंदाज सुनील गावस्कर यांनी पुन्

IPL 2026 : गुवाहाटीवर पावसाचे सावट! MI vs RR थरार रंगणार की सामना होणार रद्द?

IPL 2026: मुंबई इंडियन्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स आज आमनेसामने; विजयासाठी दोन्ही संघ सज्ज

मुंबई : आयपीएल 2026 मधील आजचा सामना क्रिकेटप्रेमींसाठी महत्त्वाचा ठरणार आहे. राजस्थान रॉयल्स आणि मुंबई इंडियन्स