Thursday, February 26, 2026

Kokan Railway: कोकणकरांसाठी आनंदाची बातमी! शिमग्यासाठी धावणार खास विनाआरक्षित 'ही' ट्रेन

Kokan Railway: कोकणकरांसाठी आनंदाची बातमी! शिमग्यासाठी धावणार खास विनाआरक्षित 'ही' ट्रेन

मुंबई : कोकणकरांसाठी महत्वाचा सण म्हणजे शिमगा, राज्याच्या कानाकोपऱ्यातून चाकरमानी आपल्या गावी शिमग्यासाठी जाण्याच्या धावपळीत असतो. पण यात पंचाईत होते ते तिकीट आरक्षणाची, आयत्या वेळी अनेकांना आरक्षण मिळतच नाही आणि ट्रेनमध्ये गर्दीही असते.

कोकणात सणासाठी येणाऱ्या चाकरमान्यांची गर्दी लक्षात घेत रेल्वे प्रशासनाने एक मोठा निर्णय घेतला आहे. दिव्याहुन चिपळूणपर्यंत कोकण रेल्वे मार्गावर मेमू ट्रेन चालवली जाणार आहे. त्यामुळे तुम्ही कोणतंही तिकीट बुक न करता थेट ट्रेनने प्रवास करू शकता. मेमु स्पेशल ट्रेन १ मार्च ते ८ मार्च २०२६ पर्यन्त दोन्ही मार्गांवर धावणार आहे.

मेमु ट्रेनचे थांबे

ही ट्रेन दिवा, निळजे, तळोजे, कळंबोली, पनवेल, सोमठाणे, आपटा, जिते, कासू, नागोथाने, रोहा, कोलाड, इंदापूर, माणगांव, गोरेगांव रोड, वीर, सापे वामने, करंजडी, विन्हेरे, दीवानखावटी, कलंबनी बुद्रुक, खेड़, अंजनी आणि चिपळूनसारख्या अनेक स्टेशनवर थांबा देण्यात आला आहे. या ट्रेनमध्ये राखीव जागा नसल्यामुळे कोकणात जाणाऱ्या नागरिकांना प्रवास करणं सोपं होईल. यादरम्यान रेल्वे प्रशासनाने लोकमान्य टिळक टर्मिनस (LTT) आणि मडगाव जंक्शनदरम्यान स्पेशन ट्रेन सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.

मडगाव ते लोकमान्य टिळक टर्मिनस

ट्रेन नंबर ०१००४ मडगाव जंक्शनहून लोकमान्य टिळक टर्मिनससाठी सायंकाळी ४.३० वाजता सुटून दुसऱ्या दिवशी सकाळी ६.२० वाजता लोकमान्य टिळक टर्मिनसला पोहोचेल. ही ट्रेन १ ते ८ मार्चपर्यंत सुरू असेल. याशिवाय ट्रेन नंबर ०१००३ लोकमान्य टिळक टर्मिनस आणि मडगाव जंक्शनदरम्यान एक स्पेशल ट्रेन सुरू करण्यात येईल. ही ट्रेन २ मार्च ते ८ मार्चपर्यंत दररोज सकाळी ८.२० वाजता लोकमान्य टिळक टर्मिनसहून निघेल आणि त्याच दिवशी रात्री १०.४० वाजता मडगाव जंक्शनला पोहोचेल.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >