Wednesday, February 25, 2026

मुंबईहून मिरा भाईंदर ते वसई-विरार दरम्यानचा प्रवास होणार सुसाट

मुंबईहून मिरा भाईंदर ते वसई-विरार दरम्यानचा प्रवास होणार सुसाट

मुंबई: मुंबई शहरातून बरीच लोक अनेक उपनगरात कामानिमित्ताने जात असतात. ज्यात मुंबई ते पालघर जाणाऱ्यांची संख्याही मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे त्या ठिकाणचा प्रवास सुखकर होण्यासाठी एमएमआरडीएने कंबर कसली आहे.

मुंबई महानगर क्षेत्राचा कायापालट होणार

जर तुम्हीही मुंबईतून वसई-विरारला जाणार आहात तर हा प्रवास आता अतिशय सोपा आणि कमी वेळात पार होणार आहे पण हे कसे आणि कधीपासून शक्य होईल ते जाणून घ्या.

सध्या दहिसर ते मिरा-भाईंदरदरम्यान सुरू असलेल्या एमएमआरडीएच्या मेट्रो ९ मार्गिकेचा विस्तार आता मिरा-भाईंदर ते वसई-विरार असा मेट्रो १३ मार्गिकेद्वारे केला जाणार आहे. अनेक वर्षे केवळ कागदावर असलेला हा प्रकल्प आता प्रत्यक्षात येण्याच्या मार्गावर आहे.

काय बदल होणार?

एमएमआरडीएच्या १६० व्या बैठकीत मेट्रो १३ च्या सुधारित आराखड्याला मान्यता देण्यात आली. नव्या आराखड्यानुसार या मार्गिकेची लांबी २५.०३ किमी असणार आहे. यापूर्वी ती २३ किमी प्रस्तावित होती. वाढती लोकसंख्या आणि भविष्यातील प्रवासीसंख्या लक्षात घेऊन मार्गात बदल करण्यात आले आहेत.

कामाला कधी होणार सुरुवात?

आता हा प्रस्ताव अंतिम मंजुरीसाठी राज्य सरकारकडे पाठवला जाणार आहे. मंजुरी मिळाल्यानंतर प्रत्यक्ष कामाला सुरुवात होईल.

कोणत्या प्रवाशांना फायदा होणार?

मेट्रो २, २बी, ९ आणि १३ या मार्गिका एकमेकांशी जोडल्या गेल्यास मानखुर्द ते वसई-विरार असा सलग मेट्रो प्रवास शक्य होणार आहे. त्यामुळे वसई-विरारकरांचे मेट्रोचे स्वप्न लवकरच पूर्ण होण्याची आशा निर्माण झाली आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >