नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज म्हणजेच बुधवार २५ फेब्रुवारी रोजी सकाळी दोन दिवसांच्या इस्रायल दौऱ्यासाठी रवाना झाले आहेत. हा त्यांचा दुसरा इस्रायल दौरा आहे. पश्चिम आशियातील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर, विशेषतः अमेरिका आणि इराणमधील बिघडत चाललेल्या संबंधांच्या पार्श्वभूमीवर, भारत-इस्रायल धोरणात्मक भागीदारी आणखी मजबूत करण्याच्या दिशेने हे एक महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे. यावेळी पंतप्रधान मोदी इस्रायली संसदेलाही संबोधित करतील.
I will be undertaking a State Visit to Israel today and tomorrow. Our nations share a robust and multifaceted Strategic Partnership. Ties have significantly strengthened in the last few years. I will be holding talks with PM Netanyahu, in which we will discuss ways to strengthen…
— Narendra Modi (@narendramodi) February 25, 2026
असा असेल मोदींचा दोन दिवसीय इस्रायल दौरा :
इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्या निमंत्रणावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी २६ - २७ फेब्रुवारी २०२६ रोजी इस्रायलला अधिकृतपणे भेट देणार आहेत. या भेटीदरम्यान, पंतप्रधान मोदी इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांची भेट घेतील. दोन्ही नेते भारत-इस्रायल धोरणात्मक सहयोगाने झालेल्या महत्त्वपूर्ण प्रगतीचा आढावा घेतील आणि विज्ञान तंत्रज्ञान, नवोन्मेष, संरक्षण, सुरक्षा, कृषी, जल व्यवस्थापन, व्यापार आणि अर्थव्यवस्था आणि लोकांमधील देवाणघेवाण यांच्यासह सहकार्याच्या विविध क्षेत्रांतील आगामी संधींवर विचार विनिमय करतील. उभय देशांतील नेत्यांकडून परस्पर हिताच्या प्रादेशिक आणि जागतिक मुद्द्यांवर दृष्टिकोनांची देवाणघेवाण होण्याची अपेक्षा आहे.
Honoured by the gesture. Looking forward to addressing the Knesset later today. @KnessetENG https://t.co/0PaG9Nutmy
— Narendra Modi (@narendramodi) February 25, 2026
दीर्घकालीन धोरणात्मक भागीदारीला दुजोरा :
पंतप्रधान इस्रायलचे राष्ट्राध्यक्ष आयझॅक हर्झोग यांचीही यावेळी भेट घेतील. या भेटीमुळे उभय देशांमधील सघन आणि दीर्घकालीन धोरणात्मक भागीदारीला दुजोरा मिळेल तसेच समान आव्हानांचा आढावा घेण्याची तसेच दोन्ही देशांच्या लोकशाहींमधील मजबूत भागीदारीसाठी तसेच त्यांचे सामायिक दृष्टिकोन साध्य करण्याच्या दिशेने होणाऱ्या उद्दिष्टांशी पुनश्च उजाळा देण्याची संधी मिळणार आहे.







