शाळा दत्तक धोरण रद्द करण्याची काँग्रेस आमदार पुत्राची मागणी नामंजूर

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई महापालिकेने खासगी संस्था, स्वयंसेवी संस्था आदींना महापालिकेच्या दिलेल्या दत्तक तत्वावर दिलेल्या शाळांचे धोरण तातडीने रद्द करण्याची मागणी मालाडमधील काँग्रेसचे आमदार अस्लम शेख यांचे पुत्र नगरसेवक हैदरअली शेख यांनी ठरावाच्या सूचनेद्वारे केली होती. मात्र, ही मागणी म्हणजे कई पे इशारा कई पे निगाहें अशाप्रकारची असून मालाडमधील एका शाळेला डोळयासमोर ठेवून ही मागणी काँग्रेसच्या नगरसेवकाने केल्याची बाब निदर्शनास आणताच भाजपचे सर्व नगरसेवक आक्रमक होत सभागृहाला त्याचा खरा आरसा दाखवला. याला उबाठासह इतरांचीही साथ लाभल्याने काँग्रेस पक्षाचे नगरसेवक एकाकी पडला आणि ही ठरावाची सूचना बहुमताने फेटाळली गेली.


मुंबई महापालिकेने सन २००७ पासून खासगी संस्था, स्वयंसेवी संस्था यांना महापालिकेच्या शाळा दत्तक देण्याचे धोरण राबवत आहे, या धोरणांतर्गत महापालिकेच्या शाळज्ञंची पायाभूत सुविधा, शैक्षणिक गुणवत्ता आणि प्रशासन सुधारणे हे मुख्य उद्दिष्ट्य आहे. महापालिकेच्या शाळा दत्तक घेणाऱ्या संस्थांना शाहांची दुरुस्ती, रंगरंगोटी व स्वच्छता, संगणकीय लॅब, शैक्षणिक साहित्य पुरवणे, प्रशिक्षित शिक्षकांची नेमणूक करणे यासर्व जबाबदाऱ्या पार पाडताच असे नाही असे सांगत ही मागणी ठरावच्या सूचनेद्वारे हैदरअली शेख यांनी केली होती.


महापालिका सभागृहात ही मागणी केल्यानंतर, स्वीकृत नगरसेवक प्रविण छेडा यांनी अनेक सेवाभावी शिक्षण संस्था या धोरणांतर्गत चांगल्याप्रकारे काम करत असून जर ही मागणी मान्य केली तर मुलांना शिक्षण देणाऱ्या संस्था पुढे येणार नाहीत. यामाध्यमातून शिक्षण देणाऱ्या संस्थांना मदतच होत आहे असे सांगत विरोध केला. त्यानंतर मालाडमधील भाजपचे नगरसेवक योगेश वर्मा यांनी ही मागणी म्हणजे कहीं पें इशारा, कहीं पें निगाहे असल्याचे सांगत मालाडमधील एका चांगल्या संस्थेमार्फत चालणाऱ्या शाळेला समोर ठेवून ही मागणी झाली आहे. पण ज्या संस्थेला काढून सध्या ज्या संस्थेला दिले, त्या संस्थेला दिल्यानंतर शिक्षणाची प्रगती होवून निकाल ८० टक्क्यांवर पोहाचला आहे, यापूर्वीच्या संस्थेचा निकाल ५० टक्क्क्यांच्या खाली होता. त्यामुळे ही शाळा बंद करण्याचा घाट असून याला आमचा विरोध असल्याचे सांगितले. यावर काँग्रेसच्या नगरसेवकांनी एकच गोंधळ घालण्यास सुरुवात केली. यावर विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकर यांनी कोणत्याही ठरावाच्या सूचनेमुळे सभागृहात गोंधळ तथा वाद होणार नाही याची काळजी प्रत्येक पक्षाने गटनेत्यांनी घ्यायला हवी असे सांगत काँग्रेस गटनेत्यांची अप्रत्यक्ष कानउघडणी केली.


यावर सभागृहनेते गणेश खणकर यांनी हा विषय म्हणावा तेवढा साधा नसून जर अशाप्रकारे शाळांच्या संस्थांबाबत शंका उपस्थित केली जात असेल तर यापूर्वीच्या संस्था आणि आताच्या संस्था यांच्या कामगिरीचे ऑडीट करण्यात यावे म्हणजे कोणती संस्था किती चांगली कामगिरी करते समजून येईल असे सांगत या ठरावाच्या सूचनेला विरोध केला. यावर महापौरांनी ठरावाची सूचना मंजुरीला टाकली. पण काँग्रेस वगळता कुणीही पाठिंबा दिला नाही. त्यामुळे बहुमताच्या आधारे महापौरांनी ठरावाची सूचना नामंजूर केली. त्यामुळे नामंजूर ठरेली ही या महापालिकेतील पहिली ठरावाची सूचना आहे.

Comments
Add Comment

उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांची घेतली सांत्वनपर भेट

मुंबई : उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन यांनी आज देवगिरी शासकीय निवासस्थानी उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार

माजी उपमहापौर अलका केरकर यांचे निधन

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबईच्या माजी उपमहापौर आणि वॉर्ड क्रमांक ९८ च्या भाजपच्या विद्यमान नगरसेविका अलका

'जैन समाजाची सेवा, त्याग, अहिंसेची परंपरा समाजासाठी प्रेरणादायी'

मुंबई : जैन समाजाने समाजसेवा, दानधर्म, अहिंसा आणि त्याग या मूल्यांवर आधारित कार्यातून समाजासमोर प्रेरणादायी

मुंबई मनपातील संभाव्य घोटाळ्यांवर भाजपचा प्रहार

मुंबई : महापालिकेत प्रशासनातील अधिकाऱ्यांनी कंत्राटदारांसोबत संगनमत करून कामे मिळवण्यासाठी घातलेला घाट आणि

मुंबई मनपा मुख्यालयासह कार्यालये, रुग्णालयांच्या सुरक्षेत वाढ

मुंबई : महापालिका मुख्यालयासह इतर इमारतींमध्ये सुरक्षेच्या दृष्टीकोनातून आता अत्याधुनिक स्वरुपाच्या डोअर

भेंडीबाजारात पुन्हा फेरीवाल्यांवर होणार कारवाई

मुंबई : महापालिका आयुक्तांच्या निर्देशानुसार मुंबईतील काही विभागांमध्ये महापालिकेच्या वतीने अनधिकृत