मुंबई: सध्या अनेक ठिकाणी पोलीस भरती सुरू आहे. दरम्यान मीरा भाईंदरमध्ये सुरू असलेल्या पोलीस भरती प्रक्रियेत एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. येथे पोलीस भरती प्रक्रियेदरम्यान मैदानी चाचणीपूर्वीच उत्तेजक द्रव्य (ड्रग्ज) घेणाऱ्या एका उमेदवाराला पोलिसांनी रंगेहाथ पकडलं आहे.
बारामतीचा रहिवासी असलेल्या साहिल अवघडे हा ताकद वाढवण्यासाठी इंजेक्शनचा आधार घेत होता. पण सीसीटीव्हीमध्ये हा प्रकार कैद झाला. पोलिसांनी तातडीने गुन्हा दाखल करत या उमेदवाराला ताब्यात घेतलं असून पुढील तपास सुरू आहे.
या घटनेनंतर आता पोलीस भरती प्रक्रियेतील पारदर्शकतेवर आणि उमेदवारांच्या वाढत्या हलगर्जीपणावर मोठी चर्चा सुरू झाली आहे.







