मुंबई: 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' योजनेच्या लाभार्थी महिलांची प्रतीक्षा अखेर संपली आहे. जानेवारी महिन्याचा निधी वितरणाची प्रक्रिया मंगळवारपासून अधिकृतपणे सुरू झाली असून, लवकरच पात्र महिलांच्या बँक खात्यात पैसे जमा होणार आहेत. महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी सोशल मीडियाद्वारे ही महत्त्वाची माहिती दिली.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना : जानेवारी महिन्याच्या सन्मान निधी वितरणाची प्रक्रिया सुरू ! मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील सर्व पात्र लाभार्थ्यांना जानेवारी महिन्याचा सन्मान निधी वितरित करण्याची तांत्रिक प्रक्रिया २३ फेब्रुवारी पासून सुरू करण्यात आली आहे. पुढील २-३… pic.twitter.com/mycGTG3Bk0
— Aditi S Tatkare (@iAditiTatkare) February 24, 2026
२३ फेब्रुवारीपासून निधी वितरणाची तांत्रिक प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. पुढील २ ते ३ दिवसांत सर्व पात्र लाभार्थ्यांच्या आधार कार्डशी लिंक असलेल्या बँक खात्यात सन्मान निधी जमा होईल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली ही योजना यशस्वीपणे सुरू असल्याचे तटकरे यांनी नमूद केले.
महायुती सरकारचा दृढ निश्चय आणि महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींचा विश्वास या बळावर या योजनेची दमदार वाटचाल अशीच सुरू राहणार," असा विश्वास मंत्री आदिती तटकरे यांनी व्यक्त केला आहे.







