ब्राझीलमध्ये पावसाचा कहर; आतापर्यंत ४६ जणांचा मृत्यू, अनेक बेपत्ता

ब्राझीलमध्ये निसर्गाचा भीषण कहर पाहायला मिळत आहे. दक्षिण-पूर्व ब्राझीलमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे आणि अचानक आलेल्या पुरामुळे मृतांचा आकडा सातत्याने वाढत असून आतापर्यंत ४६ जणांचा मृत्यू झाला आहे. अनेक जण बेपत्ता असून त्यांचा शोध सुरू आहे. शेकडो नागरिकांना आपली घरे सोडावी लागली आहेत. दक्षिण-पूर्वेकडील मिनास गेरैस राज्यात पुरस्थिती गंभीर झाली आहे.


ब्राझीलच्या दक्षिण भागात मुसळधार पावसामुळे अचानक आलेल्या पुरामुळे मोठ्या प्रमाणावर हानी झाली आहे. हवामान तज्ज्ञांनी पुढील काही दिवसांत या भागात आणखी पावसाची शक्यता वर्तवली आहे. मिनास गेरैस राज्यात बचावकार्य वेगाने सुरू असून बचाव पथके परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न करत आहेत. अनेक घरे आणि वसाहती चिखल व ढिगाऱ्याखाली दबल्या गेल्या आहेत.


यापूर्वी बुधवारी ब्राझीलच्या अग्निशमन विभागाने सुधारित आकडेवारी जाहीर करत मृतांचा आकडा ४६ झाल्याची माहिती दिली. सुमारे २१ जण अद्याप बेपत्ता आहेत. राज्य अग्निशमन विभागाच्या माहितीनुसार, जुईज दे फोरा आणि उबा या शहरांमध्ये पूर व भूस्खलनामुळे सुमारे ३,६०० लोक विस्थापित झाले आहेत. ही दोन्ही शहरे सुमारे ११० किलोमीटर अंतरावर आहेत.


मृतांमध्ये ११ वर्षीय बर्नार्डो लोपेस दुत्रा याचाही समावेश आहे. मुसळधार पावसामुळे त्याचे घर कोसळल्याने त्याचा मृत्यू झाला. त्याची आई आणि बहीण सध्या रुग्णालयात उपचार घेत आहेत. दरम्यान, ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष लुईज इनासियो लुला दा सिल्वा यांनी मंगळवारी सांगितले की, बचावकार्यासाठी सुरक्षा दलांना पाचारण करण्यात आले असून पावसामुळे प्रभावित नागरिकांना तातडीची मदत पुरवली जात आहे. तसेच, डोंगराळ भाग, दऱ्या आणि उतारांजवळील भागात आरोग्य पथकेही पाठवण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.

Comments
Add Comment

कॅनडातील हिंसक घटनांशी भारताचा संबंध नाही, कार्नी सरकारची अधिकृत भूमिका

ओटावा : कॅनडाचे पंतप्रधान मार्क कार्नी यांच्या भारत दौऱ्याचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. कार्नी भारत दौऱ्यात

Iran Helicopter Crash : लष्करी हेलिकॉप्टर कोसळून चौघांचा मृत्यू

अमेरिकेसोबत सुरू असलेल्या भीषण तणावाच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी (२४ फेब्रुवारी) इराणच्या मध्य भागात एक लष्करी

Epstein Files : एपस्टाईन फाइल्समध्ये नाव आल्यानंतर 'या' देशाच्या पंतप्रधानांनी केला आत्महत्येचा प्रयत्न

गेल्या काही दिवसांपासून संपूर्ण जगात एपस्टाईन फाइल्समुळे गोंधळ उडाला आहे. अशातच या फाइल्समध्ये नाव आलेल्या एका

Donald Trump Pakistan PM : "मी नसतो तर पाकिस्तानी पंतप्रधानांचा..."; ऑपरेशन सिंदूरवर डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ऑपरेशन सिंदूर संदर्भात एक मोठे विधान केले आहे. "जर मी नसतो तर या

इराणशी लढण्याआधी अमेरिकेच्या सैनिकांमध्ये भर समुद्रात टॉयलेटवरून मारामारी

वाशिंग्टन : अमेरिका आणि इराण यांच्यातील वाद काही थांबण्याचे नाव घेताना दिसत नाही. अमेरिकेने आपल्या युद्धनौका

अमेरिकेत जोरदार बर्फवृष्टी; ५,६०० हून अधिक उड्डाणे रद्द आणि शाळा बंद

वॉशिंग्टन : अमेरिकेच्या ईशान्य भागात एका शक्तिशाली हिमवादळाने प्रचंड कहर माजवला आहे. मेरीलँडपासून मेनपर्यंतचे