अमली पदार्थ विक्रेत्यांची संपत्ती जप्त करणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; कुरिअर कंपन्यांवर बारीक नजर

मुंबई : "युवा पिढीसमोर अंमली पदार्थांचे मोठे आव्हान आहे. या प्रश्नाबाबत राज्य सरकारची भूमिका अत्यंत कठोर आहे. त्यामुळेच अशा गुन्ह्यातील आरोपींना मकोका कायदा लावण्याचा निर्णय यापूर्वीच घेण्यात आला आहे. त्यातच गुन्हेगारांची मालमत्ता जप्त करण्याची तरतूद असून, त्यानुसार कारवाई करण्यात येईल", अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी विधानसभेत दिली.


अंमली पदार्थांच्या विरोधात पोलिसांनी केलेली कारवाई आणि अंमली पदार्थांचा जप्त केलेला साठा यासंदर्भात अमिन पटेल, वरूण सरदेसाई, अस्लम शेख आदी आमदारांनी प्रश्न उपस्थित केले. यावेळी झालेल्या चर्चेला उत्तर देताना राज्यमंत्री योगेश कदम म्हणाले की अंमली पदार्थांच्या संदर्भात राज्य सरकारची भूमिका अत्यंत कठोर आहे. त्यामुळेच अशा गुन्ह्यात पोलीस अधिकाऱ्यांचा सहभाग आढळून आल्यास थेट बडतर्फीच्या कारवाईचा निर्णय करण्यात आला आहे. त्यानुसार आतापर्यंत १५ पोलिस अधिकाऱ्यांवर बडतर्फीची कारवाई करण्यात आली असून दहाजणांना निलंबित करण्यात आले आहे.



कुरिअर कंपनीवरही नजर


अंमली पदार्थांच्या विक्रीसाठी वेगवेगळे मार्ग शोधले जात आहेत. इन्स्टाग्रामसारख्या अॅपचा 'मार्केट प्लेस' म्हणून वापर केला जात आहे. तसेच कुरिअर कंपन्यांचाही वापर केला जातो. कुरिअरद्वारे अंमली पदार्थ पाठवले जात असल्याचे आढळून आले आहे. अशा कुरिअरवर कारवाई केली जात आहे. त्यांना प्रशिक्षणही देण्यात आले आहे. मोठ्या रकमेचा साठा जप्त करण्यात आल्याच्या घटना समोर येत आहेत. कारण, अगदी छोट्या ठिकाणी कोणताही कारखाना वगैरे नसले तरी मोठ्या प्रमाणावर अंमली पदार्थ तयार करणे शक्य झाले आहे. त्यामुळे अंमली पदार्थ तयार करण्यासाठी जी सामग्री किंवा रसायने लागतात त्या परवानाधारक पुरवठादारांवरही नजर ठेवली जात आहे. अंमली पदार्थांच्या प्रत्येक घटनेत पुढची आणि मागची साखळी उघड करण्याची सरकारची भूमिका आहे. त्यामुळेच मोठ्या प्रमाणावर परराज्यातून गुन्हेगार ताब्यात घेतले. एका प्रकरणात तर परदेशातून गुन्हेगाराला पकडून आणले. अशा प्रकरणात कुठलीही तडजोड केली जाणार नाही, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले.

Comments
Add Comment

'Kumbh Bhakti Sangam' : नाशिकमध्ये शुक्रवारपासून कुंभ भक्ती संगम, मुख्यमंत्री करणार उद्घाटन

नाशिक : नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरणातर्फे आयोजित तीन दिवसीय ‘कुंभ भक्ती संगम’ची तयारी पूर्ण झाली

Helpline : नेपाळच्या पुरात अडकलेल्या महाराष्ट्रातील नागरिकांच्या नातलगांसाठी हेल्पलाईन

मुंबई : नेपाळच्या रसुवा जिल्ह्यात बुधवारी सकाळी भोटे कोशी नदीला अचानक आलेल्या भीषण पुरामुळे किमान ५०० प्रवासी

Beed Crime : आष्टीत एकाच रात्री तीन अल्पवयीन मुलींचे बालविवाह; १२ जणांविरुद्ध गुन्हा

बीड : कायद्याची भीती न बाळगता आष्टी तालुक्यातील कानडी बुद्रुक येथे एकाच रात्री तब्बल तीन अल्पवयीन मुलींचे

MPSC paper leak : पेपरफुटी प्रकरणात सहा जणांना अटक, २ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी; एमपीएससीच्या तीन अधिकाऱ्यांचाही समावेश

मुंबई : अन्न व औषध प्रशासनातील औषध निरीक्षक, गट-ब पदासाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेली संपूर्ण

Nepal's flood situation : नेपाळमधील पूरस्थितीवर पंतप्रधान मोदींची बालेन्द्र शाह यांच्याशी चर्चा, भारताकडून सर्वतोपरी मदतीचे आश्वासन

नवी दिल्ली : नेपाळमध्ये निर्माण झालेल्या पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी

UP : उत्तरप्रदेशमध्ये आई-वडिलांशी दुर्व्यवहार करणारी मुले संपत्तीतून बेदखल होणार

लखनऊ : उत्तर प्रदेश (UP) सरकारने ज्येष्ठ नागरिकांच्या हक्कांचे संरक्षण आणि त्यांना सन्मानाने जीवन जगता यावे