Police: सरकारचा मोठा निर्णय; ५१ हजार पोलिसांना लागू होणार नवा नियम

मुंबई: पोलीस दलातील शिस्त आणि गांभीर्य टिकवून ठेवण्यासाठी प्रशासनाने एक मोठा निर्णय घेतला आहे. आता पोलीस कर्मचाऱ्यांना गणवेशात रील, मिनी-व्लॉग किंवा कोणत्याही प्रकारचे व्हिडिओ समाजमाध्यमांवर पोस्ट करण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे. मुंबईतील ५१ हजार पोलीस कर्मचाऱ्यांना हा नियम लागू असेल. या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध कठोर शिस्तभंगविषयक कारवाईचा इशारा देण्यात आला आहे. अनेक वेळा पोलीस आपल्या वर्दीमध्ये रिल करताना दिसत होते. त्याबाबतच्या तक्रारी वाढल्या होत्या. त्यामुळे हा निर्णय घ्याला लागला आहे.


विशेष शाखेचे उपायुक्त दत्तात्रेय कांबळे यांनी गुरुवारी परिपत्रक काढून स्पष्ट केले की, अनेक कर्मचारी गणवेशात व्हिडिओ बनवताना कर्तव्यावरील संवेदनशील ठिकाणे, सरकारी वाहने आणि शस्त्रे यांचे चित्रीकरण करतात. यामुळे ऑपरेशनल सुरक्षेला धोका निर्माण होऊ शकतो. विधीमंडळातही काही आमदारांनी हा मुद्दा उपस्थित केला होता, ज्याची दखल आता प्रशासनाने घेतली आहे.


या नियमाची अंमलबजावणी करण्यासाठी मुंबई पोलिसांच्या सोशल मीडिया लॅबला विशेष जबाबदारी देण्यात आली आहे. 'खाकी स्वॅग' सारख्या ट्रेंडवर आता पूर्णपणे बंदी येणार असून, खासगी आयुष्य आणि कर्तव्य यांची सरमिसळ टाळण्याचे आदेश देण्यात आले आहेत. गेल्या काही दिवसांपासून 'खाकी स्वॅग' नावाचा ट्रेंड पोलिसांमध्ये लोकप्रिय झाला होता. मात्र, यामुळे कर्तव्यावरील गोपनीयता भंग पावत असल्याची तक्रार होती.


पोलीस दलाची प्रतिष्ठा जपण्यासाठी सोशल मीडियाचा वापर केवळ वैयक्तिक कामासाठीच करावा, असे स्पष्ट करण्यात आले आहे. विधानसभेतही लोकप्रतिनिधींनी या विषयावर चिंता व्यक्त केली होती. त्यांनतर आता पोलीस प्रशासनाने हे पाऊल उचलले आहे. मुंबई पोलिसांची सोशल मीडिया लॅब आता सर्व प्लॅटफॉर्मवर लक्ष ठेवून असेल, जेणेकरून नियमांचे उल्लंघन होणार नाही. ज्याच्याकडून याचे उल्लंघन होईल त्याच्यावर कारवाई केली जाणार आहे. त्यामुळे आता अशा व्हिडीओना चाप बसण्यास मदत होईल.

Comments
Add Comment

Pune Cycle Race : जगाच्या नकाशावर गेलेली सायकल स्पर्धा 26 ते 31 जानेवारी दरम्यान पुणे जिल्ह्यात रंगणार

पुणे : पुणे जिल्ह्यात आयोजित करण्यात येणाऱ्या ‘पुणे ग्रँड टूर – 2027’ (सीझन 2) या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सायकल

Spirituality to your everyday life : अध्यात्म म्हणजे जगापासून पळणे नव्हे, तर शांततेने जगणे; गौर गोपाल दास यांनी सांगितले दैनंदिन जीवनात अध्यात्म आणण्याचे ५ सोपे मार्ग

मुंबई : आजच्या धावपळीच्या आणि तणावपूर्ण जीवनात 'अध्यात्म' हा शब्द ऐकला की, अनेकांना वाटते की यासाठी घरदार सोडून

LED fishing boats will be cancelled : एलईडी मासेमारी बोटींना डिझेल पुरवठा करणाऱ्या मच्छिमार संस्थांची नोंदणी रद्द करणार

मंत्री नितेश राणे यांचा इशारा; पारंपरिक मच्छिमारांना त्रास देणाऱ्यांची खैर नाही मुंबई :

Minister Adv. Ashish Shelar : कोकणातील कातळशिल्पांवर आंतरराष्ट्रीय दर्जाचा माहितीपट तयार करण्यास मान्यता - मंत्री ॲड.आशिष शेलार

मुंबई : कोकणातील रत्नागिरी विभागातील कातळशिल्पांवर आंतरराष्ट्रीय दर्जाचा माहितीपट तयार करण्यास प्रशासकीय

Revenue Minister Chandrashekhar Bawankule : उत्खनन रॉयल्टी, बिनशेती प्रक्रिया होणार डिजिटल

राज्यातील बांधकाम क्षेत्रासाठी मोठा दिलासा महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी क्रेडाईचे सर्व प्रश्न लावले

Revenue Minister Bawankule : अनेकदा व्हरांड्यात झोपलो पण हार मानली नाही..! महसूलमंत्री बावनकुळे आमदार निवासातील आठवणींत रमले

सुरक्षा रक्षक ते स्वीपर... सर्वांची आस्थेने विचारपूस मुंबई : राज्याच्या राजकारणात आणि प्रशासनात महसूलमंत्री