Thursday, February 26, 2026

मुंबई सेंट्र्ल रेल्वस्थानकाजवळील पुलाचे नामकरण; आता होणार 'पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर' पूल

मुंबई सेंट्र्ल रेल्वस्थानकाजवळील पुलाचे नामकरण; आता होणार 'पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर' पूल

- मुंबई सेंट्र्ल रेल्वस्थानकाजवळील पुलाच्या पुनर्बांधणी कामाचे मुख्यमंत्री यांच्या हस्ते लोकार्पण

मुंबई : विकासकामांची गुणवत्ता राखत कामे गतीने पूर्ण करण्यास राज्य शासनाचे प्रथम प्राधान्य आहे. त्याच पद्धतीने बृन्हमुंबई महानगरपालिकेने गती आणि गुणवत्तेसह विहीत मुदतीच्या चार महिने आधीच मुंबई सेंट्रल रेल्वस्थानकालगतच्या पुलाच्या पुनर्बांधणीचे काम केवळ १५ महिन्यात पूर्ण केले आहे, ही निश्चितच अभिनंदनीय बाब आहे. या पुलाचे नामकरण पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर असे करण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

बृन्हमुंबई महानगरपालिकेच्यावतीने आयोजित मुंबई सेंट्र्ल रेल्वस्थानकालगतच्या पुलाच्या कामाच्या लोकार्पण कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते. या लोकार्पण कार्यक्रमात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दूरदृष्यप्रणालीद्वारे उपस्थित होते. लोकार्पण कार्यक्रमस्थळी विधानपरिषदेचे सभापती प्रा.राम शिंदे, कौशल्यविकास मंत्री मंगलप्रभात लोढा, कृषी मंत्री दत्तात्रय भरणे, आमदार गोपीचंद पडळकर, आमदार अमिन पटेल, महापौर रितू तावडे, उपमहापौर संजय घाडी, विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकर, मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त भूषण गगराणी यांच्यासह लोकप्रतिनिधी, महापालिका पदाधिकारी व अन्य संबंधित मान्यवर उपस्थित होते.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, मुंबई सेंट्र्ल रेल्वेस्थानकाजवळच्या या १३० वर्ष जुन्या पुलाची कालमर्यादा संपली होती आणि वाहतूकीच्या दृष्टीने अतिशय उपुयक्त असलेल्या या पुलाचे पुनर्बांधणी काम गतीने पूर्ण करणे गरजेचे होते. हे लक्षात घेऊन बृहृन्मुंबई महानगरपालिकेने कालबद्ध नियोजनद्वारे अतिशय वेगाने या पुलाची पुर्नबांधणी विहीत मुदतीच्या चार महिने आधी पूर्ण केल्याबद्दल मुंबई महानगरपालिकेचे पदाधिकारी, अधिकारी वर्ग यांचे अभिनंदन मुख्यमंत्री यांनी केले. मुंबईतील अजून जवळपास सहा पूल आता तयार होत असून त्यांचे काम अंतिम टप्प्यात आहे. त्यामुळे येत्या दोन तीन महिन्यात इतर सहा पुलांचे लोकार्पण ही महानगर पालिकेच्या माध्यमातून होईल. महानगरपालिकेत निर्वाचित प्रतिनिधी आल्याने महानगरपालिकेच्या कामाला अधिक गती आणि अधिक लोकाभिमुखता येईल, असे मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.

पुलाचे नामकरण पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर असे करण्यात येणार

मुख्यमंत्री म्हणाले की, महानगरपालिकेशी चर्चा करुन आपण या पुलाचे नाव पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर असे करणार आहोत, ही अत्यंत आनंदाची गोष्ट आहे. पुण्यश्लोक अहिल्यामाता यांनी या देशामध्ये एक उत्कृष्ट प्रशासक कसा असला पाहिजे याचा आदर्श आपल्या कामातुन निर्माण केला आहे. त्यांची संवेदनशीलता, धर्मपरायणता, कार्यकुशल प्रजाहितदक्ष राज्यकारभार, कायदा सुव्यवस्थेवर असेलली पकड, त्यांनी तयार केलेली मंदीरे आणि महिलांची पहिली तुकडी, त्यांनी तयार केलेले कारखाने, लघुउद्योग, त्यांनी निर्माण केलेले मंदिरे, घाट, या सर्व कामातून राजमाता अहिल्यादेवी होळकर यांनी आपल्यासमोर आदर्श निर्माण केला आहे. त्यामुळे तीन दशकांनंतरही त्यांचे नाव आपण घेतो कारण त्यांच्यासारखे जे उत्कृष्ट प्रशासक आपल्याकडे होऊन गेले त्यांच्या कामातून आपली संस्कृती आणि आपली गुणवत्ता आपल्याला आजही पाहायला मिळते.

म्हणूनच पुण्यश्लोक अहिल्यामातेचे नाव या पुलाला देण्याचा निर्णय आपल्या सर्वानाचं अतिशय गौरन्वावित आहे. त्यांच्या कामातून प्रेरणा घेऊन यापुढे राज्य शासन आणि महानगरपालिका कार्य करतचं राहतील, असे मुख्यमंत्री म्हणाले.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, मुंबई महानगरपालिकेने विहीत मुदतीच्या आत यशस्वरित्या या पुलाचे काम पूर्ण केले आहे.नागरिकांसाठी हा पूल खुप उपयुक्त ठरणारा आहे. सुरळित वाहतुकीसाठी या पुलाची आवश्यकता आहे. त्यापार्श्वभूमीवर महानगरपालिकेने या पुलाचे काम गतीने पूर्ण केले आहे. यासाठी महानगरपालिकेचे अभिनंदन करत उपमुख्यमंत्री म्हणाले की, राज्यातील अनेक रखडलेले प्रकल्प या शासनाने वेगाने पूर्ण केलेली आहेत. मुंबईकरांना अपेक्षित विकासकामे यापुढेही महानगरपालिका करत राहिल,असा विश्वास व्यक्त करत महानगरपालिकेने अशाच पद्धतीने गतीने आणि दर्जदार कामे करावीत.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा