फिटनेस स्टार मयांक पवार याचे ३७ व्या वर्षी आकस्मिक निधन

मुंबई : रिअ‍ॅलिटी शोच्या दुनियेतून प्रसिद्धी मिळवलेले आणि फिटनेस क्षेत्रात स्वतंत्र ओळख निर्माण करणारे स्प्लिट्सविला सीझन ७ मधील स्पर्धक मयंक पवार यांचे निधन झाले आहे. अवघ्या ३७व्या वर्षी त्यांनी जगाचा निरोप घेतल्याची माहिती समोर आली असून चाहत्यांमध्ये शोककळा पसरली आहे.



सोशल मीडियावरून दिली माहिती


मयंक यांच्या अधिकृत इंस्टाग्राम हँडलवरून त्यांच्या निधनाची बातमी जाहीर करण्यात आली. “भाऊ, मार्गदर्शक आणि प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व” अशा शब्दांत त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. ही पोस्ट काही मिनिटांतच व्हायरल झाली आणि चाहत्यांकडून संवेदना व्यक्त केल्या जाऊ लागल्या.



हृदयविकाराचा झटका आल्याची प्राथमिक माहिती


प्राथमिक माहितीनुसार हृदयविकाराच्या झटक्यामुळे त्यांचा मृत्यू झाल्याचे समजते. २५ फेब्रुवारी २०२६ रोजी सायंकाळी ५ ते ६ दरम्यान राणा प्रताप बाग येथील संगम पार्क परिसरातील वाल्मिकी मंदिरात प्रार्थना सभेचे आयोजन करण्यात आले आहे.



रिअ‍ॅलिटी शोमधून लोकप्रियता


‘स्प्लिट्सविला ७’मध्ये सहभाग घेतल्यानंतर मयंक प्रेक्षकांच्या नजरेत आले. शांत, संयमी आणि प्रामाणिक व्यक्तिमत्त्वामुळे त्यांना विशेष पसंती मिळाली होती. शोमधून बाहेर पडताना सूत्रसंचालिका सनी लिओनी देखील भावुक झाल्याचीही चर्चा त्यावेळी रंगली होती.



फिटनेस क्षेत्रातील दमदार ओळख


रिअ‍ॅलिटी शोच्या पुढे जात मयंक यांनी बॉडीबिल्डिंग आणि फिटनेस विश्वात स्वतःचे स्थान निर्माण केले. ‘मिस्टर इंडिया’ स्पर्धेत अनेक वेळा विजेतेपद पटकावत त्यांनी फिटनेस आयकॉन म्हणून नावलौकिक मिळवला. सेलिब्रिटी प्रशिक्षक म्हणूनही त्यांनी काम केले होते. अनेक तरुण खेळाडूंना त्यांनी मार्गदर्शन करत होता.


त्यांच्या अचानक जाण्याने सोशल मीडियावर विविध तर्कवितर्कांना उधाण आले आहे. काहींनी फिटनेस क्षेत्रातील आरोग्यविषयक धोके आणि स्टिरॉइड्सच्या वापराबाबत प्रश्न उपस्थित केले जात आहेत.


Comments
Add Comment

Chinnaswamy Stadium IPL 2026 : चिन्नास्वामी स्टेडियमवर आरसीबीचे सामने आयोजित करण्यास हिरवा कंदील

आयपीएल २०२६ दरम्यान बंगळुरूमधील एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचे सामने आयोजित करण्यातील

Virat Kohli Ideal RCB team : एबीपासून स्टार्कपर्यंत दिग्गजांचा समावेश; जाणून घ्या किंग कोहलीचा ऑल टाईम फेव्हरेट आरसीबी संघ

मुंबई : भारतीय संघाचा स्टार फलंदाज विराट कोहली याने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू म्हणजेच आरसीबीसाठी आपली ‘ऑल-टाइम

Mumbai: पोलिसांच्या छापेमारीत धक्कादायक प्रकार उघड; श्रीमंत पुरुषांना जाळ्यात अडकवून ...

मुंबई: सध्या बाजारात विविध प्रकारचे डेटिंग अॅप सुरू आहेत. मोठ्या संख्येने तरुण-तरुणी या डेटिंग अॅपवर सक्रिय

BCCI Naman Awards 2026: गिल-मानधना यांचा सर्वोत्तम आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू पुरस्काराने सन्मान; बिन्नी, द्रविड आणि मिताली यांचाही सन्मान

नवी दिल्ली: भारताचा कसोटी कर्णधार शुभमन गिल आणि स्मृती मानधना यांना २०२४-२०२५ मधील उत्कृष्ट कामगिरीसाठी रविवारी

२०२६ या खेळाडूसाठी ठरलं लकी; वर्ल्डकप जिंकला आणि आता होणार बाबा; व्हिडिओ झाला व्हायरल

मुंबई : सूर्यकुमार यादव याच्या नेतृत्वात भारताने तिसऱ्यांदा टी २० विश्वचषकावर आपले नाव कोरले. आणि भारतीयांचा

पाकिस्तानच्या 'या' खेळाडूला आपलाच संताप पडला महागात; आयसीसीकडून डिमेरिट पॉइंटची शिक्षा

पाकिस्तानचा फलंदाज सलमान आघा Salman Agha पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात धावबाद झाल्यानंतर