Thursday, February 26, 2026

Budget Session : उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना आलेल्या प्रश्नांची उत्तरं हे दोन मंत्री देणार

Budget Session : उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना आलेल्या प्रश्नांची उत्तरं हे दोन मंत्री देणार
मुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अकाली निधनानंतर राज्याचे पहिले अर्थसंकल्पीय अधिवेशन सोमवार २३ फेब्रुवारी पासून सुरु झाले आहे. सकाळी ११ वाजता राज्यपालांच्या अभिभाषणाने या अधिवेशनाची सुरुवात झाली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ६ मार्च रोजी राज्याचा अर्थसंकल्पीय सादर करतील. अशातच सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी अधिवेशन काळापुरता आपल्याकडील खात्यांचा कार्यभार सहकारी मंत्र्यांकडे सोपवला आहे. त्यामुळे या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या काळात उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या वतीने दोन मंत्री प्रश्नांची उत्तरं देतील. राज्य उत्पादन शुल्क या विभागाच्या संबंधित प्रश्नांची उत्तर मंत्री हसन मुश्रीफ (वैद्यकीय शिक्षण मंत्री), क्रीडा आणि युवक कल्याण विभागाशी संबंधित प्रश्नांची उत्तरं मंत्री दत्तात्रय भरणे (कृषी मंत्री), आणि अल्पसंख्याक आणि औकाफ विभागाशी संबंधित प्रश्नांची उत्तरं मंत्री दत्तात्रय भरणे (कृषी मंत्री) देतील. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना पत्र लिहून सुनेत्रा पवार यांनी पदभार अन्य मंत्र्यांकडे सोपवत असल्याची माहिती दिली.
Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >